झेलेन्स्कींना ठार मारण्यासाठी पुतीन यांनी पाठवलेले क्रूर ‘चेचेन योद्धे’ आहेत तरी कोण?

कोण आहेत हे चेचेन? त्यांचा रशिया-युक्रेन युद्धाशी काय संबंध? आणि ते पुतीन यांना सपोर्ट का करतायत?


रशिया आणि युक्रेन मध्ये सुरु असलेल्या भयंकर युद्धाकडेच सध्या सगळ्या जगाचे लक्ष लागून आहे. पण या सगळ्या रणधुमाळीत ‘चेचेन फोर्स’ ह्या एका नावाचा उल्लेख झाला आणि आत हे कोण नवे? असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात उद्भवला. तुमच्या प्रमाणे हा प्रश्न मवालीला सुद्धा सतावत होता. मग काय पटापट सगळी माहिती शोधून काढली आणि ही माहिती अगदी सोप्प्या भाषेत आता तुमच्या सोबत शेअर करत आहोत.

जेव्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेन वर हल्ल्याची घोषणा केली तेव्हा चेचन्याचे पंतप्रधान रामाझान काद्यारोव्ह यांनी वक्तव्य केले होते की, “युक्रेनियन लीडर्सना मारण्यासाठी आमचे काही योद्धे युक्रेन मध्ये दाखल झाले आहेत.”

Source : tmgrup.com

काही दिवसांनी युक्रेनियन सुरक्षा संस्थांनी याची पुष्टी केली की, युक्रेनियन लीडर्सना मारण्यासाठी आलेल्या चेचेनी दहशतवाद्यांचा आम्ही खात्मा केला आहे. तेव्हा कुठे जाऊन हे प्रकरण खरंच गंभीर असल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं. पण कोण आहेत हे चेचेन? त्यांचा रशिया-युक्रेम युद्धाशी काय संबंध? आणि ते पुतीन यांना सपोर्ट का करतायत?

हे चेचेन म्हणजे चेचेन्या देशाचे रहिवासी होय. हा मुस्लीमबहुल देश रशियाच्या दक्षिणेकडे जॉर्जिया देशाच्या सीमेला लागून स्थित आहे. चेचेन्या हा जरी स्वतंत्र देश असला तरी तो रशियन फेडरेशनचा एक भाग समजला जातो.

सोव्हिएत संघापासून या देशाने स्वत:ला १९१९ मध्येच स्वतंत्र घोषित केले होते. पण सोव्हिएत संघाने चेचेन्या वर हल्ला केला. मात्र हे चेचेन लोक एवढे चिवट की त्यांनी अजिबात हार मानली नाही. १९९१ पर्यंत म्हणजेच सोव्हिएत संघ संपुष्टात येईपर्यंत त्यांनी लढा दिला. अखेर १९९१ मध्ये हा दश स्वतंत्र झाला. पण रशियाची कायमच या छोट्याश्या देशावर नजर होती.

रशियाने १९९४ मध्ये चेचेन्या वर पहिला हल्ला केला, पण यात रशियाला सपाटून मार खावा लागला. काही वर्षांनी पुन्हा एकदा रशियाने चेचेन्या वर हल्ला केला. यावेळी मात्र त्यांना यश आले आणि त्यांनी चेचेन्या आता स्वतंत्र देश असला तरी रशियाचे त्यावर नियंत्रण असेल अशी घोषणा केली.

Source : wp.com

तेव्हा वर्ष २००३ सुरु होते आणि राष्ट्राध्यक्ष होते व्लादिमिर पुतीन! रशियन फेडरेशनचा भाग बनण्यासाठी चेचेन्या मध्ये जन्मात घेण्यात आले व बहुसंख्य नागरिकांनी त्याला दुजोरा दिला. तर अशाप्रकारे हा दश अखेर रशियाच्याच अधिपत्याखाली आला. पुतीन यांनी त्यांनी देश चालवण्यासाठी निवड केली अखमाद काद्यारोव्ह यांची!

२००७ साली एका बॉम्ब हल्ल्यामध्ये अखमाद काद्यारोव्ह यांचा मृत्यू झाला आणि मग पुतीन यांनी त्यांचाच मुलगा रामाझान काद्यारोव्ह यांना हा देश चालवण्यासाठी नियुक्त केले.

तर याच देशातील अत्यंत क्रूर असे सैन्य चेचेन म्हणून ओळखले जाते. ते अत्यंत निष्णात आणि तरबेज योद्धे असून कोणत्याही परिस्थितीमध्ये लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी त्यांना तयार केले जाते. चेचेन्या देशाचे पंतप्रधान रामाझान काद्यारोव्ह हे रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे खंदे समर्थक मानले जातात आणि म्हणून जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याची घोषणा केली तेव्हा रामाझान काद्यारोव्ह यांनी सुद्धा “आम्ही पुतीन यांच्या सोबत आहोत” अशी गर्जना केली.

रशियन सैन्याला सपोर्ट करण्यासाठी जवळपास १२,००० चेचेन सैन्य युक्रेन मध्ये उतरले असून या आधी सुद्धा पुतीन यांना सपोर्ट म्हणून सिरीया आणि जॉर्जिया मध्ये रामाझान काद्यारोव्ह यांनी आपले सैन्य पाठवले होते. चेचेन योद्ध्यांबद्दल रशिया आणि आसपासच्या देशांमध्ये एक भीती आहे. त्यांना अत्यंत क्रूर म्हणून ओळखले जाते.

चेचेन सैन्य आपल्या सोबत आहे हे दाखवून युक्रेनचे मनोधैर्य कमी करण्याचा प्रयत्न रशियाकडून केला जात आहे.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal