बऱ्याचदा आपण असे शब्द वापरतो की ज्याचा अर्थ निराळाच असतो. हे असं अनेक जणांकडून घडतं. हळूहळू चुकीच्या शब्दांची लोकांना सवय होऊ लागते आणि चुकीचे शब्द वापरात आणले जातात. दोन समानार्थी शब्द वापरले तर ठीक आहे पण जवळचा अर्थ असणारे दोन शब्द वापरले तर त्याचा अर्थ वेगळा वेगळा होऊ शकतो.
आता हेच बघा ना लॉयर हा शब्द एडवोकेट करता वापरला जातो तर मॅजिस्ट्रेट आणि जज या मधला फरक अनेकांना माहिती नाही. लॉयर आणि एडवोकेट हे दोन जवळचे शब्द आहेत त्याचप्रमाणे जज आणि मॅजिस्ट्रेट या दोघांमधील अंतरही खूप कमी आहे.
दोघांचे वेगवेगळे अर्थ जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दोन जवळच्या शब्दांचा अर्थ जाणून घेण्यात एक वेगळीच मजा आहे. चला तर मग नक्की काय फरक आहे लॉयर आणि एडवोकेट मध्ये आणि जज व मॅजिस्ट्रेट मध्ये!
लॉयर आणि एडवोकेट दोघेही LLB ची परीक्षा पास असतात म्हणजेच दोघेही LLB असतात. तरीपण दोघांमध्ये खूप फरक असतो. ज्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आहे आणि एकही केस लढली नाहीये त्याला लॉयर म्हणतात. तर एडवोकेट तो असतो जो LLB पदवीधर आहे आणि दुसऱ्या माणसाची केस कोर्टात मांडतो.
केस लढण्याआधी लॉयरला बार काउन्सिलची परीक्षा द्यावी लागते. तेव्हाच तो लॉयर एडवोकेट बनतो. याव्यतिरिक्त एडवोकेटला बार काउन्सिल मध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं. हा फरक आहे एका लॉयर आणि एडवोकेट मध्ये.
आता आपण बघूया एका मॅजिस्ट्रेट आणि जज मध्ये काय फरक असतो ते! ग्रेड्स आणि पावर्स या दोन गोष्टींमुळे एडवोकेट आणि जज मध्ये फरक पडतो. मॅजिस्ट्रेटचे वेगवेगळे स्तर किंवा ग्रेड्स असतात. CJM म्हणजेच चीफ ज्यूडीशीयल मॅजिस्ट्रेट ही पदवी सगळ्यात वरची असते. एका जिल्ह्याकरिता EX CJM असतो.
त्याच प्रमाणे Sub Judge ही पदवी CJM लेव्हलची असते. या दोघांमध्ये फरक असा आहे की Sub Judge सिव्हिल केसेस बघतात तर CJM क्रिमिनल केसेस बघतात. CJM च्या खाली मुंसिफ आणि मॅजिस्ट्रेट हे असतात. मुंसिफ सिव्हिल केसेस बघतात तर मॅजिस्ट्रेट क्रिमिनल केसेस घेतात.
मॅजिस्ट्रेटकडे जेवढी पॉवर असरे तेवढी जज कडे नसते. जज फाशी किंवा आजीवन कारावास ही शिक्षा ठोठावू शकत नाहीत.
मुख्य महानगर मॅजिस्ट्रेट, कार्यपालक मजिस्ट्रेट, मॅजिस्ट्रेट फर्स्ट सेकंड या पदव्या असतात. CJM या पदवीच्या वर Judge ची पदवी असते. जेव्हा Judge क्रिमिनल केसेस बघतात तेव्हा या पदवीला Sessions Judge असे म्हणतात. याव्यतिरिक्त हायकोर्ट चार्ज, सुप्रीम कोर्ट जज ही सुद्धा काही पदे असतात.
तर मंडळी तुम्हाला आता लॉयर आणि एडवोकेट तसंच मॅजिस्ट्रेट आणि जज यामधला फरक कळला असेल ना? मग ही माहिती इतरांसोबत सुद्धा शेअर करा की!
0 Comments