रुळावरून घसरलेली भली मोठी ट्रेन पुन्हा रुळावर कशी आणतात? ही आहे तंत्रज्ञानाची अनोखी कमाल!

ट्रेन ही काही छोटी कार किंवा बाईक नाही जी उचलली आणि रुळावर पुन्हा ठेवली. ट्रेन रुळावर आणण्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे.


आपण नेहमी बातम्यांमध्ये ट्रेन रुळावरून घसरली आहे किंवा ट्रेनचे काही डब्बे रुळावरून घसरले आहेत अशा बातम्या ऐकत असतो. या ट्रेन नेहमीच रुळावरून कशा घसरतात? त्यामागे नेमके कारण काय आहे? बरं, या घसरलेल्या ट्रेन पुन्हा रुळावर कशा आणतात? इंडियन रेल्वे त्यासाठी नेमकं काय करते ? हे आणि यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण शोधुयात.

नैसर्गिक गोष्टी जसे की पाऊस, अति धुकं, बाष्प वगैरे गोष्टींमुळे रेल्वे ट्रॅकवर परिणाम होऊन ते घसरडे होतात. कधीकधी रेल्वेच्या दुर्लक्षामुळे देखील रेल्वे ट्रॅक घसरडे किंवा रेल्वे गाड्यांची पकड कमी होते. यामुळे ट्रेन पॉवर घेत असताना व्हीलस्लीप होऊ शकते किंवा ट्रेन ब्रेक मारत असताना व्हीलस्लाईड होऊ शकते.

Source: bbc.com

रेल्वे ट्रॅक खराब होण्याचे मुख्य कारण म्हणजे झाडाची गळून पडलेली ओलसर पाने रेल्वे ट्रॅकच्या वरच्या बाजूला पडतात. या परिस्थितीमुळे ट्रेनची चाके आणि ट्रॅक यांच्यातील घर्षणात लक्षणीय घट होते.

रेल्वे अपघातात ट्रेनच्या वेगाचा सुद्धा मोठा वाटा असतो. वेगामुळे अनेकदा रेल्वे अपघात होतात. भारतातील बहुतांश रेल्वे ट्रॅक हे बरेच जुने आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे कामही नीट होत नसल्याने ते अपघाताचे एक मोठे कारण बनते. त्याचप्रमाणे रेल्वे अपघातांमध्ये इमर्जन्सी ब्रेक हेही एक मुख्य कारण असू शकते. जेव्हा ट्रेनचा वेग जास्त असतो आणि आपत्कालीन ब्रेक्स वापरले जातात तेव्हा चाक आणि ट्रेनच्या ट्रॅकमध्ये घर्षण होऊ शकते. बऱ्याचदा आपत्कालीन ब्रेक अतिशय वेगाने वापरणे ट्रेन आणि ट्रेनमध्ये बसलेल्या शेकडो प्रवाशांसाठी जीवघेणे ठरू शकते.

Source: scroll.in

ट्रेन ट्रॅकवरून घसरण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे ट्रेनची चाके वेळेवर दुरुस्त न केल्यामुळे ती जाम होतात. ट्रेनच्या अशा जाम झालेल्या चाकांमुळे ट्रेन वळवणे आणि तिचा वेग वाढवणे धोक्याचे आहे. अशा परिस्थितीत रेल्वे रुळावरून घसरण्याचा धोका अधिक वाढतो. या आणि अशा अनेक कारणांमुळे ट्रेन रुळावरून घसरते. ही रुळावरून घसरलेली ट्रेन पुन्हा रुळावर कशी आणली जाते हा प्रश्न अजूनही आपल्याला आहेच.

ट्रेन ही काही छोटी कार किंवा बाईक नाही जी उचलली आणि रुळावर पुन्हा ठेवली. ट्रेन रुळावर आणण्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे.

=ट्रेन पुन्हा रुळावर आणण्यासाठी रुळावर प्लॅस्टिकचे दोन मोठे ब्लॉक्स (प्लॅटफॉर्मस) ठेवतात. प्रथम ट्रेनचे इंजिन या ब्लॉक्सवरून रुळावर पुढे येते. या इंजिनला मागे रुळावरून घसरलेला रेल्वेचा डब्बा बांधला जातो आणि तो इंजिनद्वारे खेचला जातो. हळूहळू इंजिन पुढे सरकते आणि मागचा डब्बा त्याच्यासोबत पुढे येऊ लागतो. मात्र हा डब्बा रुळाऐवजी त्याच्या बाजूने धावतो. त्यानंतर डब्याचे लोखंडी टायर्स प्लास्टिकला आदळताच तो डब्बा पुन्हा रुळावर येतो.

अशाप्रकारे खूप मोठे कष्ट घेऊन रुळावरून घसरलेली ट्रेन आणि ट्रेनचे डब्बे पुन्हा रुळावर आणले जातात. ट्रेन रुळावरून घसरण्याचे प्रमाण आता कमी झालेले असले तरी तिला पुन्हा मार्गावर आणण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात हे आपण पहिलेच.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Gayatri Gurav