अरुण गवळी आणि बाळासाहेब ठाकरेंमध्ये ‘ह्या’ कारणामुळे निर्माण झाली दुश्मनी!

त्यावेळी दाऊदशी पंगा घेण्याची कोणाची हिंमत होत नसे. मात्र अरुण गवळी त्याला बिनधास्त भिडत होता.


नमस्कार मंडळी, अवघ्या महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकऱ्यांची भाषण शैली चांगलीच परिचयाची आहे. आपल्या भाषणातून खदखदून हसवणारे बाळासाहेब, विरोधकांनाही हसवत हसवत कोपळ खळ्या मारत तर कधी अगदी शाल जोडीतले टोमणेही मारत. त्यांच व्यक्तिमत्त्वच बिनधास्त आणि बेधडक होतं. त्यामुळे बाळासाहेबांची प्रत्येक भाषणं नेहमीच चर्चेचा विषय ठरायचं. अशाच एका भाषणात बाळासाहेब म्हणाले होते,

“दाऊद तुमचा तर गवळी आमचा.” झालं… या वाक्यावरुन गदारोळच उठला की हो… काढणाऱ्यांनी त्याचा अर्थ भलताच काढला.

म्हणजे दाऊद मुस्लिम तर गवळी हिंदू म्हणून गवळींना बाळासाहेबांचा पाठिंबा असंच सगळ्यांना वाटलं. अगदी खुद्द गवळीलाही असंच वाटलं होत. नक्की काय होतं प्रकरण? खरचं गवळी आणि बाळासाहेबांचं काय नातं होतं? का

Source: india.com

महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा प्रचार सुरू होता. बाळासाहेबांनी एका सभेत कॉंग्रेसवर आणि प्रामुख्याने शरद पवारांवर बाळासाहेबांनी टिकास्त्र उगारले असतानाच, वक्तव्य केलं, ‘’की जर तुमच्याकडे दाऊत आहे, तर आमच्याकडे गवळी आहे.’’ बाळासाहेबांनी हे वक्तव्य इतक्या बेधडक पणे कसे केले हे जर जाणून घ्यायचे असेल तर इतिहासात जरा डोकवावे लागेल.

शिवसेनेचा आवाज नुकताच विधानसभेत पोहचला होता. हाच तो काळ ज्यावेळेस दाऊद मुंबईचा डॉन झाला होता. त्यावेळी दाऊदशी पंगा घेण्याची कोणाची हिंमत होत नसे. मात्र अरुण गवळी त्याला बिनधास्त भिडत होता. त्यामुळे अरुण गवळी त्यावेळी दाऊदचा एकमेव शत्रू. त्यादरम्यान मुंबईत अरुण गवळी आणि दगडी चाळीची चांगलीच दहशत माजली होती. दोन्ही गॅंग मध्ये चांगलच टशन होतं. दाऊदचा भाऊ इब्राहम पारकरचा गवळीने गेम केला, म्हणजे मारलं हो. त्यामुळे गवळी गॅंगची माणसं पोलीसांच्या ताब्यात होती आणि त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार घेत होती.

दाऊद रागाने पेटला होता. त्याने आपल्या भावाच्या शुटरचा बदला घेण्याचे ठरविले. आणि त्यातूनच जेजे हॉस्पिटलचं कांड घडलं. दाऊदची माणस रात्रीच्या वेळी जेजेमध्ये घुसली आणि त्यांनी दोन्ही शुटरला संपवून भावाच्या खुनाचा बदला घेतला. या घडलेल्या जेजे हॉस्पिटल हत्याकांडामध्ये एक दाऊदला भिवंडीच्या तत्कालीन महापौरांनी मदत केली. त्या महापौरांमुळे दाऊदची माणसे जेजे मधून फरार होऊ शकली.

Source:https: www.abinet.org

याच आरोपाखाली संबंधित महापौरांना अटकही झाली. दाऊदच्या माणसांना पळून जाण्यासाठी या महाशयांनी गाडी दिल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. आणि अर्थातच विधानसभेत त्याचे पडसाद पहायला मिळाले. या घटनेमुळे दाऊदला कॉंग्रेसचा पाठिंबा असल्याचे चित्र निर्माण झाले आणि मग विरोधकांनी आणि विशेषतः बाळासाहेब ठाकऱ्यांनी कॉंग्रेस दाऊदला पोसतोय असे आरोप केले. त्यावेळी दाऊद आत्तासारखा अंतरराष्ट्रीय दहशदवादी नव्हता बरं. त्याची ओळख मुंबईचा डॉन इतकीच मर्यादित होती. त्यामुळे दाऊद काय किंवा गवळी काय सगळ्यांसाठी दोघेही सारखेच होते.

मात्र १९९३ साली मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊदचा खरा चेहरा समोर आला. त्यानंतर शिवसेना चिडली आणि कॉंग्रेसने दाऊदसारख्या गुंडांना पाठिशी घातलं आणि म्हणूनच मुंबईला सोसावं लागलं, हे मुंबईकरांच्या मनावर ठसवण्यात त्यांना यश मिळाल. याच पार्श्वभूमिवर विधानसभा निवडणूकीच्या प्रचारसभेत बाळासाहेबांनी वक्तव्य हे केलं होतं, ‘’दाऊद तुमचा तर गवळी आमचा..”

झालं, यानंतर अरुण गवळींचा गोड गैरसमज झाला. आपण हिंदू म्हणून बाळासाहेबांचा आपल्याला पाठिंबा आहे असंच त्याला वाटू लागलं. बरं हे फक्त त्यालाच नाही तर बऱ्याच जणांनी या वक्तव्याचा अर्थ तोच लावला. पण लवकरच त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला आणि गवळी-शिवसेनेत नवीन नातं निर्माण झालं. हे नातं मैत्रीच नसून शत्रुत्वाचं होतं.

मुंबईत, दाऊद गॅंग, गवळी गॅंग, नाईक गॅंग सह छोट्यामोठ्या गॅंग सक्रीय होत्या. त्यामुळेच मुबईत सतत गँगवॉर सत्र चालू झालं. अर्थातच कायदा आणि सुव्यवस्था ढवळून निघाली. राज्यसरकारवर दबाव येऊ लागला. मग असं म्हटलं जातं तत्कालीन गृहमंत्री गोपिनाथ मुंडे यांनी एन्कॉऊंटर स्किम चालू केली. आणि गॅंग प्रथेला सुरुंग लावला. प्रत्येक गॅंगमधून दहा गुंडांची यादी केली गेली. आणि त्यानंतर त्यांचे एनकॉऊंटर करण्यात आले. अर्थात यात गवळी गॅंगचाही समावेश होता.

अरुण गवळींचा गोड गैरसमज होता की, युतीचं सरकार म्हणजेच आपलं सरकार. मात्र त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला. कोणतीही गय न करता गवळी गॅंगच्या गुंडांनाही मारण्यात आले. तेव्हा अरुण गवळी औरंगाबादच्या जेलमध्ये बसून गॅंगची सूत्र पहात होता. मात्र औरंगाबादच्या जेलमधून अमरावतीच्या जेलमध्ये त्याची उचलबांगडी करण्यात आली.

मोठ्या शिताफीने गवळीचं औरंगाबाद नेटवर्क उध्वस्त करुन टाकलं. या प्रकरणानंतर गवळी चांगलाच भडकला. यासगळ्यामागे बाळासाहेबांचे मानस पुत्र जयंत जाधव हे मास्टर माईंड होतं असं म्हटलं जातं. जाधवांचा शब्द अंतिम म्हटला जायचा. इथे गवळीच्या मनात, शिवसेनेने माझ्या नावाचा वापर करुन सत्ता मिळवली आणि आता गरज संपली तसं गवळी गॅंगला संपविण्याचा विडाच उचलला, अशी गवळीची भावना झाली. त्याने अमरावतीमध्ये स्वतः नेटवर्क निर्माण केलं आणि जयंत जाधवांची हत्या केली. मात्र या हत्येचा साक्षीदार फिरल्यामुळे अरुण गवळीची या केसमधून सुटका झाली.

गवळी तुरुंगाबाहेर सुटू नये म्हणून शिवसेनेच्या खासदासरांनी पोलीस चौकीसमोर उपोषण- आंदोलने केली होती. पण त्याचा काही परिणाम झाला नाही, उलट आता दगडी चाळीला हे सरकार आपलं नाही याची खात्री पटली. आणि मग बाळासाहेब आणि गवळी यांच्या कधीही न झालेली मैत्री तुटली व शत्रुत्त्व निर्माण झालं.

गवळी शांत बसणाऱ्यातला नव्हता. त्याने बाळासाहेबांविरुध्द दंड थोपाटले. शिवसेना नेते जितेंद्र दाभोळकरांना हाताशी घेऊन गवळीने अखिल भारतीय सेना पक्ष स्थापन केला. दाभोळकर या पक्षाचे मास्टर माईंड झाले. त्यापुढे अनेक शिवसैनिकांना फितवण्यात आलं. बऱ्याच शिवसेना शाखांवर अखिल भारतीय सेनेचे बोर्ड चढू लागले. आता भारतीय सेना, शिवसेनेला डोईजड ठरेल की काय अशी भीतीच शिवसेनेतल्या नेत्यांना वाटू लागली. मात्र काही दिवसांतच जितेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली, त्यानंतर अखिल भारतीय सेनासुध्दा ठप्प झाली.

दाभोळकरांची हत्या देखिल शिवसेनेनेच केली असा आरोप शिवसेनेवर लावला गेला. या सगळ्यानंतर अरुण गवळीची ओळख फक्त दगडी चाळीपुरतीच मर्यादित राहिली. त्यानंतर गवळी राजकारणात आला..आणि पुढे काय घडलं हे सर्वांना ज्ञात आहेच. एकूणच काय पुढे अरुण गवळीच्या राजकीय कारकिर्दीला शिवसेनेमुळे कायमचा खीळ बसला.

मात्र २०१४ साली गवळीची कन्या गीता गवळी विधानसभा निवडणुकीला उभ्या राहिल्या. यावेळी मात्र शिवसेनेने जनतेला धक्काच दिला. कारण शिवसेनेने गीता गवळींच्या विरोधात उमेदवारच उभा केला नाही. आता ही गवळी आणि शिवसेनेच्या शत्रुत्त्व संपुष्टात आल्याची चाहूल म्हणायची की आणखी काही?


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *