काश्मिरी पंडितांचा खुनी बिट्टा कराटे आजही बाहेर का? त्याला शिक्षा का झाली नाही?

‘काश्मिरी पंडितांचा कसाई’ म्हणून ओळखला जाणारा भयंकर दहशतवादी बिट्टा कराटे उर्फ फारूक अहमद दार याने १९८९ च्या बंडखोरीदरम्यान काश्मिरी खोऱ्यातील २० हुन अधिक लोकांची हत्या केल्याचे उघडपणे कबूल केले आहे.


आपण सर्वांनीच आतापर्यंत ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटात दाखवलेले काश्मिरी पंडितांवरील अत्याचार बघून सर्वांनाच दुःख झाले आहे. त्यात दाखवलेली दृश्ये पाहून आपल्या सर्वांच्याच अंगावर काटा येतो. ज्यांनी ते अत्याचार सहन केले किंवा स्वतःच्या डोळ्यांसमोर पाहिले त्यांची काय अवस्था झाली असेल याचा विचार देखील करवत नाही. या चित्रपटातील मुख्य खलनायक बिट्टा कराटे नावाचे पात्र खूपच चर्चेचा विषय ठरले आहे. कोण आहे हा बिट्टा कराटे आणि का त्याच्याबद्दल एवढी चर्चा सुरू आहे ते जाणून घेऊयात.

Source: sacnilk.com

चित्रपटात चिन्मय मांडलेकरने फारुख अहमद उर्फ बिट्टा कराटे या प्रमुख खलनायकाची भूमिका केली आहे. ही भूमिका आणि हा बिट्टा कराटे भारतीयांमध्ये खूप चर्चेचा विषय बनले आहेत. मार्शल आर्टमधील प्रभुत्वामुळे त्याला ‘कराटे’ हे नाव पडल्याचे सांगितले जाते.

‘काश्मिरी पंडितांचा कसाई’ म्हणून ओळखला जाणारा भयंकर दहशतवादी बिट्टा कराटे उर्फ फारूक अहमद दार याने १९८९ च्या बंडखोरीदरम्यान काश्मिरी खोऱ्यातील २० हुन अधिक लोकांची हत्या केल्याचे उघडपणे कबूल केले आहे. या कबुलीनंतर आपल्या सगळ्यांच्याच मनात एकच प्रश्न घोंगावत आहे तो म्हणजे  ‘जर बिट्टा काराटेने काश्मिरी पंडितांच्या हत्येची कबुली दिली आहे तर त्याला अफजल गुरुप्रमाणे फाशी का दिली गेली नाही?’

बिट्टा कराटे याने दहशतवादी प्रशिक्षणासाठी नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश केला. त्याने तिथे जवळजवळ महिनाभर सशस्त्र लष्करी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर कराटे आणि त्याचे इतर दहशतवादी अतिरेक्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद आणि बंडखोरी कारवाया सुरू केल्या.

पाकव्याप्त काश्मीरमधून परत आल्यावर बिट्टाने १९९० च्या वांशिक निर्मूलनात आणि काश्मिरी पंडितांच्या निर्गमन करण्यात विनाशकारी भूमिका बजावली. त्याने त्याच्या कबुली व्हिडीओमध्ये वीस पेक्षा जास्त काश्मिरी पंडितांची हत्या केल्याचा दावा केला आहे.

त्याचा पहिला बळी हा व्यापारी सतीश टिकू होता जो हिंदू राष्ट्रवादी पक्षाचा (आरएसएस) सदस्य असल्याचा कराटेने दावा केला आहे. त्याच्या JKLF कमांडरकडून आदेश मिळाल्यानंतर कराटेने टिकुला गोळ्या घातल्या होत्या. त्यानंतर बिट्टा काश्मिरी पंडितांच्या शोधात आपली ओळख न लपवत श्रीनगरच्या रस्त्यांवर फिरत असे आणि कोणताही पंडित दिसल्यावर त्याला तिथेच ठार करत असे.  

१९८९-९० च्या पंडितांच्या नरसंहारामध्ये देखील कराटेचा मोठा हात होता. या नरसंहारादरम्यान त्याने २० ते ३० लोक मारल्याचा अंदाज आहे. पंडित नारसंहारानंतर सुमारे ५६,००० काश्मिरी पंडित कुटुंबे काश्मीर सोडून स्थलांतरित झाली. यापैकी सुमारे ३५,००० कुटुंबे जम्मूमध्ये, १९,००० दिल्लीत आणि उर्वरित देशाच्या इतर भागांत स्थायिक झाले आहेत.

बिट्टा कराटे आणि त्याच्या साथीदारांना भारतीय सैन्याने जून १९९० मध्ये श्रीनगरमधून अटक केली होती. त्याला पब्लिक सेफ्टी ऍक्ट (PSA) अंतर्गत अटक केली होती आणि त्याच्यावर १९ हुन अधिक दहशतवादाशी संबंधित खटले दाखल करण्यात आले होते. तो साधारण १५ वर्षे अटकेत होता आणि अखेरीस २००६ मध्ये अनिश्चित काळासाठी जामिनावर त्याची सुटका झाली.

नजरकैदेतून सुटल्यानंतर तो जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (आर) मध्ये सामील झाला. तेथे त्याने काम केले आणि तो अध्यक्ष झाला. काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर २०१९ मध्ये नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी (NIA) ने त्याला पुन्हा दहशतवादी संघटनेच्या फंडिंगच्या आरोपाखाली अटक केली.

अफजल गुरूला फाशीची शिक्षा झाली, अजमल कसाबला फाशी झाली, याकूब मेननला फाशीची शिक्षा झाली तर बिट्टा कराटेसारख्या हैवानाला अजूनही फाशीची शिक्षा का झाली नाही असा सवाल काश्मिरी पंडितांसह सर्वांनाच सतावत आहे.

‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटानंतरतरी सरकारचे डोळे उघडतील आणि या हैवानाला फाशीची शिक्षा लवकरच होईल अशी अपेक्षा आहे.


One Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

  1. Yakub Menon? याकूब मेनन?

    तुमच्या सगळ्या #लोकमत ग्रुप वर कोणत्यातरी मेनन ने अब्रू नुकसानीचा दावा ठोकला पाहिजे.
    दीड दमदीचे पत्रकार. 🤬😡😠

    #Lokmat Yakub Abdul Razzaq Memon was a convicted terrorist over his financial involvement in the 1993 Bombay bombings, and the brother of one of the prime suspects in the bombings, Tiger Memon. After his appeals and petitions for clemency were all rejected, he was executed at Nagpur Central Jail on 30 July 2015.

Gayatri Gurav