विश्वातील अशी एक जागा जिथे पडतो चक्क हिऱ्यांचा पाउस, पण तिथे जाणं सोप्प नाहीये!

हिऱ्यासाठी माणूस मेहनत करू शकतो, चोरी करू शकतो आणि प्रसंगी हाणामारी किंवा खून सुद्धा.


Guys, १९७८ मध्ये धर्मेंद्र आणि झीनत अमान ह्यांचा एक सिनेमा आला होता, ‘शालिमार’. ह्या सिनेमाची कथा घडते एका ’शालिमार’ नावाच्या हिऱ्याच्या चोरीभोवती. हिऱ्याच्या चोरी वर भारतात तसेच हॉलिवूड मध्ये अनेक सिनेमे बनले आहेत. Diamond is girl’s best friend असे म्हणतात पण पुरुषांना सुद्धा हिऱ्याचा मोह टाळता येत नाही. हिऱ्यासाठी माणूस मेहनत करू शकतो, चोरी करू शकतो आणि प्रसंगी हाणामारी किंवा खून सुद्धा. पण जर सर्वांना वेड लावणाऱ्या ह्या हिऱ्यांचा  पाऊस पडला तर…

निसर्ग हा खूपच अदभूत आणि अनाकलनीय आहे. तुम्ही आकाशातून पाऊस, गारा आणि बर्फ पडताना पाहीले असेल. इतकेच नाहीतर OTT प्लॅटफॉर्म वरचा जबरदस्त प्रसिद्ध शो DARK मध्ये आकाशातून पक्षी पडताना पण तुम्ही पाहिले असतील. पण तुम्ही आकाशातून हिऱ्यांचा पाऊस पडताना पाहिले आहे का? किंवा ऐकले आहे का?

चकित झालात ना? पण खरे आहे हे. हिऱ्यांचा पाऊस पडतो पण आपल्या पृथ्वीवर नाही तर इतर ग्रहांवर. हिऱ्यांच्या पावसाच रहस्य जाणून घेण्यासाठी आधी जाणून घेऊया आपल्या सूर्यमाले बद्दल. आपल्या सूर्यमालेत एकूण ग्रह आहेत आठ बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस (हर्शल) व नेपच्यून (वरुण). आपल्या भारतीय ज्योतिषशास्त्रात सुद्धा ह्या आठ ग्रहांना मान्यता आहे. १९३० मध्ये जेंव्हा प्लूटो ग्रहाचा शोध लागला तेंव्हा पासून ते २००६ पर्यंत प्लुटोला सुद्धा ग्रह मानत असत. २४ ऑगस्ट २००६ मध्ये International Astronomical Union ने ग्रहांच्या व्याख्येत बदल केला. त्यानंतर नवीन व्याख्येनुसार प्लुटोचे वर्गीकरण बटुग्रहात म्हणजेच Dwarf Planet मध्ये करण्यात आले. आपल्या सूर्यमालेत आणखी दोन बटुग्रह आहेत ते म्हणजे सेरेस आंणि एरिस.

तर आपल्या ह्या सूर्यमालेत दोन ग्रह असे आहेत जिथे हिऱ्यांचा पाऊस पडतो. ते म्हणजे युरेनस आणि नेपच्यून. युरेनस हा सूर्यमालेत ७ व्या क्रमांकावर आहे. ह्याचे सूर्यापासून चे अंतर आहे २० AU. सूर्यमालेतील अंतरे मोजताना खगोलीय एकक (Astronomical Unit or AU) हे एकक वापरतात. एक खगोलीय एकक म्हणजे सूर्य व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर. हे अंतर जवळ जवळ १४,९५,९८,००० कि.मी. इतके आहे. म्हणजे आपल्या रोजच्या भाषेत सांगायचे तर युरेनसचे सूर्यापासूनचे अंतर आहे  २० x १४,९५,९८,००० कि.मी. म्हणूनच युरेनसला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ८४ वर्षे लागतात. युरेनस हा आकाराने पृथ्वी पेक्षा १७ पट मोठा आहे. नेपच्यून हा सूर्यमालेतील ८ वा ग्रह आहे व त्याचे सूर्यापासून चे अंतर आहे ३० AU म्हणजेच ३० x १४,९५,९८,००० कि.मी. नेपच्यूनला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास लागतात १६५ वर्षे. मार्च १७८१ मध्ये ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ  Sir William Herschel यांनी सूर्यमालेत एका चमचमणाऱ्या वस्तूचा शोध लावला. त्या वस्तूस एक धूमकेतू समजले गेले होते. पण खूप वर्षांनीं संशोधनानंतर सिद्ध झाले कि तो एक धूमकेतू नसून ग्रह आहे. ह्या ग्रहास ग्रीक आकाश देवता युरेनसचे नाव देण्यात आले.  नेपच्यून ग्रहाचा शोध २३ सप्टेंबर १८८६ लागला आणि त्याचे श्रेय जाते ३ खगोलशास्त्रद्यांना Johann Galle, Urbain Le Verrier आणि John Couch Adams. नेपच्युन हे नाव रोमन समुद्र देवता नेपच्युन च्या नावावरून ठेवले गेले आहे.

हे दोन्ही ग्रह सूर्यापासून खूप दूर असल्यामुळे ह्या ग्रहांवर तापमान खूपच थंड म्हणजे -२०० डिग्री पेक्षा हि कमी असते. ह्या दोन ग्रहांचे वातावरण आपल्या पृथ्वीपेक्षा खूपच वेगळे आहे. ह्या ग्रहांच्या वातावरणात हायड्रोजन, हेलियम, मिथेन, अमोनिया आणि पाणी हे घटक आढळतात. ह्या ग्रहांच्या वातावरणातील मिथेन सूर्याची लाल किरणे शोषून घेतो आणि निळा रंग प्रसारित करतो म्हणून ह्या दोन्ही ग्रहांचा रंग निळा दिसतो. ह्या मिथेन मुळेच युरेनस आणि नेपच्यून वर हिऱ्यांचा पाऊस पडतो. पण तो कसा हे पाहूया.

पृथ्वी वर असलेल्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते आणि वातावरणाच्या दाबामुळे ह्या वाफेचे रूपांतर पावसात होते. अशीच काही प्रक्रिया ह्या दोन ग्रहांवर होते. पण इथे मुख्य घटक आहे मिथेन. मिथेन हे कार्बन आणि हायड्रोजन ह्या दोन मूलद्रव्यांपासून बनले एक संयुग आहे. मिथेन ची रासायनीक संज्ञा आहे CH4 म्हणजेच मिथेन कार्बन चा १ अणू आणि हायड्रोजन च्या ४ अणूंपासून बनलेले आहे. जेंव्हा वातावरणाचा दाब वाढतो तेंव्हा CH4 मधील कार्बन आणि हायड्रोजन वेगळे होतात, कार्बन चे रूपांतर हिऱ्यात होते आणि पडतो हिऱ्यांचा पाऊस.

Guys, हिऱ्यांच्या पावसाची गोष्ट वाचल्यावर तुम्हाला वाटत असेल कि चला जाऊया आणि दोन पोती हिरे घेऊन येऊया. पण असे होणे जरा कठीणच आहे. एकतर हे दोन्ही ग्रह पृथ्वी पासून खूपच दूर आहेत. २० ऑगस्ट १९७७ मध्ये पृथ्वी वरून लाँच केलेल्या Voyager 2 ह्या यानाने १९ कि.मी. प्रति सेकंद प्रवास केल्यानंतर १२ वर्षांनी म्हणजे २४ ऑगस्ट १९८९ ह्या दिवशी ते नेपच्यूनवर उतरले. अजूनतरी माणसाला ह्या वेगाने प्रवास करणे शक्य आहे का? हे टेस्ट केले गेले नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ग्रहांवरील भयंकर थंड -२०० डिग्री पेक्षा हि कमी असलेले तापमान. इतक्या थंड तापमानात कोणताही जीव जगू शकत नाही. म्हणून guys हिऱ्यांच्या पावसाला स्वप्नातच राहुद्यात आणि आपल्या मेहेनतीचा हिरा कमवुयात कारण ‘Diamonds are forever’.                

      


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Sushant Tambe