आता मोबाईल जवळ नसला तरी वापरू शकता Whatsapp, आलंय नवीन Feature!

अनेकदा आपण एक डिव्हाईस दुसऱ्या डिव्हाईसला किंवा लॅपटॉपला कनेक्ट करत असतो. अशाच मल्टीटास्किंगसाठी व्हॉट्सऍपमध्ये युजर्ससाठी एक मस्त व्हर्जन आले आहे.


व्हॉट्सऍप हे एक असे मेसेजिंग ऍप आहे ज्यामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. एकमेकांशी कनेक्ट राहण्यासाठी एवढंच काय तर अगदी बिझनेसकरिता सुद्धा व्हॉट्सऍप एक उत्तम साधन ठरत आहे. व्हॉट्सऍप कॉलिंग असो किंवा व्हिडिओ कॉलिंग असो या ऍपमधील प्रत्येक फीचरचा वापर युजर अगदी पुरेपूर करत असतो. सध्या तरी कोणत्याही युजरला व्हॉट्सऍप आपल्या स्मार्टफोनमध्ये नसून चालणार नाही. शिवाय ऍप्स हे सतत अपडेट होतच असतात. अनेकदा आपण एक डिव्हाईस दुसऱ्या डिव्हाईसला किंवा लॅपटॉपला कनेक्ट करत असतो. अशाच मल्टीटास्किंगसाठी व्हॉट्सऍपमध्ये युजर्ससाठी एक मस्त व्हर्जन आले आहे.

व्हॉट्सऍपच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये हे नवीन फीचर युजर्सना मिळणार आहे. मल्टी डिव्हाईस सपोर्ट या नव्या फिचरमुळे आता तुम्हाला व्हॉट्सऍप आणखी पाच डिव्हाईसवर वापरता येणार आहे. आहे ना ही मल्टीटास्किंग गोष्ट. महत्त्वाचं म्हणजे हे फीचर ऍंड्रॉइड तसेच आयफोनवर देखील उपलब्ध असणार आहे.

सुरूवातीला काही महिने हे फीचर केवळ बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध होते. मात्र आता ते कोणत्याही फोनमध्ये सपोर्ट करणार आहे. या फीचरमधील खास गोष्ट म्हणजे एका स्मार्टफोनसह आणखी चार डिव्हाईसवर तुम्ही व्हॉट्सऍपचा वापर करू शकता. जाणून घेऊया नक्की काय आहे या फीचरमध्ये…

मल्टी डिव्हाईस फीचर हे युजर्सना मेन फोनवर इंटरनेट कनेक्टिव्हिटीशिवाय व्हॉट्सऍप वापरण्याची सुविधा देते. तेव्हा तुम्हाला इंटरनेटची चिंता करण्याची गरज नाही.

या फीचरमार्फत तुम्ही व्हॉट्सऍप वेबद्वारे तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपसारख्या आणखी चार डिव्हाईसला कनेक्ट करू शकता. म्हणजेच तुम्ही एका वेळी पाच डिव्हाईसवर तुम्ही व्हॉट्सऍप वापरू शकता. तसेच प्रायमरी फोनवर इंटरनेट नसेल किंवा तो फोन स्विच ऑफ असेल तरीही व्हॉट्सऍप तुम्ही दुसऱ्या कनेक्ट केलेल्या डिव्हाईसवर वापरता येऊ शकते. मात्र, हे फीचर जर तुम्ही रोज वापरत असाल आणि अचानक जर तुम्ही काही दिवसांसाठी म्हणजेच सलग १४ दिवसांसाठी तुम्ही फोनचा वापर नाही केला तर मात्र तुम्ही कनेक्ट केलेले डिव्हाईस डिसकनेक्ट होऊ शकतात.

आता जाणून घ्या तुम्ही व्हॉट्सऍपवर मल्टी सपोर्ट डिव्हाईस फीचर कसे वापरू शकता

सर्वात आधी तुम्ही तुमचे व्हॉट्सऍप गुगल प्ले किंवा प्ले स्टोअरवरून अपडेट करून घ्या. व्हॉट्सऍप डेस्कट़ ऍप ओपन करा किंवा ब्राउजमध्ये व्हॉट्सऍप वेब सुरू करा. एंड्रॉइडमध्ये थ्री डॉट मेन्यूवर टॅप केल्यावर तुम्हाला एक लिंक्ड डिव्हाईसचा ऑप्शन दिसेल. तर आयफओनमध्ये सेंटिग्समध्ये लिंक्ड डिव्हाईस हा ऑप्शन तुम्हाला दिसेल.

लिंक्ड डिव्हाईसवर क्लिक करा आणि डेस्कटॉप ऍप किंवा www.whatsapp.com दिसणाऱ्या कोडला स्कॅन करा.

कोड स्कॅन केल्यावर व्हॉट्सऍप वेब तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर सुरू झालेले तुम्हाला दिसेल. ही संपूर्ण प्रोसेस एकदा पूर्ण झाल्यावर सर्व कनेक्टेड डिव्हाईसवर तुम्ही व्हॉट्सऍप वापरू शकता. यादरम्यान तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट नसेल तरीही तुम्ही व्हॉट्सऍप वापरू शकता.

व्हॉट्सऍप मध्ये हे नवीन फीचर आलेले असले तरीही तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. हे फीचर वापरताना तुम्ही लिंक्ड केलेल्या डिव्हाईसवर तुम्हाला काही फीचर्स वापरता येऊ शकत नाही.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लिंक केलेल्या डिव्हाईसवर लाईव्ह लोकेशन जाणून घेता येणार नाही. तसेच ब्रॉडकास्ट लिस्ट बनवणे आणि पाहणे सध्या तरी यामध्ये शक्य नाही. तसेच यामध्ये आयफोन वापरकर्त्यांसाठी सिंक प्रोसेसदेखील सोपी नाही. याचाच अर्थ जर तुमच्याकडे आयफोन असेल तर त्यावर कोणताही मेसेज तुम्ही डिलीट केला तर तो व्हॉट्सऍप वेबमधून डिलीट होणार नाही. तो तुम्हाला व्हॉट्सऍप वेबमध्ये वेगळा डिलीट करावा लागेल. तसेच तुमचं व्हॉट्सऍप व्हर्जन जर जुने असेल तर तर त्यावरून तुम्हाला कॉलिंग आणि मेसेजिंग देखील करता येणार नाही. मेटाचे हक्क असलेल्या व्हॉट्सऍपने यासाठी त्यांचे FAQ पेजदेखील अपडेट केले आहे.

पण तरी सध्याच्या काळात हे फिचर फायद्याचेच आहे, त्यामुळे नक्की वापरून पहा.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *