सचिन म्हणाला, “सिक्स नको मारू” पण सेहवागने जे केले ते पाहून क्रिकेटचा देव सुद्धा नतमस्तक झाला!

मायकल क्लार्क या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला त्याचे टीममेट्स ‘पप’ म्हणून हाक मारतात. यावर सेहवागने त्याचीही चांगलीच फिरकी घेतली होती.


वीरेंद्र सेहवाग फलंदाजीमाच्ये जेवढा स्फोटक होता, तेवढाच किंबहुना त्यापेक्षा जास्त तो बोलण्यात स्फोटक झाला आहे. मैदानात आडाम तिडाम कसेही फटके मारून धावांचा डोंगर उभा करणारा हा मनुष्य आता ऑफ फिल्ड काहीही, मनात जे येईल ते त्या क्षणी बोलून किंवा ट्विटरवर त्याला जे वाटेल ते बोलून हास्याचा आणि कधी कधी कॉन्ट्राव्हर्सीचा सुद्धा डोंगर उभा करतो. आज आपण पाहूया त्याने काही प्रसंगांत दिलेली मजेदार उत्तरे जी तुम्हालाही, “वीरु भाई तुम्हाला जवाब नहीं” असे बोलायला भाग पाडतील.

Source : firstpost.com
  • सचिन सोबत तुलना

प्रश्न – तेंडूलकर आणि सेहवाग यांमध्ये काय फरक आहे?

उत्तर – आमचा बँक बॅलेन्स

सेहवागचे हे उत्तर किती गम्मतीशीर आहे बघा आणि मुळात जसा प्रश्न विचारला तसे पुढील सेकंदाला त्याच्या तोंडून उत्तर बाहेर पडले आणि एकच हशा पिकला.

  • सेहवागचा नादच नाय

इंग्लंडच्या एका क्रिकेटरने एकदा सेहवागची बॅटिंग पाहून खूप स्तुती केली. पण पुढील वेळेस सेहवाग फार रन्स बनवू शकला नाही तेव्हा त्याने आपण आपला शब्द मागे घेतो असे वक्तव्य केले. यावर विचारणा केली असता सेहवागचे उत्तर होते,  “तो त्याला वाटेल ते बोलू शकतो. पण मला एक आठवण करून द्यायची आहे की एकदा तो दिवसभर क्रीझ वर होता आणि त्याने फक्त एक फोर मारला. अशा माणसाबद्दल मी काय बोलू?”

  • मायकल क्लार्कची फिरकी

मायकल क्लार्क या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला त्याचे टीममेट्स ‘पप’ म्हणून हाक मारतात. यावर सेहवागने त्याची चांगलीच फिरकी घेतली होती.

सेहवाग – तुझे मित्र तुला ‘पप’ म्हणून हाक मारतात ना?

क्लार्क  – हो, का रे?

सेहवाग – कोणत्या ब्रीडचा?

आता इथे पपचा अर्थ होतो कुत्र्याचे लहान पिल्लू, त्याला अनुसरून सेहवाग त्याला विचारू पाहत होता, कोणत्या ब्रीडचे कुत्र्याचे पिल्लू ते तुला समजतात!

Source : dnaindia.com
  • सचिन म्हणाला सिक्स नको मारू.

एका मॅच मध्ये सचिनने सेहवागला सिक्स न मारण्याबद्दल सांगितले होते. तेव्हाचा प्रसंग तर लाजवाब आहे.

सचिन – आता सिक्स नको मारायला जाऊस.

सेहवाग – जर साकलेन मुश्ताक बॉलिंगला आला तर मी काही करू शकत नाही, मग सिक्स हा आपोआप बसणार.

आणि गंमत बघा, खरंच पुढे साकलेन बॉलिंगला आला आणि त्या ओव्हर मध्ये सेहवागने कायच्या काय लांब सिक्स मारला. आजही तो प्रसंग आठवला की सचिन आणि सेहवाग दोघेही खळखळून हसतात.

  • बॉलच गायब

एका मॅच मध्ये अब्दुल रझाकची स्विंग बॉलिंग खेळताना सेहवाग आणि जेरेमी स्नेप दोघांना प्रॉब्लेम होत होता. तेव्हा सेहवाग म्हणाला, “याचा बॉलच गायब करायला हवा. माझ्याकडे एक प्लान आहे.” असे म्हणून त्याने दुसऱ्याच बॉलवर इतका लांब सिक्स मारला की बॉल मैदानाबाहेर गेला.

आता नवीन बॉल असल्याने जास्त स्विंग होणार नव्हता. त्यामुळे सेहवाग स्नेपला म्हणाला, “आता एक तास तरी आपल्याला टेन्शन नाही.”

  • अपयशात सुद्धा मस्करी

२००३ मध्ये झालेल्या एका सामन्यात द्रविड आणि सेहवाग क्रीझ वर होते. सेहवाग १९५ वर खेळत होता. त्याला सिक्स मारून २०० पूर्ण करण्याचा मोह आवरला नाही. पण तो त्या नादात आउट झाला.

द्रविड – फक्त ५ रन्स हवे होते. सिंगल काढूनही २०० पूर्ण झाले असते.

सेहवाग – माझा सिक्स फक्त ३० यार्डाने चुकला. पुढल्या वेळेस अजून ताकद लावायला हवी.”

असा हा मनुष्य जो अशा क्षणी सुद्धा हसत हसत माघारी परतला.

Source : toiimg.com
  • याला म्हणतात स्वॅग

आता शेवटचा प्रसंग जो सेहवागचा हजरजबाबीपणा काय लेव्हलचा आहे ते दाखवतो. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा २०११ च्या वर्ल्ड कप नंतर सेहवागला टीम मधून बाहेर बसवलं होतं

पत्रकार – तुम्ही आता पुन्हा कधीच खेळू शकणार नाही असं वाटतंय.

सेहवाग – चालेल, पण त्यात तोटा माझा नाही आहे.

एका बॉलमध्ये सिक्स मारणे आणि एका वाक्यात समोरच्याला गार करणे हे कसब फक्त सेहवागच जाणो!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal