एक विकेट घेता येत नाही म्हणून ज्याच्या कानाखाली वाजवली होती, तो पोरगा ठरलाय बेस्ट ऑलराउंडर!

रविंद्र जडेजा, जडेजाची आई लताबेन या सरकारी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत. तर जडेजाचे वडील यांच्या नोकरीची सतत घरपकड होत असे.


क्रिकेटमध्ये करियर करण्यासाठी खेळाडूंना अनेकदा बरंच स्ट्रगल करावं लागतं. आपल्या इंडियन क्रिकेट टीममध्ये तर अशा स्ट्रगलर खेळाडूंची कमी नाही. असाच एक खेळाडू ज्याच्या आईने मोठ्या कष्टाने त्याला मोठं बनवलं.

रविंद्र जडेजा, जडेजाची आई लताबेन या सरकारी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत. तर जडेजाचे वडील यांच्या नोकरीची सतत घरपकड होत असे. तेव्हा घराची सर्व जबाबदारी ही जडेजाच्या आईवरच होती. असे असताना जडेजा घराण्यातील ही एकमेव स्त्री नोकरी करते म्हणून त्यांना अनेकजण उलटसुलट बोलत. जडेजाच्या घरी आई-वडील, जडेजा आणि त्याच्या दोन बहिणी अशी तीन भावंडं असं कुटुंब होतं.

Source : dnaindia.com

डिसेंबर १९८८ मध्ये रविंद्र जडेजाचा जन्म अशा घरी झाला जिथे कायम आर्थिक परिस्थितीचा विचार केला जात. जडेजाची आई आणि बहिण यांनी जडेजाला घरच्या परिस्थितीपासून लांब राहत क्रिकेट खेळण्यासाठी प्रवृत्त केले.

जडेजाची आई तो १७ वर्षांचा असतानाच गेली. क्रिकेट खेळायला सुरूवात करताना जडेजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्याच्यापेक्षा वयाने मोठे असणारी मुलं त्याला खुप त्रास देत तसेच खेळण्यासाठी पैसे नसल्याने त्याला बॅटिंग करू देत नसत. असे असतानाही रविंद्र जडेजा हा आज इंडियन क्रिकेट टीममधील ऑलराऊंडर खेळाडू आहे, ज्याचे नाव टीमच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. क्रिकेट विश्वात आपलं नाव कमवण्यासाठी रविंद्र जडेजाने अनेक संकटांना तोंड दिलं, जी आपण केवळ ऐकली असतील.

जडेजाचा जन्म हा गुजरातमधील नवागाम घेड या गावातील राजपूत घराण्यात झाला. अनिरूद्ध सिंह जडेजा यांचं या ठिकाणी एक लहानसं घर होतं. जे जडेजाची आई चालवत असे. जडेजा घराण्यातील स्त्री बाहेर जाऊन नोकरी करत असल्यामुळे अनेकदा जडेजाच्या आईला बोचरी बोलणी ऐकावी लागत, तसेच अनेकदा अपमानदेखील सहन करावा लागत होता. असे असतानाही त्याच्या आईने आपल्या घरासाठी तिन्ही मुलांसाठी नोकरी सोडली नाही.

Source: i.ytimg.com

जडेजा हा सर्व भावंडांमध्ये लहान होता. महेंद्रसिंह चौहान हा जडेजाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्यक्ती आहे. महेंद्रसिंह चौहान हा पोलिसाची नोकरी करत असतानाच काही काळ त्याने क्रिकेटही खेळले आहे. त्याने क्रिकेटर बंगलो मध्ये सहभाग घेतला तेव्हा तो अवघ्या १० वर्षांचा होता.

क्रिकेटर बंगलो हे जामनगरमधील एक सरकारी सेंटर होते. महेंद्रसिंह याने जडेजाला बॅटिंग करण्याची संधी दिली. त्यानेच जडेजाला स्पिन बॉलिंग शिकवली.

चौहान आणि जडेजा यांच्याबाबतीतला एक खास किस्सा आहे जो अजूनही चर्चिला जातो. तो म्हणजे चौहानने जडेजाला सर्वांसमोर एक जोरदार कानाखाली लगावली होती. याचं कारण म्हणजे जडेजा एका मॅचमध्ये विकेट घेऊ शकत नव्हता. संघात बॉलरला महत्त्वाचे स्थान असते. त्यावेळी जडेजाने सलग ५ विकेट घेतल्या होत्या.

वयाच्या १६व्या वर्षी जडेजा भारताच्या अंडर १९ टीममध्ये खेळला. २००५ साली तो पहिली मॅच खेळला. त्यानंतर तो ड्युलीप ट्रॉफीसाठी २००६मध्ये खेळला. त्यातही त्याने उत्तम कामगिरी केली.

जडेजाने त्यानंतर भारताच्या अंडर १९ टीमचा उपकर्णधार केले गेले. २००८मध्ये अंडर १९ टीममधल्या कामगिरीनंतर त्याला उपकर्णधारपद देण्यात आले. विराट कोहली देखील त्यावेळी या संघात होता. त्यानंतर आयपीएलच्यावेळी देखील जडेजाचे नशिब चांगलेच फळफळले. राजस्थान रॉयल संघाकडून रविंद्र जडेजा खेळू लागला. 

२००९मध्ये जडेजाने वन डे आणि टी-२० खेळायला सुरूवात केली. २०१२ मध्ये २३ व्या वर्षी जडेजाच्या नावे एका विक्रमाची नोंद झाली. क्रिकेटच्या इतिहासातला तो आठवा भारतीय बॅट्समन होता, ज्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तीन वेळा शंभरी पार केली होती. या रेकॉर्डनंतर जडेजाचं क्रिकेट करियर चांगलंच जोमात आहे. जडेजाने टेस्ट मॅचमध्ये बॉलिंगमध्येही चांगली कामगिरी केली आणि आज तो जगातील बेस्ट ऑलराऊंडर्सपैकी एक म्हणून ओळखला जातो.

जडेजाच्या ह्या प्रवासातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे ती म्हणजे परिस्थिती कशीही असो, स्वप्नांवर विश्वास ठेवा, मेहनत करा, जे हवं ते नक्की मिळेल!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *