प्रेक्षकांना आता बॉलीवूड पेक्षा साउथचे सिनेमे का आवडू लागलेत? कारण आलं समोर!

बॉलीवूड मधले बरेचसे सिनेमे हे रीमेकच आहेत नाहीतर साऊथच्या सिनेमांवरून प्रेरणा घेतलेले आहेत. पण आता वेळ बदलली आहे.


सिनेमे कुणाला बघायला आवडत नाहीत? सगळेजण कधी ना कधीतरी विरंगुळा म्हणून सिनेमा बघतातच. पूर्वीचे सिनेमे जरी कृष्णधवल असले तरी अर्थपूर्ण असायचे. आज-काल चे सिनेमे अर्थपूर्ण नसतात. बॉलीवूडचे सिनेमे स्टेटस सिम्बॉल होऊन राहिलेत. पण साउथ चे सिनेमे वेगवेगळे असतात. त्यांचे सिनेमे समाजाचा आरसा असतात. बॉलीवूड मध्ये रिमिक्स करण्याची फॅशन अनेक वर्षांपासून आहे.

सलमान खानचा असा एक रीमिक्स सिनेमा त्याला स्टारडमवर घेऊन गेला. तो पिक्चर होता वाॅंटेड जो २००९ साली रिलीज झाला. ह्या पिक्चरमुळे सलमान खान अतिशय लोकप्रिय झाला. पण हा सिनेमा साउथच्या पिक्चर वरून घेतला आहे. वॉन्टेड पिक्चर हा ‘पोकिरी’ या तेलगू सिनेमाचा रिमेक आहे. बॉलीवूड मधले बरेचसे सिनेमे हे रीमेकच आहेत नाहीतर साऊथच्या सिनेमांवरून प्रेरणा घेतलेले आहेत. पण आता वेळ बदलली आहे. बरेचसे नोर्थ इंडियन लोक आज-काल साउथ चे सिनेमे बघतात. साउथच्या सिनेमा मधली नोर्थ इंडियन लोकांची रूची वाढली आहे. साउथचे सिनेमे आपल्या कुटुंबाबरोबर बघता येतात आणि म्हणूनच ते दिवसेंदिवस जास्ती लोकप्रिय होत चालले आहेत. बॉलीवूडमध्ये आणि साउथच्या सिनेमांमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चला जाणून घेऊया की ह्या गोष्टी कुठल्या आहेत ज्यामुळे साउथ चे सिनेमे आज सुपरहिट आहेत.

आज-काल बॉलीवूड मध्ये नुसता ड्रामा असतो. त्याचप्रमाणे बॉलीवूडच्या सिनेमांमध्ये एक मॉर्डन टच द्यायचा प्रयत्न असतो. साउथच्या सिनेमांमध्ये ॲक्शन, ड्रामा, आणि इमोशन बघायला मिळतात.

साउथच्या सिनेमांमध्ये गावाची गोष्ट सुद्धा खूप रंगवून सांगितली जाते. या सिनेमांमध्ये गोष्ट गावातून सुरू होऊन शहरात संपते. त्यामुळे प्रेक्षकांना लोकल आणि मॉडर्न टच दोन्ही बघायला मिळतात. तसं बॉलिवूडमध्ये घडत नाही. बॉलीवूडच्या सिनेमांमध्ये नुसता ड्रामा असतो. बॉलीवूडच्या सिनेमांमध्ये गावाची गोष्ट तिथल्या लोकांची कहाणी हे जास्त बघायला मिळत नाही. त्यामुळे आज काल लोक साउथचे सिनेमे जास्त बघतात.

आज-काल बऱ्याच टीव्ही चॅनल्स वर डब केलेले साउथचे सिनेमे दाखवतात. ह्या सिनेमांमध्ये फ्री एंटरटेनमेंट बघायला मिळते. याचं कारण असं आहे की साउथ च्या सिनेमांचे ब्रॉडकास्टिंग राइट्स खूप कमी रुपयात विकत घेऊ शकले जातात. त्याउलट बॉलीवूडचे सिनेमे थेटर मध्ये बघायला लागतात आणि तिकिटांचा खर्चही खूप असतो. याच कारणामुळे लोक साउथचे सिनेमे टीव्ही वरती बघायला जास्त पसंत करतात.

अमिताभ बच्चनचा सिनेमा सूर्यवंशम जेव्हा रिलीज झाला तेव्हा तो थेटर मध्ये बघायला कोणी गेलं नव्हतं पण वीस वर्षानंतर तोच सिनेमा जेव्हा टीव्हीवर प्रदर्शित झाला तेव्हा मात्र लोकांनी ह्या सिनेमाला उचलून धरलं आणि या सिनेमाने इतिहास घडवला. बॉलिवूड स्टारडममुळे नावाजलं आहे. शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, आमिर खान, सैफ अली खान इत्यादी नटांचे पिक्चर लोक लाइन लावून बघायला येतात. पण तशी परिस्थिती आता बॉलीवूडमध्ये राहिली नाही. पण हीच परिस्थिती साउथच्या सिनेमांमध्ये अजूनही कायम आहे. पवन कल्याण, सूर्या, अल्लू अर्जुन, विजय देवरकोंडा यांसारख्या सुपरस्टार्स यांनी आपली जादू कायम ठेवली आहे. ह्या कारणामुळेच सगळे प्रेक्षक यांचे सिनेमे बघायला येतात.

साउथचे सिनेमे दोन महिन्यात पूर्ण होतात आणि लगेच प्रदर्शित केले जातात. साऊथची हि कन्सेप्ट आता हळूहळू बॉलीवूड मध्ये यायला लागली आहे. साउथच्या सिनेमांमध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स पण वापरल्या जातात ज्यामुळे साउथ चे सिनेमे आणखीन चांगले होतात. त्याचप्रमाणे बरेचसे नट-नटी पहिले साउथ मध्ये काम करतात आणि मग बॉलिवूडमध्ये एंट्री मारतात. उदाहरण द्यायचं झालं तर ऐश्वर्या राय, दीपिका पादुकोण होय. नवीन अभिनेत्रीं मध्ये नवा घ्यायचे झाले तर तापसी पन्नू ही सुद्धा साउथचे सिनेमे करून बॉलीवूडमध्ये आली आहे.

साउथच्या सिनेमांचं स्क्रिप्ट सुद्धा खूप वेगळं असतं. स्क्रिप्ट सोबतच सिनेमॅटोग्राफी खूप जबरदस्त असते. ह्या सगळ्या कारणांमुळे साउथचे सिनेमे हिट होतात आणि बॉक्स ऑफिस वर राज्य करतात. बॉलीवूड मध्ये रिमिक्स आणि रिमेकचा बोलबाला खूप आहे. शिवाय ओरिजनल स्क्रिप्ट पण नसते.

म्युझिक कंपोजर नवीन गाणी बनतच नाही तर जुन्या गाण्यांना नवीन ठेका देऊन ती बाजारात आणतात. हेच कारण की काय लोकांचा पंजाबी आणि भोजपुरी गाण्यांकडे ओढा जास्त वाढला आहे. बॉलीवूड मध्ये आज-काल असं एकही गाणं नाही जे ओठावरती थांबून राहील. आजची पिढी सुद्धा सगळी जुनी गाणी ऐकत असते. बॉलिवूडचे बरेच असे सिनेमे मुंबईकरांना समोर ठेवून बनवले जातात कारण बरीचशी कमाई ही मुंबईतून होते. पण साउथच्या सिनेमांच तसं नाही.

आत्ताच प्रदर्शित झालेला पुष्पा जेव्हा हिंदी डब केला गेला तेव्हा ह्याच पुष्पा सिनेमाने ८० करोड रुपये बॉक्स ऑफिस मध्ये कमवले. ह्याचा थेट परिणाम रणवीर सिंग का सिनेमा ८३ वर पडला. यावरूनच सिद्ध होते की लोकांना आजकाल साउथचे सिनेमे जास्त आवडायला लागले आहेत आणि घ्या सिनेमांची क्रेज दिवसेंदिवस वाढतच आहे.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *