ब्रिटिश सरकारमुळे आणि सत्तेत असलेल्या काही नेत्यांच्या हट्टामुळे १९४७ साली भारत देशाची विभागणी झाली आणि एक नवीन देश जन्माला आला, तो म्हणजे पाकिस्तान. ह्या विभागणी मुळे लोकांची मनं खूप कलुषित झाली आणि दोन्ही देशांमधील तणाव तसाच राहिला. हा तणाव आजही बघायला मिळतो. आपल्या देशाचं असं विभाजन झाल्यावर या दोन देशांना एकत्र ठेवण्याचा एक प्रयास होता ‘समझौता एक्सप्रेस’!
१९७१ साली भारत आणि बांगलादेश मध्ये युद्ध झाले. यातूनच समझौता एक्सप्रेसच निर्माण झालं. हा एक प्रयत्न होता भारत आणि पाकिस्तानला एकत्र ठेवण्याचा. समझोता एक्सप्रेसला ‘शांती का संदेश’ असंही म्हटलं जातं. पण दुर्भाग्य हे की ही रेल्वे ८ ऑगस्ट २०१९ साली थांबवण्यात आली. असे का केले हे जाणून घेण्याआधी जाणून घेऊया या करारा मागची कहाणी.
२२ जलै १९७७ साली ‘ शिमला समझौता’ कराराप्रमाणे समझौता एक्सप्रेस दोन देशांमध्ये धावू लागली. हा करार १९७२ साली तेव्हाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे प्रधानमंत्री जुल्फिकार अली भूटो या दोघांमध्ये झाला.
समझौता एक्सप्रेस भारताची राजधानी दिल्ली आणि भारताच्या सीमेवर असलेली जागा अटारी इथपर्यंत तर पुढे पाकिस्तानात अटारी ते लाहोर अशी दोन देशांमध्ये धावायची. सुरुवातीला ही ट्रेन अमृतसर ते लाहोर अशी धावायची. पण नंतर पंजाब मध्ये तणाव वाढल्यानंतर ही ट्रेन दिल्ली ते अटारी अशी धावायला लागली. पूर्वी ही ट्रेन रोज भारत-पाकिस्तान या दोन देशांमध्ये धावायची पण नंतर आठवड्यातून फक्त दोनदा ही ट्रेन धावू लागली.
लाहोरहून सोमवार आणि गुरुवार तर भारतातून ही ट्रेन बुधवार आणि रविवार अशी धावायची. कराराप्रमाणे या ट्रेनचा रेक आणि लोकोमोटिव (locomotive) सहा महिने भारताचा तर सहा महिने पाकिस्तानचा असा लावला जायचा. म्हणजेच समझौता एक्सप्रेस भारतीय रेल्वे कडून सहा महिने चालवली जायची तर सहा महिने पाकिस्तान रेल्वे यांच्याकडून चालवली जायची.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये जम्मू आणि काश्मीर वरून खूप तणाव निर्माण झाला. पुलवामा टेरर अटॅक यामध्ये ४० सीआरपीएफ जवान यांचा जीव गेला. यानंतर दोन्ही देशांमध्ये त्यांना इतका वाढला की दोन्ही देश एकमेकांची कुठलाही संबंध ठेवून नव्हते.
मग दोन्ही देशांमध्ये संबंध टिकून राहणे फारच कठीण गेले होते. अखेरीस, ८ ऑगस्ट २०१९ साली ही एक्सप्रेस कायमस्वरूपी थांबविण्यात आली.
भारत देश नेहमी मैत्रीचा हात पाकिस्तानपुढे करत असतो पण पाकिस्तान मात्र आपली मर्यादा सोडूनच वागतो. असं झालं की काही ठोस पावलं उचलावी लागतात. तूर्तास तरी समझोता एक्सप्रेस कुठल्याही समझौता खाली नाही.
0 Comments