भगवान विष्णूंचे वाहन असणाऱ्या गरुडाचे नाव ज्याला दिले आहे त्या ‘गरुड कमांडो फोर्स’ बद्दल जाणून घ्या!

या विशेष तुकडीचे नाव आधी ‘टायगर फोर्स’ असे होते, पण नंतर त्याचे नाव बदलून ‘गरुड कमांडो फोर्स’ असे ठेवण्यात आले आहे.


‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ ही भारताची प्रतिज्ञा आपण लहानपणी शाळेत असल्यापासून बोलत व ऐकत आहोत. पण खरंच आपण या प्रतिज्ञेप्रमाणे वागतो? खरंच आपण आपल्या कृतींमधून आपल्या देशाचे संरक्षण करतो? याचे उत्तर बहुदा नाहीच असेल. म्हणूनच या आपल्या भारत देशाचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैन्य, वायुसेना, नौसेना सतत कार्यरत आहेत. ही तीन संरक्षण कवचे असल्यामुळे भारतातील नागरिकांच्या केसालाही धक्का लावण्याची कोणाची हिम्मत होणार नाही.

तसेच या संरक्षण दलांना मदत करण्यासाठी काही विशेष दलही नेमण्यात आले आहेत. आवश्यकतेप्रमाणे वेळोवेळी आशा विशेष दलांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये एनएसजी, पॅरा कमांडो, एसएफएफ, मार्कोस आणि एसपीजी व्यतिरिक्त एक आणखी खास आणि महत्वाचे दल आहे. हे दल म्हणणे ‘गरुड कमांडो फोर्स’ आहे.

भारतीय हिंदू पौराणिक कथांमध्ये, गरुडाला एक पौराणिक प्राणी, प्रचंड शक्तिशाली आणि भगवान विष्णूचे वाहन म्हणून संबोधले आहे. त्याच्या या वैशिष्ट्यांमुळे गरुड हे भारतीय वायुसेनेच्या एका विशेष सैन्य दलाचे नाव ठेवण्यात आले आहे.

भारतीय आर्मी कमांडो आज भारतीय नौदलाच्या मार्कोस प्रमाणे, ‘गरुड कमांडो फोर्स’ हे IAF चे कमांडो फोर्स बनवतात आणि ही फोर्स इतर दोघांपेक्षा जास्त क्षमतेची असते.

गरुड कमांडो फोर्स ही भारतीय वायुसेनेच्या अंतर्गत एक विशेष अवकाशीय दल आहे. त्याची स्थापना ५ फेब्रुवारी २००४ रोजी झाली. काश्मीरमध्ये दोन हवाई दलाच्या तळांवर २००१ साली दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतीय हवाई दलाने ही विशेष तुकडी अशा गंभीर प्रकरणांना तोंड देण्यासाठी तयार केली. यातील कमांडोना स्पेशल फोर्सचे प्रशिक्षण दिले जाते ज्यात ते शोध आणि बचाव कार्य करतात, गुप्तचर माहिती गोळा करतात आणि तसेच बंडखोरीविरुद्ध कारवाया देखील करतात. या विशेष तुकडीचे नाव आधी ‘टायगर फोर्स’ असे होते, पण नंतर त्याचे नाव बदलून ‘गरुड कमांडो फोर्स’ असे ठेवण्यात आले आहे.

गरुड कमांडो फोर्सकडे अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपावलेल्या आहेत. हे दल एअरबोर्न ऑपरेशन, कॉम्बँट सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन, काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन, काउंटर टेररिझम, डायरेक्ट ऍक्शन, फायर सपोर्ट, होस्टेस रेस्क्यू, एअर असॉल्ट, एअर ट्राफिक कंट्रोल, क्लोज क्वार्टर कॉम्बाट इत्यादींमध्ये सक्रियतेने कार्यरत असते.

Source: junglekey.in

‘गरुड कमांडो फोर्स’ ही एक विशेष तुकडी असल्याने त्यांचे प्रशिक्षणही अतिशय कडक आणि विशेष असते. सैन्यात भरती झाल्यानंतर सैनिकांना ५२ आठवडे मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो.

तीन महिन्यांच्या प्रोबेशन कालावधीत यातील उत्तम जवानांची पुढील प्रशिक्षणासाठी निवड केली जाते. असेही म्हटले जाते की, गरुड कमांडोना एकूण अडीच वर्षे कठोर प्रशिक्षण घ्यावे लागते. या प्रशिक्षणात त्यांना आगीतून जावे लागते, नद्या पार कराव्या लागतात, जड ओझे घेऊन अनेक किलोमीटर चालावे लागते.

याचसोबत या कमांडोना SSF आणि NSG सारख्या इतर विशेष दलांसोबत देखील प्रशिक्षण करावे लागते. या प्रशिक्षणातील यशस्वी सैनिकांना पुढील तीन महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. त्याचबरोबर हे प्रशिक्षण उत्तीर्ण झालेल्या सैनिकांना आग्रा येथे पॅराशूट ट्रेनिंग स्कूलमध्ये पाठवले जाते. यानंतर, गरुड कमांडोना मिझोराममधील काउंटर इन्सर्जन्सी आणि जंगल वॉरफेअर स्कूलमध्ये पुढील प्रशिक्षणासाठी पाठवले जाते.

Source: hmoob.in

गरुड कमांडो दलात सध्या १०८० बलवान आणि शक्तिशाली गरुड कार्यरत आहेत. गरुड हवाई योध्यांना IAF च्या रँकिंगमध्ये एअरमन म्हणून समाविष्ट केले जाते. या दलातील कमांडो १५ सैनिकी विमानांमध्ये कार्यरत आहेत. गरुड कामांडोचे नेतृत्व स्क्वॉड्रन लीडर, फ्लाईट लेफ्टनंट या दर्जाच्या अधिकाऱयांद्वारे केले जाते.

भारतीय वायुसेनेप्रमाणेच या गरुड कमांडो दलाला महत्व आहे. काय मग आहे की नाही हे गरुड दल गरुडाप्रमाणे शक्तिशाली आणि चलाख?


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Gayatri Gurav