राजधानी दिल्लीत अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. तिथे असलेल्या ऐतिहासिक वास्तू, त्या इतिहासाच्या साक्षीदारच आहेत. तिथे दिमाखात उभे असलेले इंडिया गेट तर शौर्याची कहाणी सांगते. इंडिया गेटला अखिल भारतीय युध्द स्मारक म्हणूनही ओळखले जाते. इंडिया गेटच्या भव्यतेची तुलना तर थेट फ्रांसच्या आर्क डी ट्रायम्फशी केली जाते. आज या लेखाच्या माध्यमातून इंडिया गेटचा इतिहास आणि त्यामागचे रोचक किस्से जाणून घेणार आहोत.
१९१७ ते १९१८ दरम्यान झालेल्या पहिल्या महायुध्दात आणि १९१९ साली झालेल्या अँग्लो-अफगाण युध्दात ९० हजार भारतीय सैनिकांनी ब्रिटीशांच्या साम्राज्यासाठी प्राणार्पण केले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिल्लीच्या राजपथावर १९२१ साली इंडिया गेट उभारण्यात आला. या इंडिया गेटच्या भिंतींवर पहिल्या आणि तिसऱ्या महायुध्दात शहीद झालेल्या भारतीय ब्रिटीश सैनिकांची नावे कोरलेली आहेत. इंडिया गेटच्या दोन्हीही बाजूला, दर्शनी भागात “INDIA” असे कोरुन त्या खाली शहीद जवानांच्या प्रित्यर्थ शिलालेखही कोरला आहे.
तिसऱ्या महायुध्दानंतर १० फेब्रुवारी १९२१ साली ब्रिटीश प्रिन्स द ड्युक ऑफ कॅनॉटच्या उपस्थितीत सैनिकांचा समारोह आयोजित करण्यात आला होता. या समारोहात इंपीरियल सर्विस टॉप्सचे सदस्य आणि ब्रिटीशांकडून लढलेले भारतीय सेनेचे सदस्य उपस्थित होते. त्यांच्या हस्तेच इंडिया गेटचा पाया रचला गेला.
या कार्यक्रमात प्रथम भारतीय व्हॉईसराय विस्कॉन्ड चेम्सफोर्ड फेड्रिक थिसीगर आणि कमांडर इन चीफ यांनीही हजेरी लावली होती. ब्रिटीशांकडून निडरपणे लढलेल्या भारतीय सैनिकांच्या तुकड्यांना ‘रॉयल किताब’ देऊन, त्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये डेक्कन हॉर्स, ५९ वे शिंदे रायफल्स (फ्रंटिअर फोर्स), ३९ वी गढवाल रायफल्स, तिसरे सेपरर्स आणि माइनर्स, ११७ वी मराठा फोर्स, ६ वी जाट लाईट इन्फॅंट्री, ५ वी गोरखा रायफल्स फोर्स आणि ३४ वी शिख पायनियर या सैनिकांच्या तुकड्यांचा समावेश होता.
इंडिया गेटची रचना त्या काळचे प्रसिध्द आर्किटेक्ट एडविन लुटयेन्स यांनी केली. ते IWGC चे त्या काळचे सदस्य होते. एडविन यांना युरोपात ६६ युध्द स्मारके बांधण्याचा तगडा अनुभव होता.
दिल्लीत उभारण्यात आलेल्या इंडियागेट स्मारकाची प्रेरणा, त्यांनी पॅरिसच्या आर्क दे ट्रायम्फे या स्मारकावरुन घेतली होती. गंमत म्हणजे पॅरिसमधले आर्क दे ट्रायम्फे हे ओरिजन डिझाईन नसून, ते देखिल रोमन साम्राज्यातील आर्क ऑफ टायटसच्या रचनेची प्रेरणा घेऊन बांधण्यात आलं होतं.
इंडिया गेटचे स्मारक बांधून पूर्ण होण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी लागला. या स्मारकाच्या बांधकामात ग्रेनाईटसह, लाल आणि पिवळ्या रंगाच्या वाळूच्या दगडांचा वापर केला आहे. १२ फेब्रुवारी १९३१ साली भारताचे व्हॉईसराय वायसराय लॉर्ड इरविन यांच्या हस्ते इंडिया गेटचे उद्धाटन करण्यात आले होते.
सुरुवातीच्या काळात ब्रिटीश राजा पाचवा जॉर्ज याचा पुतळा इंडिया गेटसमोरील मंडपात बसविण्यात आला होता. मात्र स्वातंत्र्य मिळवल्यानंतर तो पुतळा आणि त्यासह इतर ब्रिटीश कालीन पुतळे कोरोनेशन पार्कमध्ये हालविण्यात आले. सध्या या पुतळ्याच्या जागेवर ‘अमर जवान ज्योत’ ही भारतीय सैन्यदलातील शहीद सैनिकांच्या बलिदानाची साक्ष देत उभी आहे.
इंडिया गेटवर असलेल्या अमर जवान ज्योतीचे उद्घाटन, २६ जानेवारी १९७२ रोजी, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले होते. तेव्हा पासून ही अमर जवान ज्योत आपल्या सैनिकांच्या आहुतीची साक्ष देत धगधगते आहे. भव्य दिव्य इंडिया गेट पाहण्यासाठी आजही देश-विदेशातून अनेक पर्यटक येत असतात.
0 Comments