इंटरनेट वर काहीही करा पण कधीच Dark Web च्या फंदात फसू नका!

डार्क वेब सोप्प्या शब्दांत सांगायचं झालं तर अश्या वेबसाईट्सचं जग आहे ज्या वेबसाईट आपण आपल्या नेहमीच्या ब्राऊजर वरून उघडू शकत नाही. यासाठी तुम्हाला स्पेशल ब्राऊजरचीच मदत घ्यावी लागते.


डार्क वेब…म्हणजे काळं इंटरनेट का? असा कोणीतरी ‘भोळाभाबडा’ बनून केलेला प्रश्न मध्यंतरी सोशल मिडीयावर वाचला होता. पण वास्तव हे आहे की डार्क वेब हा विषयी अजिबात हसण्यावारी नेण्यासारखा नाही. हे एक असं मायाजाल आहे जे तुम्हाला आकर्षित करेल आणि कधी तुम्हाला आपल्या फासात अडकवेल हे तुम्हाला देखील कळणार नाही. जर तुम्हाला टेक्नोलॉजीची भयंकर आवड असेल तर डार्क वेब हे प्रकरण तुम्हाला माहित असायला हवं. कारण एक जागृत टेक चाहता कधीच या डिजिटल नरकात जाण्यास धजावणार नाही.

Source : medium.com

डार्क वेब सोप्प्या शब्दांत सांगायचं झालं तर अश्या वेबसाईट्सचं जग आहे ज्या वेबसाईट आपण आपल्या नेहमीच्या ब्राऊजर वरून उघडू शकत नाही. यासाठी तुम्हाला स्पेशल ब्राऊजरचीच मदत घ्यावी लागते. या वेबसाईट सार्वजनिकरीत्या उघड नसतात. कोणीही तिथपर्यंत पोहचू शकत नाही. आता या एवढ्याश्या गोष्टीवरून तुम्हीच अंदाज लावा ना की जी गोष्ट लपून छपुन केली जाते ती सुरक्षित असेलच का?

या वेबसाईट ट्रॅक सुद्धा करता येत नाही, म्हणूनच सरकारी यंत्रणांसाठी सुद्धा डार्क वेब म्हणजे डोकेदुखी आहे कारण अनेक बेकायदेशीर कामे याच डार्क वेबच्या माध्यमातून केली जातात. ज्याबद्दल आपण पुढे जाणून घेऊच. सर्वात आधी आपण जाणून घेऊया डार्क वेबच्या प्रवेशद्वाराबद्दल, म्हणजे जिथून तुम्ही या डिजिटल नरकामध्ये प्रवेश करू शकता.

सध्या डार्क वेब वापरण्यासाठी दोन टूल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. एक आहे TOR आणि I2P. यांचा वापर करणे सुद्धा कोणा येड्या गबाळ्याचे काम नाही. कारण एक चुकीची स्टेप आणि तुम्हीच या डार्क वेब मध्ये अडकले जाल.

Source : nces.ed.gov

आता आपण याच डार्क वेब मधील अजून एक संकल्पना जाणून घेऊ. ज्याला डार्क मार्केट्स असे म्हणतात. डार्क मार्केट्स म्हणजे एक प्रकारचा बाजार आहे जिथे बेकायदेशीर कामांचा व्यवहार चालतो.  

इथे कोण कोणाकडून सेवा घेतो आणि कोण कोणाला सेवा पुरवतो हे पूर्णपणे गुपित असते. म्हणजेच तुमची ओळख कधीच उलगडली जात नाही आणि तुम्हाला कोणी ट्रेस करू शकत नाही. या डार्क मार्केट्स मध्ये चाईल्ड पोर्न, हत्यारे, सरकारी सिक्रेट्स, विविध देशांच्या फाईल्स आणी बरंच काय काय विकलं जातं. इथे आपल्या रोजच्या व्यवहारातील पैश्यांचा वापर न होता क्रिप्टोकरन्सीचा वापर होतो.

याच डार्क वेब मध्ये रेड रूम नावाचा अत्यंत क्रूर प्रकार असतो. अगदी मानसिक संतुलन हललेले आणि ज्यांना क्रूरता पहायला आवडते अशी लोकच रेड रूम्सचा वापर करतात. ज्या व्यक्तीला डार्क रूमची सेवा हवी आहे त्याला डार्क रूम चालवणाऱ्या व्यक्तीशी संपर्क करावा लागतो. तो व्यक्ती एकदाच अॅक्सेस होईल अशी अत्यंत सुरक्षित लिंक पाठवतो.

लिंक ओपन झाली की समोर स्क्रीनवर हवी असलेली व्यक्ती दिसते. जसे की स्त्री, पुरुष, लहान मुले! पुढे तुम्ही म्हणाल त्या प्रमाणे त्यांचा अनन्वित छळ केला जातो. प्रत्येक छळाचे पैसे वेगळे! पण हा छळ करणारा व्यक्ती कोण हे कधीच दिसत नाही. एका अहवालात दिसून आले की अगदी १०-१० मिनिटांचे लाखो रुपये लोक या रेड रूम्ससाठी मोजतात. म्हणजे किती विकृत व्यक्ती या समाजात दडलेल्या आहेत हे आपण समजू शकतो.

तर मंडळी हे आहे या डार्क वेबचं सत्य,  बेकायदेशीर गोष्टी इथे चालत असल्याने तुम्ही येथे जाणे टाळले पाहिजे हे एक कारण झाले पण दुसरे एक कारण म्हणजे हे हॅकर्सचे जग आहे.

Source : zeenews.com

इथे तुमची फसवणूक सुद्धा होऊ शकते. तुम्ही चुकीच्या लिंकवर क्लिक केले तर तुमचे सर्व डिव्हायसेस हॅक होऊ शकतात. समोरचा व्यक्ती तुमचे आयुष्य कंट्रोल करू शकतो.

शिवाय अजून एक कारण म्हणजे डार्क वेब वापरण्याला कायद्याने सुद्धा बंदी आहे. त्यामुळे तुम्ही या मायाजालापासून शक्य तितके दूरच राहा!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal