मवाली बद्दल

‘मवाली’ हा शब्द वाचताच तुमच्या डोक्यात फुल टू टपोरी, राडेबाज, माफिया टाईप गुंड वगैरे अशी इमेज तयार झाली असेल, हो ना? हा, मग तुमच्या मनात तयार झालेले अर्ध इम्प्रेशन बरोबर आहे पण भिडू लोग तुमच्या बाकी इमेजीनेशनचा गेम करण्यात आम्ही सक्सेसफुल झालोय. कारण हो आम्ही आहोत मवाली, पण कंटेटच्या दुनियेतले मॉडर्न मवाली! बाकी आमची ओळख म्हणजे मराठी…वायरल..लीग!😉

आमचा एकच फंडा आहे की आपल्या वाचक गँगला बोअर झालं की त्यांना मवालीची आठवण यावी. म्हणजे इथे तुम्ही या, विविध विषयांवरची हटके माहिती वाचा, ट्रेंडिंग व्हिडीओज पहा, मिम्स पाहून हास्य थेरेपी घ्या आणि कोणत्याही मराठी वेबसाईटवर मिळणार नाहीत असे क्विझ, पोल्स आणि गेम्स खेळा. एका वाक्यात सांगायचं झालं तर, आता बोअर व्हायचं नाय, कारण टाईमपासला मवाली आहे ना भाय!😎