रशियन मॉडेल ग्रेटा वेडलर जिने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना मनोरुग्ण म्हणून उद्गारले होते, ती बेपत्ता झाली आणि एक वर्षाहून अधिक काळानंतर सूटकेसमध्ये मृतावस्थेत सापडली आहे. पुतीन हे आपल्यावर आरोप करणाऱ्या कोणालाच सोडत नाहीत अशी एक त्यांची प्रतिमा जगभर आहे आणि त्यामुळे ग्रेटा वेडलरला पुतीन यांनीच नॉकआउट केल्याची चर्चा आहे. पण खरंच असं आहे का? यामागे काय गूढ दडले आहे ते जाणून घेऊया!
पुतिन यांचा सोशल मीडियावर मनोरुग्ण म्हणून उल्लेख करणारी रशियन मॉडेल ग्रेटा वेडलर काही दिवसातच बेपत्ता झाली आणि एक वर्षाहून अधिक काळानंतर सूटकेसमध्ये मृत अवस्थेत सापडली.
ग्रेटा वेडलर ही रशियाची २३ वर्षीय मॉडेल होती, जिचा राजकारणावर अतिशय विश्वास होता आणि तेवढीच ठाम तिची राजकीय मते होती. फॉक्स न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, ग्रेटा वेडलरने वर्षभरापूर्वी पुतिन यांना मनोरुग्ण म्हटले होते. तेव्हापासून ती गायब झाली होती. परंतु, तिचं सोशल मीडिया अकाउंट सुरूच होतं. त्यामुळे ती गायब झाल्याचा संशय कोणालाच आला नाही.
एव्हगेनी फॉस्टर नावाच्या ग्रेटा वेडलरच्या मैत्रिणीला या गोष्टीचा संशय आला आणि मॉस्कोमध्ये हरवलेल्या व्यक्तीची केस दाखल करण्यासाठी तिला एक मित्र सापडला आणि शेवटी केस दाखल केल्यावर शोध सुरू झाल्यानंतर तिचा मृतदेह सापडला.
तर सगळ्यांना असा संशय होता की पुतीन यांनीच तिला गायब केले आहे. पण हा दावा पूर्णपणे फोल ठरलेला असून तिच्या बॉयफ्रेंडनेच तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. त्याने स्वत:हून आपला हा गुन्हा कबूल केले आणि झालेली सर्व घटना सांगितली.
ग्रेटाचा २३ वर्षीय तेवीस एक्स बॉयफ्रेंड दिमित्री कोरोविन याने मॉस्कोमध्ये पैशाच्या वादानंतर तिचा गळा दाबून खून केल्याचे कबूल केले. कोरोविनने त्यापुढे असेही सांगितले की, त्याने नविन सुटकेस विकत घेतली आणि त्यात तिचा मृतदेह लपवून ठेवला. एवढे करून तो पळाला नाही तर तिच्या मृतदेहासोबत तीन रात्री तो हॉटेलच्या खोलीत झोपला होता. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह ३०० मैल दूर रशियाच्या लिपेटस्क प्रदेशात नेला आणि एक वर्षापेक्षा जास्त काळ कारच्या बूटमध्ये लपवून ठेवला होता. शिवाय त्याने असेही कबूल केले आहे की त्याने मॉडेलच्या सोशल मीडिया खात्यावर फोटो आणि संदेश पोस्ट केले जेणेकरून मित्रांना विश्वास बसेल की ती अजूनही जिवंत आहे.
जानेवारी २०२१ मध्ये हत्येच्या एक महिना आधी, ग्रेटा वेडलरने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर पुन्हा एकदा सोव्हिएत रशिया बनव्ण्यच्या ध्येयावर कडाडून टीका केली होती आणि यामुळे ती अधिक वायरल सुद्धा झाली होती.
पुतिन यांच्याबद्दल ती पुढे असेही म्हणाली की, तिच्या मते पुतिन हे मनोरुग्ण आहेत आणि ते रशियाची अजून वाट लावतील. ग्रेटा वेडलरला पुतिन यांचू हुकुमशाही मान्य नव्हती आणि अखंड रशिया पुन्हा काबीज करण्याचे त्यांचे ध्येय वेडेपणा असल्याचे तिला वाटत होते. पण या टीकेचा तिच्या मृत्यूशी काहीही संबंध नसल्याचे आता स्पष्ट झाले असून ग्रेटा वेडलरचा मृत्यू पुतिन यांनी घडवून आणल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
ग्रेटाची हत्या आणि तिने पुतिन यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा कोणताही संबंध नसल्याचे जरी सांगितले जात आहे तरी अनेकांनी पुतिन कोणत्याही थराला जाऊ शकतात हे आपने मत मात्र कायम ठेवले आहे!
0 Comments