Truecaller वरदान आहे की शाप? जाणून घ्या ‘लपवलेल्या गोष्टी’

Trurecaller मुळे आपल्याला Unknown नंबर असला तरी फोन करणाऱ्यांची नावं दिसू लागली. त्यामुळे फोन उचलायचा की नाही ते ठरवणं सोप्पं झालं.


Truecaller ने खरंच आपलं आयुष्य अगदी सोप्पं केलंय ना? म्हणजे पहिलं कसं, कोणत्या Unknown नंबर वरून फोन आला की कळायचं नाही की नक्की कोण आपल्याला फोन करतंय? मग फोन उचलल्यावर कळायचं, आपण फोन उचलून बरोबर केलं की माती खाल्ली! कारण बऱ्याचदा Unknown नंबर वरून येणारे कॉल्स आपल्याला पश्चाताप वाटावे असेच असतात.

Source : pymnts.com

पण अचानक Truecaller चा जन्म झाला आणि पश्चाताप करण्याचा काळ मागे पडला. कारण Truecaller मुळे आपल्याला Unknown नंबर असला तरी फोन करणाऱ्यांची नावं दिसू लागली. त्यामुळे फोन उचलायचा की नाही ते ठरवणं सोप्पं झालं. आपल्याला तो नंबर आणि त्यावरून येणारे मेसेजेस ब्लॉक करता येऊ लागले. शिवाय Truecaller वर नावासमोर वेरीफाय टिक दिसलं की फोन करणारा व्यक्ती Genuine आहे हे देखील सिद्ध होऊ लागलं. तर एकंदर सांगायचं तात्पर्य हे की Truecaller आपल्यासाठी Life saver ठरू लागलं!

पण म्हणतात ना कोणतीही गोष्ट तुम्हाला फुकट मिळत नसते. त्यामागे तिचा काही ना काही स्वार्थ असतो. आता Truecaller पण काय फुकट तुम्हाला सेवा द्यायला बसलेलं नाही. ती एक कंपनी आहे आणि त्यामुळे त्यांची उद्दिष्ट वेगळी आहे. यामुळेच हे Truecaller जरी Life saver असलं तरी ते वापरणं कितपत सुरक्षित आहे?

हे जाणून घेण्यासाठी Truecaller काम कसं करतं हे माहित असायला हवं. मुळात Truecaller हे युजर्स कडूनच डेटा घेऊन तोच डेटा सर्वांसाठी उपलब्ध करतं. जेव्हा तुम्ही Truecaller install करता तेव्हा तुम्हाला त्यात तुमची Contact List access करण्याची परवानगी मागितली जाते. त्यातून तुमचे सगळे contacts कॉपी केले जातात. अशाच प्रकारे जेवढे लोक Truecaller वापरता त्यांचे contacts सुद्धा घेतले जातात आणि Truecaller कडे जगभराचा स्वत:चा Contact data तयार होतो आणि याचाच वापर करून ते आपली कंपनी चालवतात.

अशाच प्रकारे Truecaller तुमच्याकडून Call logs आणि Message read करण्याची permission सुद्धा मागतं आणि मंडळी इथेच हे Truecaller तुमच्या सगळ्या फोनचा कंट्रोल घेतं. पहायला गेलं तर तुम्ही स्वत:च ही सगळी permission दिलेली असते.

केवळ याच गोष्टीमुळे तुम्ही कोणाला फोन करता? तुमच्या फोन्सवर काय मेसेज येतात? या सर्व गोष्टी Truecaller च्या सर्व्हर वर सेव्ह होतात. कोणतेही app असो ते Data sharing वर चालते. त्यामुळे तुमचा हा सगळा डेटा विविध कंपन्यांसह शेअर केला जातो आणि त्यातून हे app कमाई करतात.

कधी कधी यातून तुमच्यासाठी अत्यंत वैयक्तिक असलेला Data सुद्धा शेअर होऊ शकतो. एखादा असा मेसेज जो इतर कोणालाही कळू नये असे तुम्हाला वाटते तो Truecaller च्या सर्व्हरला कळू शकतो. अर्थात कंपनी स्वत:हून त्याचा चुकीचा वापर करत नाही. पण समजा उद्या Truecaller hack झाले तर? आजवर भले भले app जे म्हणायचे आमची सिक्युरिटी टाईट आहे ते सुद्धा hack झाले आहेत. त्यामुळे तुमचा हा डेटा चुकीच्या hackers कडे पोहोचला तर साहजिकच त्याचे परिणाम तुम्ही सुद्धा जाणताच!

Source : techgig.com

त्यामुळे हो, Truecaller काय कोणतेच app वापरायला म्हणावे तितके सुरक्षित नाही. त्यामुळे आपण सावध राहून कोणत्या app ला काय permission देतो हे तपासून पाहावे. जर तुम्हाला वाटतं हे app उगाचं एखादी permission मागत आहे आणि त्यामुळे तुम्हाला insecure वाटत असेल तर ते app तुम्ही न वापरलेलंच उत्तम!

तर यातून काय शिकलात? गरज असेल तेवढेच app वापरा आणि आपला data सुरक्षित राखा!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal