Whatsapp वरचे Private इमेज-व्हिडियो लपवण्यासाठी सर्वात ‘Best Trick’!

जर तुम्हाला व्हॉट्सअप वर एखाद्या व्यक्तीकडून ऑडीयो कॉल्स नको असतील तर सोप्पं आहे. त्या व्यक्तीच्या प्रोफाईल मध्ये जाऊन म्युट नोटीफीकेशन्सचा पर्याय निवडा.


व्हॉट्सअप हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे, यापेक्षा ती एक प्राथमिक गरज झाली आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. कारण संपूर्ण मनुष्य जातीमधील ९०% लोकांना व्हॉट्सअप हे काय प्रकरण आहे हे माहित आहेच आणि त्याचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणावर होतो. तुम्हाला भले अजून चांगले फिचर असलेले, अधिक सुलभ असे दुसरे अॅप कोणी आणून दिले तरी सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपच वापराल. इतकी या व्हॉट्सअपने आपल्याला सवय लावली आहे. पण एवढ्या प्रमाणात व्हॉट्सअप वापरूनही तुम्हाला खरंच व्हॉट्सअप पूर्णपणे माहित आहे का हो? असे अनेक छक्के पंजे व्हॉट्सअपमध्ये दडलेले आहेत जे माहित असतील तर तुमची मज्जाच आहे समजा, आज आपण याच दडलेल्या गोष्टी जाणून घेऊ.

Source : sifuchat.com
  • एखाद्याने तुम्हाला ब्लॉक केले असेल आणि तुम्हाला त्याला अत्यंत महत्त्वाचा मेसेज पाठवायचा असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला ग्रुप मध्ये मेसेज करू शकता. ही ट्रिक खास प्रेमी जोडप्यांसाठी उपयोगाची आहे. यासाठी तुम्ही दोघांचाच एक ग्रुप आधी बनवून ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या जोडीदाराने जरी तुम्हाला ब्लॉक केले तरी तुम्ही त्याला ग्रुप मध्ये मेसेज पाठवू शकता व टो मेसेज त्या व्यक्तीला डिलिव्हर होईल.
  • ही ट्रिक अनेकांना जाणून घ्यायची असते की व्हॉट्सअप मध्ये टेक्स्ट कसे बदलतात. तर  मंडळी जेव्हा तुम्ही शब्दाच्या मागे पुढे * टाकता तेव्हा टो शब्द बोल्ड होतो. जर तुम्ही शब्दाच्या मागे पुढे ~ हे चिन्ह टाकले तर तो शब्द स्ट्राईकथ्रू होईल. जर तुम्हाला तो शब्द मोनोस्पेस करायचा असेल तर ”’हे चीन्ह शब्दांच्या मागे पुढे टाका आणि शेवटी जर तुम्हाला शब्द इटालीक करायचा असेल तर शब्दाच्या मागे पुढे _ चिन्ह टाका.
  • एका फोन मध्ये जर दोन व्हॉट्सअप  वापरता आले तर? हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल ना, मग तुम्ही ते सुद्धा करू शकता. हे व्हॉट्सअपचे फिचर नाही. पण काही फोन्स मध्ये पॅरेलल स्पेसचा पर्याय असतो. यात तुम्हाला एका फोन दोन ठिकाणी सेम अॅप वापरता येते. पण यासाठी तुम्ही एका वेळी एकच स्पेस वापरू शकता. जेव्हा तुम्ही एक व्हॉट्सअप  वापरत असाल तेव्हा दुसरे हाईड होईल.
  • ही कोणती ट्रिक नाही तर एक सोय आहे जी व्हॉट्सअपने दिली आहे पण फार कमी लोक याचा वापर करतात. तुमच्यासाठी एखादा मेसेज महत्त्वाचा असेल आणि तुम्हाला पुन्हा त्या मेसेजची गरज लागणार असेल तर अशावेळी तो मेसेज पुन्हा शोधत बसण्याऐवजी वर स्टारचा ऑप्शन असतो त्यावर क्लिक करा. यामुळे तुम्ही थेट स्टार मेसेज पर्यायात जाऊन तुमचा मेसेज पाहू शकता.
  • व्हॉट्सअप वर अशी कोणतीतरी व्यक्ती असेलच न जिच्याशी तुम्ही खूप जास्त चॅटिंग करता, तर मग अशावेळी प्रत्येक वेळी व्हॉट्सअप उघडून त्या व्यक्तीला शोधून मग मेसेज पाठवण्याऐवजी तुम्ही मोबाईलच्या होम स्क्रीनवरच त्या व्यक्तीचा शॉर्टकट अॅड करून ठेवू शकता. यामुळे तुम्ही जेव्हा त्या शॉर्टकटकार क्लिक कराल तेव्हा थेट त्या व्यक्तीचा मेसेज बॉक्स उघडेल. यासाठी त्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट वर लॉंग प्रेस करा आणि तुम्हाला शॉर्टकट अॅड करण्याचा पर्याय दिसेल.
  • जर तुम्हाला व्हॉट्सअप वर  एखाद्या व्यक्तीकडून ऑडीयो कॉल्स नको असतील तर सोप्पं आहे. त्या व्यक्तीच्या प्रोफाईल मध्ये जाऊन म्युट नोटीफीकेशन्सचा पर्याय निवडा. तुम्हाला किती वेळासाठी त्या व्यक्तीला म्युट करायचे आहे ते सुद्धा तुम्ही ठरवू शकता. यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीकडून ह्येणारे ऑडीयो कॉल्स बंद होतील.
  • अनेकांना ही गोष्ट माहित नाही, पण तुम्ही व्हॉट्सअप वर एखाद्या व्यक्तीला इमेज पाठवत असाल तर तुम्ही ती एडीट करू शकता. त्यात तुम्हाला क्रॉप, स्टिकर्स जोडणे यांसारखे वेगवेगळे पर्याय दिसतील. असे केल्याने तुम्हाला हवी त्या रुपात ती इमेज तुम्ही त्या व्यक्तीला तिथल्या तिथे बनवून पाठवू शकता.
  • तुम्हाला व्हॉट्सअप वर येणारे इमेजेस आणि व्हिडियोज जर फोन गॅलरी मध्ये दिसावेत असे वाटत नसेल तर त्यासाठी सुद्धा एक ट्रिक आहे. यासाठी सेटिंग मध्ये जा. त्यात चॅट पर्यायात जा आणि त्यात तुम्हाला ‘शो मिडिया  इन गॅलरी’ हा पर्याय दिसेल. हा पर्याय जाऊन बंद करा आणि यापुढे व्हॉट्सअप वर तुम्हाला येणारी कोणतीही व्हिडियो वा इमेज तुम्हाला गॅलरीमध्ये दिसणार नाही.

तर मंडळी हे आहेत काही व्हॉट्सअप मधले छक्के पंजे जे तुमचं आयुष्य अधिक सोप्प बनवतील.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal