Paytm चा IPO Fail झाला म्हणजे नेमकं काय? सगळ्यांचेच पैसे बुडाले का?

ज्यांनी फायदा होईल म्हणून २१८५ रुपये देऊन IPO खरेदी केले त्यांना पहिल्याच दिवशी तब्बल २७% पर्यंतचा लॉस भोगावा लागला.


शेअर मार्केट क्षेत्रात सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे. Paytm चा IPO फेल झाला, Paytm च्या IPO ने गुंतवणूकदारांना बुडवलं. पण असं झालं तरी काय? टेक्नोलॉजी क्षेत्रातील आजवरचा सगळ्यात मोठा IPO म्हणून Paytm ने गवगवा केला खरा, पण एखाद्या scam प्रमाणे जे दाखवलं त्याच्या विपरीत घडलं आणि पहिल्याच दिवशी हा IPO गडगडला. हा सगळा घोळ का झाला आणि यामागची कारणे काय हे आपण शक्य तितक्या सोप्प्या भाषेत समजून घेण्याचा आज प्रयत्न करू. पण त्या आधी आपल्याला हे IPO नावाचं मॅटर नक्की काय आहे? हे समजून घ्यायला हवं. कारण हेच तर खोडाचं मूळ आहे जे तुम्हाला या महाप्रचंड वृक्षरुपी प्रकरणाच सार समजावून घेण्यास मदत करेल.

Paytm ची parent कंपनी One 97 Communications Ltd यांनी शेअर मार्केट मध्ये आपली लिस्टिंग केली. शेअर मार्केट मध्ये आपली कंपनी लिस्ट करण्यामागे कंपन्यांचा एकच उद्देश असतो ते म्हणजे पैसा उभा करणे ज्याला म्हणतात Equity Finance!


हा पैसा उभारण्याचा असा प्रकार आहे ज्यात कंपनीची Equity अर्थात भागीदारी अर्थात शेअर्स इन्व्हेस्टर्स विकत घेतात आणि ते मिळाले पैसे कंपनीचा व्यवसाय अधिक मोठा करण्यासाठी वापरले जातात. याबदल्यात कंपनीचे काम असते आपल्या इन्व्हेस्टर्सना त्यांनी गुंतवलेल्या पैश्याच्या मोबदल्यात चांगला नफा मिळवून देणे. बँकांकडून कर्ज घेऊन कंपनी चालवण्यापेक्षा वरील उपाय कंपन्यांसाठी अधिक सोप्पा असतो. कारण यात इन्व्हेस्टर्सच्या पैश्यांवर व्याज द्यायचे नसते. जरी तोटा झाला तरी पैसे मागायला कंपनीकडे कोणी जात नाही. जेव्हा एखादी कंपनी शेअर मार्केट मध्ये उतरणार असते तेव्हा त्या आधी ती कंपनी स्वत:चा IPO जाहीर करते. याला Initial Public Offering असे म्हणतात.

एखादी Investment Bank हाताशी धरून कंपनी आपली IPO किंमत फिक्स करते आणि मग इन्व्हेस्टर्स हा IPO खरेदी करतात. पण जोवर NSE किंवा BSE मध्ये कंपनी लिस्ट होत नाही तोवर इन्व्हेस्टर्स त्या कंपनीचे शेअर्स विकू शकत नाहीत. तर Paytm ने देशातला आजवरचा सगळ्यात मोठा IPO आपण आणत असल्याची घोषणा केली. तब्बल १८००० कोटी रुपये इतकी या IPO ची साईज होती. एका IPO ची किंमत ठरवली गेली होती २०८०-२१८५ रुपये. ह्या IPO ची एवढी हवा केली गेली होती की हा IPO मिळाला तर चांदीच चांदी अशी गुंतवणूकदारांची भावना झाली. त्यामुळे अनेकांनी २१८५ रुपये मोजून IPO खरेदी केले.

Source : cabotwealth.com

पण जेव्हा ही कंपनी शेअर मार्केटला लिस्ट झाली तेव्हा एका शेअरचा भाव तब्बल ९% डिस्काऊंटने ऑफर केला गेला आणि दिवस संपता संपता हा डिस्काऊंट २७% पर्यंत पोचला आणि शेअर मार्केट बंद होताना पहिल्याच दिवशी Paytm चा एका शेअरचा भाव १५६० रुपयांना close झाला. याचा अर्थ असा की ज्यांनी फायदा होईल म्हणून २१८५ रुपये देऊन IPO खरेदी केले त्यांना पहिल्याच दिवशी तब्बल २७% पर्यंतचा लॉस भोगावा लागला.

पण शेअर मार्केट मध्ये इतका कमी भाव Paytm ला का मिळाला? तर त्याच उत्तर आहे कंपनीच्या सध्याच्या स्थितीमध्ये! Paytm ही भारतातील सर्वात बड्या कंपन्यांपैकी एक असली आणि त्यांना खूप गुंतवणूक मिळालेली असली तरी Paytm अजूनही म्हणावा तसा profit करत नाही. जाणकारांच्या मते Paytm मधली गुंतवणूक एक risk investment आहे. IPO येण्याधी अनेकांनी Paytm मधली गुंतवणूक धोकादायक असल्याचे संकेत दिले होते.

शिवाय Paytm ने आपला future plan जाहीर केलेला नाही. आपल्या गुंतवणूकदारांना Paytm फायदा कसा मिळवून देणार आणि loss मध्ये असणारी कंपनी profit मध्ये कशी येणार याबद्दल काहीच माहिती जाहीर केलेली नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे Paytm च्या competitors कंपन्या सुद्धा Paytm ला मात देत आहेत. साहजिकच याचा प्रभाव शेअर मार्केट लिस्टिंगवर झाला आणि Paytm चे शेअर्स खरेदी करण्यात कोणी जास्त उत्सुकता दाखवली नाही. परिणामी Paytm चा भाव कोसळला आणि बाजार उठवायला निघालेल्या Paytm चाच बाजार उठला. CEO विजय शेखर शर्मा यांना सुद्धा त्यांच्या स्वप्नांचा जो चुराडा झाला तो पाहून रडू कोसळलं.

Source : wp.com

इथे एक गोष्ट लक्षात घ्या की IPO ला शेअर मार्केट मधील गुंतवणूक म्हणत नाहीत. ज्यांना IPO मिळतात ते या भरवश्यावर असतात की शेअर मार्केट मध्ये कंपनी लिस्ट झाली की भाव अजून वाढेल आणि आपल्याला फायदा होईल. मग काही लोक वाढलेल्या भावातच शेअर विकून profit कमवतात तर काही लोक long term साठी hold करून ठेवतात अर्थातच अधिक profit होईल या आशेने!

Paytm च्या प्रकरणात आता ज्यांनी IPO खरेदी केले आहेत त्यांच्याकडे वाट पाहण्यावाचून पर्याय नाही. जेव्हा Paytm चा भाव वधारेल तेव्हा Paytm चे शेअर्स विकून ते profit मिळवू शकतात. पण अर्थातच त्याची शक्यता अत्यंत कमी आहे.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal