सिक्रेट आलं समोर…एका प्रायव्हेट इव्हेंटसाठी सगळ्यात मोठी सुपारी घेते ‘ही’ व्यक्ती!

या गोष्टीला मराठी भाषेत सुपारी घेणे म्हणतात. आपले आवडते हिरो-हिरॉईन जेव्हा सेलिब्रिटी म्हणून कुठल्या इवेंट मध्ये येतात तेव्हा ते त्याची फी आकारतात.


बॉलीवूडशी आपलं असलेलं नातं खूप जुनं आहे. अगदी आपल्या आजोबां पासून ते आता पर्यंत एकावर एक हिट सिनेमा देणारे हिरो आणि हिरोईन नेहमीच आपल्याला जवळचे वाटले आहेत. ह्या हिरो हिरोईन्सची लाईफस्टाईल जाणून घेण्यात आपल्याला देखील खूप रस असतोच. त्यांचं ‘लार्जर दॅन लाईफ’ इमेज बघितली की आपल्याला नेहमी कुतूहल सुद्धा वाटतं.

तर मंडळी मला ह्या सेलिब्रिटीबद्दल एक प्रश्न नेहमी पडायचा आणि मला खात्री आहे की असा प्रश्न तुम्हाला सुद्धा कधी न कधी नक्की पडला असेल की हे स्टार्स डान्सचे किती पैसे घेत असतील?

हिरो हिरोइनच्या जगात त्यांच्या आयुष्यात नेमकं काय घडत आहे हे आपल्याला सगळ्यांना नक्कीच वाचायला आवडतं. जेव्हा आपल्या आवडत्या गाण्यावर आपल्या आवडत्या हिरो हिरोईन चे नृत्याविष्कार बघतो तेव्हा क्षण दोन क्षण आपल्यालाही असं वाटतं की आपण त्यांच्यासारखं आयुष्य जगलं पाहिजे. केवळ या अभिनेता आणि अभिनेत्रीना आपण मोठं बनवतो म्हणूनच ते ‘सेलिब्रिटीज’ बनतात.

या सेलिब्रिटीज आयुष जसं दिसतं तसं ते बिलकुल नसतं. असं सेलिब्रिटींच आयुष्य जगता यावं म्हणून ते खूप मेहनत घेतात. म्हणूनच की काय आज-काल या सेलिब्रिटिजना आपल्या सोहळ्यात बोलावण्याची रीत अगदी बळकट होत चालली आहे.

या गोष्टीला मराठी भाषेत सुपारी घेणे म्हणतात. आपले आवडते हिरो-हिरॉईन जेव्हा सेलिब्रिटी म्हणून कुठल्या इवेंट मध्ये येतात तेव्हा ते त्याची फी आकारतात. एक नजर टाकूया की आपले आवडते सेलिब्रिटी नक्की पैसे तरी किती घेतात.

बॉलीवूडचा किंग म्हणजेच शाहरुख खान हा कुठल्याही इव्हेंटमध्ये येण्याकरता तब्बल ३.५ कोटी रुपये आकारतो. अहो एवढ्या रुपयात किती जणांची लग्न होतील तो विचार करा.

Source : ytimg.com

बॉलिवूडची अभिनेत्री कत्रिना कैफ आपल्या मूव्हीज करता सगळ्या अभिनेत्रींमध्ये सगळ्यात जास्त फी आकारते. हीच कटरीना कैफ इवेंट्स मध्ये स्पेशल अपिअरन्स करता ३.५ कोटी फी घेते.

Source : i.ytimg.com

सुपरस्टार अक्षय कुमार याची फी किती असेल बरं. अहो ह्याच्या मूव्हीजमुळे तो प्रचंड फेमस आहे आणि म्हणूनच तो २.५ कोटी रुपये त्याची फी म्हणून आकारतो.

प्रियंका चोपडा या फिल्म स्टार बद्दल नव्याने काही सांगायला नकोच. ती एक ग्लोबल सेलिब्रिटी आहे आणि म्हणूनच ती पण कुठल्याही इवेंट करता २.५ कोटी रुपये तिची फी म्हणून घेते.

ऋतिक रोशन बॉलिवूडचा ग्रीक देव आहे. ऋतिक रोशन चा अभिनय छान आहेच पण त्याहून जास्ती तो एक उत्तम डान्सर आहे. तो बॉलीवूडच्या बेस्ट डान्सर्स मध्ये गणला जातो. ऋतिक रोशन पण रुपये २.५ कोट एवढी फी आकारतो.

Source : india.com

आता नवीन अभिनेत्यांपैकी काय सांगावं. एवर एनर्जेटिक रणवीर सिंग पण इव्हेंटमध्ये भाग येतो. लग्न समारंभात जर का रणवीर सिंगला बोलवायचं असेल तर एक कोट रुपये त्याची फी म्हणून तयार ठेवा.

तर बॉलिवूडची सुपरस्टार आणि रणवीर सिंग ची बायको दीपिका पदुकोण ही पण तितकेच पैसे घेते. दीपिकाची पर्सनालिटी बघून तर नक्कीच लोक तिला आपल्या लग्नात बोलवत असतील.

आता जरा आपण वळूया आपल्या भाईजान कडे म्हणजेच द ग्रेट सलमान खान. सलमान खानचं भलेही लग्न झालं नसेल पण लोक त्याला आपल्या लग्नात आवर्जून बोलवतात. सलमान खान प्रायव्हेट इव्हेंट मध्ये येण्याकरता दोन कोटी रुपये आपली फी आकारतो.

Source : ytimg.com

पाहिलंत मंडळी? म्हणजे आयुष्यभर आपण कितीही मेहनत करून कमवायचं म्हटलं तरी कमवता येणार नाही एवढी रक्कम हे एका दिवसात कमवतात…पण अर्थात हा पैसा त्यांना मिळतोय कारण आज ते स्वत:च्या मेहनतीनेच त्या लेव्हल पर्यंत पोहोचले आहेत!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *