नवऱ्याने अवघ्या 500 रुपयांत विकलं आणि…..

तिने त्याच्याशी लग्न केलं आणि मुंबईला पळून आली. तिला खरं तर अभिनेत्री व्हायची स्वप्न खुणावत होती. आशा पारेख आणि हेमा मालिनी तिच्या आदर्श होत्या.


आलिया भटच्या कारकिर्दीमधील महत्त्वाचा चित्रपट ‘गंगुबाई काठीयावाडी’ मधून आलियाच्या सक्षम अभिनयाची चुणूक दिसली. पण या पेक्षा सुद्धा गंगुबाई काठीयावाडी या पात्राबद्दल लोकांच्या मनात एक उत्सुकता निर्माण झाली आणि त्याचे श्रेय सुद्धा आलीयाच्याच अभिनयाला जाते. आज आपण सुद्धा हेच जाणून घेऊया की कोण होती गंगूबाई काठियावाडी? असं काय होतं तिच्यात की संजय लीला भंसाली सारख्या मोठ्या दिग्दर्शकाला त्यावर चित्रपट साकारावासा वाटला?

तर गोष्ट सुरु होते साधारणतः ६०च्या दशकामध्ये, जेव्हा मुंबईतल्या कामाठीपुराच्य गल्ल्यांमध्ये गंगूबाई काठियावाडीची नावाची दहशत सुरु होऊ लागली होती.

Source: Youtube.com

कामाठीपूरात असलेली प्रत्येक मुलगी तिच्या स्वतःच्या मर्जीविरुध्दच आली असते. देहविक्री शिवाय तिच्यासमोर कुठलाच मार्ग उरलेला नसतो. समाजात परत जाण्याचे मार्ग पुरते बंद झालेले असतात. प्रत्येकीची कथा ही ह्रदय पिळवटून टाकणारी. गंगूबाई काठियावाडी त्यातलीच एक सेक्स वर्कर. खरंतर गंगू गुजरातच्या काठियावाडची म्हणूनच तीने तिचं नाव गंगूबाई काठियावाडी लावण्यास सुरुवात केली होती. तर गुजरातमध्ये १६ वर्षांची गंगू तिच्या वडिलांच्या हाताखाली काम करणाऱ्या अकाउंटंटच्या प्रेमात पडली. तिने त्याच्याशी लग्न केलं आणि मुंबईला पळून आली. तिला खरं तर अभिनेत्री व्हायची स्वप्न खुणावत होती. आशा पारेख आणि हेमा मालिनी तिच्या आदर्श होत्या.

पण गंगूच्या नशिबी काहीतरी वेगळचं लिहलं होतं. तिची वाट चुकली होती. तिने चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केलं आणि त्याची शिक्षा तिला आयुष्यभर भोगावी लागली. चित्रपट अभिनेत्री तर होऊ शकली नाही पण तिच्यावरच एक चित्रपट साकारला जातोय.

गंगूला मुंबईत आणून तिच्या नवऱ्याने अवघ्या ५०० रुपयात तिचा सौदा केला. आणि गंगू कामाठीपूऱ्यात येऊन पडली. त्यानंतरचं तिचं आयुष्य भयावहच होतं. एकदा तर माफिया डॉन करीम लालाच्या गॅंगमधल्या एका गुंडाने गंगूवर बलात्कार केला. आधीच आयुष्याचं पोतेरं झालेल्या गंगूला हे सहन झालं नाही. ती चिडली आणि थेट करिम लालाकडे न्याय मागितला.

गंगूबाईने करिमला राखी बांधली आणि तिच्या आयुष्याला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली. बघता बघता गंगूची आता गंगूबाई डॉन झाली. कामाठीपुऱ्यात जबरदस्तीने आलेली गंगू, कोठे चालवू लागली. मात्र कुठल्याही मुलीच्या मर्जीशिवाय तिला देह विक्री करायला लावणं हे तिला अमान्य होतं. ती कायम सेक्स वर्कर्सच्या अधिकारासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी झटत राहिली, ते ही बेधडक. बघता बघता गंगूबाईचा दबदबा इतका वाढला की मुंबईच्या अंडरवर्ल्ड डॉन्स ते राजकारणी सगळेच गंगूबाईशी कायम संपर्कात असे.

गंगुबाई हे नाव जरी माफिया वर्ल्ड मधले असले तरी या नावाने तेथील स्थानिकांच्या मनावर कधीही न पुसले जाणारे वलय निर्माण केले. जे आजवर सुद्धा कायम आहे. आजही कामाठीपुराच्या गल्ल्यांमह्द्ये गंगुबाई नावाचा वास आहे जो तिथे घुटमळताना आपला पिच्छा सोडत नाही!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *