IPL मॅच Fixed असते का? आज जाणून घ्या ‘खरं’ उत्तर!

इंडियन प्रीमियर लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलचा आता हजारो कोटींचा व्यवसाय झाला आहे. आयपीएल दरवर्षी मीडिया हक्क, टायटल स्पॉन्सरशिप, बक्षीस रक्कम, मर्चेंडाइजिंग यातून कमाई करते.


मार्च आणि एप्रिल महिना आला की एकीकडे मुलांना परीक्षांचे टेन्शन असते तर दुसरीकडे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आयपीएलचे वेध लागलेले असतात. मुलांनाच काय अगदी मोठेही या आयपीएलसाठी आपले लक्ष लावून बसलेले असतात. २००७ मध्ये सुरू झालेल्या या आयपीएलने जगभरातील सर्वच लोकांना वेड लावलं आहे. अगदी मॅचमधील प्लेयर्सच्या ऑक्शनपासून ते शेवटच्या दिवसाच्या अंतिम मॅचपर्यंत प्रत्येकजण आपलं रोजचं वेळापत्रक आयपीएलच्या वेळेनुसार सेट करतात.

पण आपल्या सर्वांना आवडणारी आयपीएल सध्या एक वेगळ्याच कन्फ्युजनमध्ये अडकली आहे. आयपीएलमध्ये घडलेल्या काही घटना आणि घडामोडींमुळे आयपीएल फिक्सड आणि स्क्रिप्टेड आहे की खरंच ती एक खेळ म्हणूनच खेळली जाते असा प्रश्न अनेकांच्या डोक्यात सुरू आहे.

IPL ची स्थापना BCCI (बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया) ने २००७ साली केली. या आयपीएलने पहिल्या वर्षातच करोडो प्रेक्षक कमावले आणि त्यामुळे आयपीएलला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 

इंडियन प्रीमियर लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलचा आता हजारो कोटींचा व्यवसाय झाला आहे. आयपीएल दरवर्षी मीडिया हक्क, टायटल स्पॉन्सरशिप, बक्षीस रक्कम, मर्चेंडाइजिंग यातून कमाई करते. २०१८ मध्ये स्टार स्पोर्ट्स चॅनलने आयपीएलच्या मीडिया हक्कांसाठी १६,३७५ कोटींचा पाच वर्षांचा करार केला होता. आयपीएलला फक्त मीडिया अधिकारांद्वारे मिळणारी ही सर्वात मोठी रक्कम आहे.

Dream11, Vivo यांसारख्या मोठ्या ब्रँड्सना टायटल स्पॉन्सरशिप देऊन आयपीएल खूप चांगली रक्कम कमावते. Vivo ने २०१८ मध्ये आयपीएलसोबत २१८८ कोटी रुपयांचा पाच वर्षांचा करार केला होता. परंतु, चीनच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकल्यामुळे Vivo ने आपली टायटल स्पॉन्सरशिप आयपीएलमधून मागे घेतली. त्यांनतर Dream11 ने २२२ कोटी रुपये प्रति वर्ष या डीलवर टायटल स्पॉन्सरशिप साईन केली आहे.  तिकीट विक्रीतूनदेखील आयपीएलची खूप कमाई होते. क्रिकेटप्रेमींना आयपीएलच्या मॅच टीव्हीवर बघण्यापेक्षा स्टेडियमवर जाऊन प्रत्यक्षात बघण्यात जास्त रस आहे.

इतक्या वर्षांत आयपीएल दरम्यान घडलेल्या काही घटनांवर नजर टाकूयात ज्यातून आपल्याला समजेल आयपीएल खरंच एक खेळ म्हणून खेळली जाते की ती स्क्रिप्टेड आणि फिक्स्ड आहे.

  • इंडिया टुडे या वर्तमानपत्राने केलेले स्टिंग ऑपरेशन

इंडिया टुडेने २०१३ मध्ये केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आयपीएलमधील मॅच फिक्सड आणि स्क्रिप्टेड झाल्याचा दावा केला होता. यामध्ये देखील येथील दोन सट्टेबाजांचे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. त्यांच्या मते तेव्हा सुरू असलेल्या आयपीएलवर कराची आणि दुबईमध्ये बसलेल्या त्यांच्या मास्टर्सचे नियंत्रण होते.

दोन महिने चालणाऱ्या या स्पर्धेतील प्रत्येक मॅचमध्ये खेळला जाणारा प्रत्येक बॉल हा आधीच ठरलेला असतो. तसेच, पहिला सामना सुरू होण्यापूर्वीच अंतिम फेरीतील टीम्स आणि विजेते सर्व काही आधीच ठरलेलं असतं. असेदेखील त्यांचे म्हणणे होते.

  • एका रनने वारंवार जिंकत आलेल्या मॅचेस

एकदिवसीय क्रिकेट, आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि कसोटी सामन्यांमध्ये कोणताही संघ एका रनच्या फरकाने जिंकला असेल असे क्वचितच घडले असेल. परंतु, आयपीएलमध्ये हे वारंवार घडत असते.  २०१९ च्या आयपीएलमध्ये असे दिसण्यात आले की, IPL मध्ये प्रत्येक १० मॅचमधील एक  मॅच ही एका रनच्या फरकाने कोणत्याही संघाने जिंकली आहे. जेव्हा जेव्हा आयपीएलमध्ये संघाला जिंकण्यासाठी एक रनची आवश्यकता असते तेव्हा तेव्हा शेवटच्या चार ओव्हर्समध्ये मॅच पूर्ण बदलते आणि त्यामुळे प्रेक्षकांच्या संख्येत कमालीची वाढ होते.

  • आयसीसीने केलेल्या रेडमध्ये फिक्सिंगची कबुली देणारा बुकी:

आंतरराष्ट्रीय बुकीने आयपीएलच्या मॅच फिक्सिंगचा खुलासा केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक आयपीएलच्या मॅचमध्ये थेट प्रक्षेपण असल्यामुळे खेळाडूंच्या खाणाखुणा जाणीवपूर्वक दाखवल्या जात नाहीत. त्यासाठी खेळाडूंना एकमेकांना सिग्नल देण्यासाठी  घड्याळे, फुल आणि हाफ स्लीव्ह टी-शर्ट घालणे यांसारखे संकेत निश्चित केलेले असतात. त्याचे पुढे असेही म्हणणे आहे की, वाईड बॉलचा सिग्नल हा पुढील बॉल सिक्स किंवा विकेट असण्याची शक्यता असते. या आणि यासारख्या इतर अनेक घडामोडी व योगायोगांमुळे आपल्याला आयपीएलच्या मॅच फिक्स्ड आणि स्क्रिप्टेड असल्याचाच संशय येतो.

आयपीएल मॅच जर फिक्सड आहेत तर त्यावर बंदी का घालत नाहीत? असाही प्रश्न आपल्या डोक्यात उपस्थित होतो.

मॅच फिक्सिंगचा कोणताही ठाम पुरावा आजपर्यंत मिळालेला नाही. आयपीएलमधील मॅच फिक्सिंगची काही उदाहरणे ही निव्वळ योगायोगही असू शकतात. आयपीएल हा खेळ भारतातील एक अब्ज डॉलरचा व्यवसाय बनला आहे तसेच जगातील सहावी सर्वांत मोठी खेळाची लीग बनली आहे. यामधून सरकारला भरपूर कर देखील मिळतो.

आयपीएलमुळे अनेक नवीन क्रिकेटर्सना आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी आणि मोठे क्रिकेटर बनण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले आहे. बऱ्याच जाहिरातदारांना त्यांच्या जाहिराती करण्यासाठी एक मोठी संधी मिळाली आहे. स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार सारख्या चॅनल्सना अनेक सबसक्रायबर्स मिळाले आहेत. बीसीसीआयची अब्जावधीमध्ये कमाई होत आहे तसेच आयपीएलमुळे लोकं Dream11 आणि इतर प्लॅटफॉर्मवर लिगली बेट लावू शकतात.

आयपीएल ही सर्वांसाठीच एक महत्वाचा पैसे कमावण्याचा घटक झाली आहे. त्यामुळे, कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय आयपीएलवर कोणतीही राष्ट्रीय एजन्सी बंदी आणणार नाही किंवा मॅच फिक्सिंगची चौकशी करणार नाही.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Gayatri Gurav