मोदींना 24 तास सुरक्षा देणाऱ्या SPG कमांडोंना मिळतो ‘एवढा’ पगार!

SPG चे पात्र सदस्यांची निवड ही IPS, CRPF, BSF आणि CISF यांच्यामधून केली जाते. बरं एकदा निवड झाली की वर्षांनुवर्ष तुम्ही SPG कमांडो म्हणून काम कराल असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा अंदाज चुकला.


SPG (Special Protection Group) ही देशातली सर्वात महागडी आणि मजबूत सुरक्षा व्यवस्था आहे. आपल्या देशातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजेच पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी SPG कमांडोंवरच असते. पंतप्रधानांचा दौरा देशात, परदेशात कुठेही असो, हे कमांडो सावलीसारखे त्यांच्या पाठिशी उभे राहून त्यांचं रक्षण करतात. तुम्हाला माहीत आहे का SPG कमांडोंची ट्रेनिंग कशी असते? ‘ट्रेनिंग पास केल्यावर कमांडो झाल्यावर त्यांना पगार किती मिळतो? अर्थातच ही माहिती जाणून घ्यायची असेल तर संपूर्ण लेख वाचावा लागेल.

SPG कमांडो भरती

SPG मध्ये भरती व्हायचं म्हणजे सोपं काम नाहीये. थेट कोणालाही SPG मध्ये भरती होता येत नाही. तुम्हाला ठाऊक आहेच भारतीय लष्कर, नौदल किंवा हवाई दलात सामील होण्याकरिता परिक्षा द्यावी लागते. नियम अटींमध्ये बसणारा प्रत्येकजण ही परिक्षा देऊ शकतो. पण SPGची प्रक्रिया क्लीष्ट आहे. SPG चे पात्र सदस्यांची निवड ही IPS, CRPF, BSF आणि CISF यांच्यामधून केली जाते. बरं एकदा निवड झाली की वर्षांनुवर्ष तुम्ही SPG कमांडो म्हणून काम कराल असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा अंदाज चुकला. कारण प्रत्येक SPG कमांडोचा कार्यकाळ फक्त एका वर्षासाठीच मर्यादित असतो. एक वर्षांचा कार्यकाळ संपताच त्यांना त्यांच्या आधीच्या पदावर रुजू व्हावं लागतं आणि या पदासाठी परत नवीन सदस्यांची निवड होते.

SPG कमांडोचं ट्रेनिंग

आधी सांगितल्या प्रमाणे कुठलीही व्यक्ती सहजरित्या SPG मध्ये भरती होऊ शकत नाही. यामध्ये निवड झालेले कमांडो हे अतिशय अनुभवी आणि कौशल्यपूर्ण असतात. म्हणूनच त्यांची निवड SPG मध्ये होते. देशाची धुरा सांभाळणाऱ्याच्या सुरक्षेची जबाबदारी घेणारा प्रत्येक कमांडो खास असणारच. तर जेव्हा IPS, CRPF,BSF आणि CISF यांच्यामधून कमांडो निवडले जातात. तेव्हा त्यांना खास प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये शारिरीक, तांत्रिक प्रशिक्षणासह सदैव सजग कसं राहवं याबद्दलही विशेष प्रशिक्षण दिलं जातं. या कमांडोंवर पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी द्यायची म्हटल्यावर त्याच पद्धतीने त्यांचे प्रशिक्षण देऊन पारख केली जाते. त्यांना तीन महिने विशेष देखरेखीखाली ठेवले जाते. त्याचवेळी दर आठवड्यातून एकदा त्यांची परिक्षाही घेतली जाते. या परिक्षेत जर कमांडो अयशस्वी झाला तरी त्याला पुढच्या तुकडीत परत एकदा संधी दिली जाते. मात्र तेव्हाही ते नापास झाला तर त्याला त्याच्या संबंधीत युनिटमध्ये परत पाठवले जाते. अशाप्रकारे अत्यंत कठीण असे प्रशिक्षण SPG कमांडोंना दिले जाते.

SPG कमांडोंना मिळणारा पगार

आता तुम्हाला उत्सुकता लागून राहिली असेल की, इतके कठीण प्रशिक्षण पूर्ण करुन, अत्यंत जिकरीचे काम करणाऱ्या या कमांडोंना महिन्याचा पगार किती असावा? २४ तास सजग राहणाऱ्या या कमांडोला प्रतिमहीना सुमारे ८४ हजार २३६ रुपये ते २ लाख ३९ हजार ४५७ रुपयांपर्यत वेतन मिळते. एका सरकारी संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार यांचा बेसिक पे साधारणतः ५३ हजार १०० रुपयांपासून ते ६९ हजार ५०० पर्यंत असतो. बेसिक पेच्या ४० टक्के त्यांना गणवेशाचा भत्ता दिला जातो. पे कमिशन या संकेतस्थळानुसार SPG कमांडोंना २७ हजार २२५ रुपये तर नॉन ऑपरेशनल ड्युटीवर असलेल्या कमांडोंना २१ हजार २२५ रुपयांपर्यंत वार्षिक गणवेश भत्ता मिळतो.

आपला जीव मुठीत घेऊन देशाच्या पंतप्रधानांच्या आणि अन्य महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी २४ तास सज्ज असलेल्या या कमांडोंना मवाली कडून कडक सलाम! तर फ्रेंन्डस् तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा..


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *