“दारुडा नेता” म्हणून सतत अपमान झेललेल्या माणसाच्या हाती जातंय पंजाबचं भविष्य!

२०१४ मध्ये मान यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. २०१७ साली ते आम आदमी पार्टीचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष झाले. २०१९मध्ये मन यांनी आपकडून लोकसभा निवडणूक जिंकली.


भगवंत मान हे नाव तसं २००० सालच्या दरम्यान चर्चेत आलं होतं. आता पुन्हा हे नाव पंजाबच्या जनतेच्या ओठी आहे ते म्हणजे त्यांच्या विधानसभा निवडणुकीतल्या विजयामुळे. मान यांनी आम आदमी पार्टीकडून पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवडणूक लढवली. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांची तुलना युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांच्याशी केली जात आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेनचे पंतप्रधान वोलोदिमीर झेलेन्स्की अचानक चर्चेत आले. झेलेन्स्की हे दखील राजकारणात येण्याआधी एक कॉमेडियन तसेच रशियन स्पीकर होते. कॉमीडियन ते पंतप्रधान हा त्यांचा प्रवासही तितकाच रंजक आहे. अशीच पुनरावृत्ती भारतातील पंजाबमध्ये झाली ती म्हणजे भगवंत मान यांच्या कॉमोडियन ते पंजाबचे मुख्यमंत्री या प्रवासामुळे! तर हे भगवंत मान भारतातले झेलेन्स्की कसे झाले ते पाहुयात…!

भगवंत मान हे प्रकाशझोतात आले ते टेलिव्हिजनवरील एका कॉमेडी शोमधून. २००० साली एका चॅनेलवर कॉमेडी शोमध्ये मन यांनी सहभाग घेतला होता. या शोचे नवज्योतसिंग सिद्धू हे जज होते. आणि या निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार दलवीर सिंग गोल्डी यांना मागे टाकत पंजाब जनतेचे मन जिंकले आहे.

भगवंत मान यांनी कॉमेडियन म्हणून काम करत असतानाच २०११ साली राजकारणात प्रवेश केला. त्यावेळी ते पंजाबमध्ये पिपल्स पार्टी ऑफ पंजाबमध्ये सामील झाले आणि या पार्टीच्या संस्थापक नेत्यांपैकी मान एक होते. २०१२ मधील विधानसभा निवडणूक त्यांनी याच पार्टीतून लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला.

दोनवेळा पराभवानंतर पिपल्स पार्टीची स्थापना करणारे मनप्रित बादल यांनी कॉंग्रेसचा रस्ता धरण्याचे ठरविले. मात्र भगवंत मान यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू होतं. २०१४ मध्ये मान यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. २०१७ साली ते आम आदमी पार्टीचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष झाले. २०१९मध्ये मन यांनी आपकडून लोकसभा निवडणूक जिंकली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांना पंजाबचे भावी मुख्यमंत्री म्हणून निवडणुकीत उतरवले. असे असताना मान यांच्या राजकारणातल्या किंवा कॉमेडियन म्हणून कारकिर्दीचा विचार केला गेला नाही. तसं तर मान यांचं आयुष्य अनेक अडचणींनी व्यापलेले होते.

दारूच्या आहारी गेलेला नेता अशी टीका अचानकपणे मान यांच्यावर होऊ लागली. आपचे बंडखोर नेते योगेंद्र यादव यांनी २०१४मध्ये झालेल्या खासदारांच्या बैठकीत मान हे दारू पिऊन आल्याचा आरोप केला होता.

कॅप्टन अमरिंदर सिंग, आपचे नेते हरिंदर सिंग यांनीही मान यांच्यावर दारू पिऊन येत असल्याचा आरोप केला. एवढेच नाही तर हरिंदर सिंग यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे जागा बदलण्याचीही मागणी केली होती. अनेक नेत्यांनी मान यांच्यावर संसदेत दारू पिऊन येत असल्याचे आरोप लावले. दारूच्या नशेत मान संसदेत भाषण करतात असे त्यांचे म्हणणे होते.

एका कार्यक्रमादरम्यान मान यांच्यावर दारू प्यायलाचा आरोप झाल्याने ते निघूनही गेले होते. मात्र, भगवंत मान यांनी कधीच कोणालाही या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही. वाद नको म्हणून ते त्यांच्या गाडीमधून निघून जात असत. भगवंत मान यांच्या समर्थकांनी हे सर्व आरोप भाजप आणि कॉंग्रेस यांच्याकडून केले जात असल्याचे सांगण्यात आले. अनेक वर्ष मान यांच्यावर हे आरोप झाल्यानंतर त्यांनी अखेर २०१९मध्ये बरनाला इथल्या सभेत त्यांच्या आईसमोर दारूला हात न लावण्याची शपथ घेतली.

भगवंत मान हे घटस्फोटित आहेत. त्यांना एक मुलगा आणि मुलगी अशी दोन मुलं आहेत. मान हे त्यांच्या कौटुंबिक आयुष्यापासून दूर आहेत, तसेच त्यांची दोन्ही मुले परदेशी स्थायिक आहेत. भगवंत मान विजयी झाले असताना त्यांचा एक जुना व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात मान हे नवज्योत सिंग सिद्धू यांना राजनीती म्हणजे काय असे विचारताच ‘राज करने की निती’ असे म्हणतात. तर गव्हर्नमेंट म्हणजे ‘एकही मसले पर गौर करके एक दिन में जो भूल जाती है वो गव्हर्नमेंट है’ असं म्हटलं आहे.

आता गंमत ही आहे की गव्हर्नमेंटचा अर्थ भगवंत मान यांनी नक्की कसा ओळखला आहे हे वेळच ठरवू शकते.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *