राजीव गांधींच्या हत्येमध्ये ‘ह्या’ सोनियाचा सुद्धा होता हात! अशी झाली संपूर्ण प्लॅनिंग!

९ दिवसांनी २१ मे १९९१ साली श्रीपेरंबुदूर येथे रात्री १० च्या दरम्यान राजीव गांधींच्या सभेवेळी हीच गोष्ट करण्यात धनु यशस्वी ठरली आणि तिने राजीव गांधींजवळ पोहोचताच कपड्याच्या आत लपवलेल्या बॉम्बचे बटण दाबले.


फॅमिली मॅन सिरीजचा दुसरा सिझन तुम्ही पाहिला असेल तर त्यातून तुम्हाला आपल्या हक्काच्या भूमीसाठी लढणाऱ्या ‘लिट्टे’ या बंडखोर संघटनेची माहिती झाली असेलच. हे श्रीलंकन तमिळ लोक! तिथे त्यांना श्रीलंकेतील मुळचे सिंहली समाजाचे लोक हीन दर्जाचे म्हणून वागवतात, म्हणून त्या विरुद्ध आवाज उठवणारी संघटना म्हणून ‘लिट्टे’ चा उदय झाला. पुढे ही संघटना हिसंक बनत गेली कारण श्रीलंकेच्या सरकारने त्यांना काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यातून लढाया, युद्ध, चकमकी सुरु झाल्या. अनेक लोक मारले गेले आणि श्रीलंकन सरकारने या संपूर्ण संघटनेला एक प्रकारे दहशतवादी घोषित केले.

Source : tosshub.com

आता तुम्ही विचार करत असाल हा लेख राजीव गांधीच्या हत्येबाबत आहे ना, मग हे सगळं का सांगताय? तर मंडळी ही पार्श्वभूमी जाणून घेणे अत्यंत महत्वाचे होते. कारण याच लिट्टे संघटनेमार्फत राजीव गांधींची हत्या करण्यात आली होती. श्रीलंकन सरकारने या सर्वांना तडीपार केल्यावर आश्रय म्हणून समुद्रमार्गे या संघटनेचे लोक भारतातील तामिळनाडू मध्ये येऊन राहायचे. तेथील तमिळ सुद्धा आपलेच भाऊबंध म्हणून त्यांना आश्रय द्यायचे. ही गोष्ट श्रीलंकन सरकारला सुद्धा ठावूक होती. म्हणून त्यांनी भारतावर दबाव टाकला की या संघटनेला आवरा यामुळे दोन्ही देशांचे अतोनात नुकसान होऊ शकते.

तेव्हा पंतप्रधान होते राजीव गांधी आणि त्यांनी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जयवर्धने यांच्या उपस्थितीत एक शांतीपूर्ण करार केला. हा करार होताच लिट्टेचा प्रमुख प्रभाकरन याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिथेच कुठेतरी त्याच्या डोक्यात सूडाची भावना निर्माण झाली होती. राजीव गांधी यांनी प्रभाकरनची भेट घेऊन त्याला समजावले आणि गिफ्ट म्हणून आपले एक बुलेटप्रुफ जॅकेट दिले. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे जॅकेट प्रभाकरनच्या अंगावर चढवले होते एका १७ वर्षांच्या मुलाने आणि तो मुलगा होता राहुल गांधी!

प्रभाकरन हा अत्यंत शांत डोक्याने काम करणारा माणूस होता. त्याने राजीव गांधीच्या हत्येचा प्लान पूर्णपणे तयार करायला ४ वर्षे घेतली. हे काम त्याने आपला खास सहकारी पोट्टू अम्मन वर सोपवली. त्याने पाच लोकांची टीम तयार केली. हे पाच जण अत्यंत कट्टर होते आणि प्रभाकरनच्या एका शब्दावर मृत्यू कवटाळण्यास सुद्धा तयार होते. सुसाईड बॉम्बर धनु, शुभा, नल्ली, शिवरासन आणि मुर्गन हे ते ५ जण! या प्रत्येकाला आपापली कामे सोपवली होती. जर धनु सुसाईड बॉम्बिंग करू शकली नाही तर दुसरा पर्याय म्हणून शुभा तयार होती. इतर सर्व वाहतूक विषयक कामे नल्ली पाहणार होती. शिवरासन आणि मुर्गन अन्य सपोर्टला होते.

Source : thehindu.com

हे लोक इतके हुशार की त्यांनी सर्वात आधी या हल्ल्याची रंगीत तालीम केली. १२ मे १९९१ ला तामिळनाडूच्या थिरूवलरुमध्ये आयोजित एका राजकीय सभेसाठी व्ही. पी. सिंग येणार होते. यांनी त्या सभेची निवड केली आणि त्यांना पहायचे होते की आपण व्ही.पी. सिंग यांच्या पर्यंत पोहचू शकतो की नाही. मुख्य राजकीय व्यक्तीच्या आसपासची सिक्युरिटी आपल्याला तोडता येते का हे त्यांना पहायचे होते आणि त्यात धनु यशस्वी झाली. ती व्ही.पी. सिंग यांच्या पर्यंत पोहोचली आणि त्यांच्या पाया पडली. तेथील अनेक कॅमेऱ्यात ही गोष्ट टिपली गेली.

पुढे बरोबर ९ दिवसांनी २१ मे १९९१ साली श्रीपेरंबुदूर येथे रात्री १० च्या दरम्यान  राजीव गांधींच्या सभेवेळी हीच गोष्ट करण्यात धनु यशस्वी ठरली आणि तिने राजीव गांधींजवळ पोहोचताच कपड्याच्या आत लपवलेल्या बॉम्बचे बटण दाबले आणि देशावर शोककळा पसरली. संपूर्ण पोलीस यंत्रणा मारेकऱ्यांना शोधण्यास सरसावली. धनुला सर्वात आधी ओळखले तामिळनाडू पोलीस खात्यातील पोलीस अधिकारी अन्सुया यांनी! हीच मुलगी व्ही.पी. सिंग यांच्या पाया पडण्यासाठी आली होती हे अन्सुया यांच्या लक्षात आले आणि त्या दिशेने शोध सुरु झाला.  

पोलिसांना शुभाचा सुगावा लागला. पण ते पोहोचण्याआधीच तिने स्वत:चा जीव घेतला. आता पुढे काय करायचे हे पोलिसांना कळत नव्हते. इतक्यात त्यांना दिल्ली मध्ये अजून एक संशयित असल्याची टीप मिळाली. त्या दिशेने शोध सुरु झाला. तिला ताब्यात घेण्यात आले.  तिने स्वत:चे नाव सोनिया सांगितले. पण पुढे अधिक चौकशीत तिचे खरे नाव अथीराई असल्याचे पुढे कळले. ती पोट्टू अम्मनचा बॅकअप होती. जर तामिळनाडू मध्ये धनु आपल्या कामात अयशस्वी ठरली असती तर तो प्लान सोनिया दिल्लीमध्ये पार पाडणार होती.

राजीव गांधींनी प्रभाकरनला प्रत्येक प्रकारे सहाय्य केले. त्याला आपल्या बाजूला बसवून आश्वस्त केले. पण त्याच माणसाने उपकारांची परतफेड या प्रकारे केली. राजीव गांधी प्रभाकरन सारख्या माणसाला ओळखण्यात चुकले हेच दुर्दैव!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Shraddha More