तब्बल ७४ वर्षांनी भेटलेल्या भावांची डोळ्यात पाणी आणणारी गोष्ट!


ब्रिटिश सरकारने तब्बल १५० वर्ष आपल्यावर राज्य केलं. Divide And Rule हा क्रूर नियम त्यांनी आपल्यावर वापरून तब्बल १५० वर्षे आपल्यावर सत्ता गाजवली. ह्या जोखडातून आपला देश स्वतंत्र झाला खरा, पण जाता जाता गोऱ्यांनी आपल्या देशाचे तुकडे केले आणि आपल्या देशाची फाळणी झाली. या फाळणीमधून नवीन देश म्हणजेच पाकिस्तानचा जन्म झाला.

वाचा : आजोबा स्वत:ला श्री रामाचे वंशज समजायचे आणि त्यांच्याच नातवाने पाकिस्तानची मागणी केली!

या फाळणीने अनेकांचे आयुष्य उध्वस्त केलं आणि भरपूर मुस्लीम बांधव भारत देश सोडून पाकिस्तानकडे रवाना झाले. त्याचप्रमाणे पाकिस्तान मध्ये राहणारे हिंदू लोक भारतात येऊ लागले. मात्र ह्या फाळणीत अनेक एकत्र कुटुंबे विभागली गेली. इतकी हेळसांड झाली की काही लोकं आपल्या कुटुंबात पासून कायमची दूर गेली आणि तो दुरावा कधी कमीच झाला नाही. अशीच एक गोष्ट दोन भावांची आहे.

Source : theprint.in

दोन भाऊ जे ८० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत त्यांची ही गोष्ट. फाळणीच्या काळात या दोन भावांची एकमेकांपासून तुटातूट झाली आणि एक भाऊ पाकिस्तानातच राहिला आणि दुसरा भाऊ भारतात आला.

मोहम्मद सिद्दीक आणि त्यांचा मोठा भाऊ मोहम्मद हबीब यांची ही गोष्ट मनाला अगदी चटका लावून जाते. फाळणीच्या वेळेला मोहम्मद सिद्दीक हे अगदी तान्हुलं बाळ होते, कुटुंबांसमवेत ते पाकिस्तानातच राहिले आणि त्यांचं अख्खं आयुष्य फैसलाबाद मध्ये घडलं. तर मोहम्मद हबीब ह्या मोठ्या भावाल सुद्धा आपण नक्की कुठे जातोय हे कळले नाही आणि पाकिस्तानची बॉर्डर पार करून ते अन्य नातेवाईकांसोबत भारतात येऊन राहिले.

फाळणीच्या दरम्यान हे दोघे भाऊ एकमेकांपासून दुरावले ते आज तब्बल ७४ वर्षानंतर एकमेकांना भेटले. दरम्यान मोठ्या भावाने आपल्या भावाची माहिती काढण्याचा खूप प्रयत्न केला. त्यात त्याला यश सुद्धा आले. पण दोन्ही देशांच्या बिघडलेल्या संबंधांमुळे भेट रखडतच चालली होतो. तोवर एकमेकांशी फोनवर संवाद त्यांनी सुरु ठेवला होता. पण करतारपूर कॉरीडोर सुरु झाला आणि भेटीच्या अशा अधिक प्रबळ झाल्या. करतारपुर हे गाव पाकिस्तानच्या पंजाब मध्ये येतं आणि तिथे आहे शीख धर्मियांचे पवित्र धर्मस्थान गुरुद्वारा दरबार साहिब! भारताच्या पंजाबच्या बॉर्डर वरून अवघ्या ५ किलोमीटर हे स्थळ आहे, पण व्हिजा शिवाय तिथे जाता यायचे नाही.

वाचा : LOC, LAC आणि International Border मध्ये नेमका फरक आहे तरी काय?

तर खास शीख धर्मिय आणि अन्य भाविक ज्यांना गुरुद्वारा दरबार साहिबचे दर्शन करता यावे त्यांच्यासाठी २०१९ सालापासून करतारपुर कॉरिडोर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या समंतीने सुरु करण्यात आला.

त्यामुळे सहजरित्या भारतातून पाकिस्तानच्या करतारपूर पर्यंत जाता येतं ते देखील व्हिजा न दाखवता! दोन्ही भावांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. अखेर २०२२ मध्ये त्यांची भेट झालीच. जेव्हा दोघे एकमेकांना भेटले तेव्हा दोघांना सुद्धा अश्रू अनावर झाले नाहीत. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत सुद्धा पाणी तरळले.

पंजाब पोलिसांचा एक व्हिडिओ असाच मध्यंतरी वायरल झाला, ज्यात एका व्यक्तीची तेलंगणा राज्यात असलेल्या त्याच्या कुटुंबियांशी गाठ भेट झाली. मंडळी अशा कथा ऐकल्या की आपलंही मन भरून येत नाही का?


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *