एका भारतीय जादुगाराने टिव्हीवर 17 वर्षांच्या मुलीचे तुकडे केले आणि अख्खं ब्रिटन हादरलं!

हाऊस फुल्लचे बोर्ड नाट्यगृहाबाहेर झळकू लागले तसं सरकार यांनी स्वतःला जगातला सगळ्यात महान जादूगार घोषित केलं.


भारत देश हा कला आणि संस्कृतीने नटलेला देश आहे. त्यात जादू ही कला तर पूर्वापार चालत आलेली कला आहे. जेव्हा मनोरंजनाची कोणतीच माध्यमं उपलब्ध नव्हती तेव्हा जादूगर मंडळी गावा-गावात जाऊन आपले जादूचे खेळ दाखवायचे. पण कालांतराने ही जादूगार मंडळी लुप्त होत गेली. आता तर आपण रिऍलिटी शोज् च्या माध्यमातून पाहतो आता जादू या कलेला अधुनिक टच मिळाला तसा प्रोफेशनल हायटेक मॅजिशिअन आपले जादूचे शो सादर करु लागले. पण तुम्हाला ठाऊक आहे खुप पूर्वी आपल्या भारतातही असाच एक प्रोफेशनल जादूगार होऊन गेला. त्याची जादू देशातच नाही तर परदेशातही हीट झाली होती. हा जादूगार त्याला हवा तसा भ्रम निर्माण करुन प्रेक्षकांना चकीत करायचा. या अवलीया जादूगाराचं नाव होतं जादूगार पी.सी सरकार.

Source: yourstory.com

पी.सी सरकार यांचा जन्म बंगालमध्ये झाला होता. त्यांचे पूर्ण नाव प्रोतुल चंद सरकार असे होते. असं म्हणतात की ते गणितात खुपच हुशार होते. पण त्यांचा कल हा जादू कडेच जास्त होता. त्यांना जादूगार व्हायचं मनात पक्क केलं आणि क्लब, नाट्यगृह, सर्कसमध्ये जादूचे प्रयोग सादर करण्यास सुरूवात केली. त्यांच्या हातात कसब तर होतीच. त्यामुळे प्रेक्षकही त्यांच्या प्रयोगांना गर्दी करु लागले. हाऊस फुल्लचे बोर्ड नाट्यगृहाबाहेर झळकू लागले तसं सरकार यांनी स्वतःला जगातला सगळ्यात महान जादूगार घोषित केलं.

खरं तर ही त्यांची मार्केटिंग ट्रिक होती. पण या ट्रिकची जादूही प्रेक्षकांवर लागू पडली. त्यांना जादूच्या प्रयोगासाठी देशभरातून आमंत्रण येऊ लागली. कालांतराने पी.सी सरकार यांनी त्यांचा मोर्चा परदेशातही वळवला. त्यांना आता त्यांची जादू साऱ्या दुनियेला दाखवायची होती.

पण कोणतही करिअर इतकं सोपं थोडीच असतं? जितकी स्वप्नं मोठी तितकेच वाटेत खाच खळगेही जास्तच नाही का? पी.सी सरकारची जादूची वाटही अशीच अवघड. त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. एकतर त्यांनी स्वतःलाच महान जादूगार अशी उपाधी दिली, म्हणून लोकं त्यांच्यावर अविश्वास दाखवत. तर काहींना हा लोकांच्या डोळ्यात धूळफेक करतोय असंच वाटे. त्यात हिटलरचा आवडता जादूगार हेलमट एवाल्ड स्क्रिवरने तर जादूगार सरकारवर त्याच्या ट्रिक्स चोरल्याचा आरोप लावला. प्रत्यक्षात नंतर हा आरोप करणं हेलमटला जडच गेलं. कारण बऱ्याच जादूगारांनी सरकार यांची बाजू घेतली. आणि हेलमट वर प्रत्योरोप केला की जी ट्रिक्स चोरल्याचा आरोप तो पी.सी. सरकारवर लावतोय, ती हेलमटनेच कोणा दुसऱ्या जादूगाराकडून चोरली आहे.

एकूणच काय तर सगळ्या अडचणींना सामोरं जात पीसी सरकार यांनी स्वतःचं नाव कमावलं. त्यांची जादू प्रेक्षकांवर तशीच कायम होती. एकदा तर ब्रिटनमध्ये ते जादुचा प्रयोग करत होते तेव्हा प्रेक्षक पीसी सरकाला तर चक्क घाबरले. झालं असं होतं की ब्रिटनमध्ये पॅनोरमा नामक कार्यक्रम चालत असे. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण बीबीसीवर होत असे. या कार्यक्रमात सरकार यांचा प्रयोग होता. प्रयोगादरम्यान त्यांनी १७ वर्षांच्या मुलीला हिप्लोटाईज करुन तिला एका टेबलवर झोपवलं. आणि त्या मुलीच्या शरिराचे दोन तुकडे झालेले प्रेक्षकांनी टिव्ही स्क्रिनवर पाहिलं. शो पुढे जाणार तितक्यात शोचा ऍंकर टिव्ही स्क्रिनवर आला आणि त्याने शो संपल्याचे जाहीर केले.

Source : mentalfloss.com

झालं.. लोकांना वाटलं की त्यांनी टीव्ही स्क्रिनवर लाईव्ह मर्डरच पाहिला. हजारो फोन बीबीसी कार्यालयात खणाणत होते. प्रत्येकाला शोची वेळ पूर्ण झाल्यामुळे शो बंद केला असं उत्तर देण्यात आलं. वास्ताविक पाहता पी.सी सरकार यांच्या मित्रांना माहीत होतं की त्यांचं टायमिंग जबरदस्त आहे, त्यामुळे असं होणंच शक्य नाही. या शोमुळे ब्रिटनमध्ये त्यांची चांगलीच चर्चा रंगली. हे अर्थातच त्यांच्या पथ्यावर पडलं. तो शो म्हणजे पी.सी सरकार यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला.

पी.सी सरकार यांचे शो देश-विदेशात हाऊसफुल्ल होऊ लागले. त्यांना प्रयोगासाठी सतत प्रवास करावा लागे. ही बाब त्यांच्या तब्येतीवर बेतली. डॉक्टरांनी त्यांना प्रवास न करण्याचा सल्ला दिला. पण सरकार यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत जपानचा दौरा केला.

६ जानेवारी १९७० ला जपानच्या शिबेत्सु शहरात केलेला त्यांचा इंद्रजाल शो शेवटचा प्रयोग ठरला. शो संपवून ते बाहेर पडले तसे, लागलीच त्यांना ह्रदयाचा झटका आला. त्यातच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *