LOC, LAC आणि International Border मध्ये नेमका फरक आहे तरी काय?

सीमा रेखेची भांडणे हा काही नवीन विषय नाही तर स्वातंत्र्य काळापासून चालत आलेला वादातीत जुना विषय आहे.


आपल्याला माहितच आहे की भारताल शेजारी राष्ट्रे खूप आहेत. सगळ्यात मोठा शेजारी व शत्रू म्हणजेच पाकिस्तान. हा देश एकीकडे तर दुसऱ्या बाजूला चीन हा देश सुद्धा नेहमी आपली सीमा रेखा अधिक मोठी करण्यासाठी कुरघोड्या करत असतो. स्वातंत्र्य काळापासून म्हणजेच १९४७ या सालापासून आपले शेजारी आपल्या हक्काच्या घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही घुसखोरी अजूनही सुरूच आहे.

सीमा रेखेची भांडणे हा काही नवीन विषय नाही तर स्वातंत्र्य काळापासून चालत आलेला वादातीत जुना विषय आहे. त्याबद्दल तुम्हाला वेगळे काय सांगायचे? तुम्ही तर सगळे जाणताच! पण तुम्हाला माहित नसलेली एक गोष्ट आम्ही आज सांगणार आहोत. ही गोष्ट आहे LOC, LAC आणि इंटरनॅशनल बॉर्डरची!

Source : tosshub.com

LOC म्हणजेच नियंत्रण रेखा, LAC म्हणजे वास्तविक नियंत्रण रेखा व तिसरा प्रकार म्हणजे इंटरनॅशनल बॉर्डर्स अर्थात आंतरराष्ट्रीय सीमा.

जेव्हा जेव्हा आपल्या शेजाऱ्यांचा विषय निघतो तेव्हा तेव्हा आपल्या कानावर LOC, LAC आणि आंतरराष्ट्रीय सीमा असे शब्द पडतात. १९४७-१९४८ साली भारत पाकिस्तान मध्ये एक युद्ध झालं. या युद्धानंतर जम्मू-काश्मीरचा थोडासा भाग पाकिस्तानला दिला गेला. ह्या भागाला पाकिस्तानने आजाद कश्मीर म्हणून संबोधलं. ह्या युद्धानंतर काश्मीरचा एक तृतीयांश भाग पाकिस्तानकडे गेला. तर भारताकडे दोन तृतीयांश भाग राहिला. यात काश्मीरची घाटी आणि लदाख भारतात सामावले गेले. १९७१ साली पाकिस्तान बरोबर आपलं पुन्हा युद्ध झालं आणि एकमेकांच्या पेट्रोलिंग स्टेशन्स वरती कब्जा करण्यात आला. १९७२ साली पुन्हा पाकिस्तान बरोबर आपले युद्ध झाले व शिमला करार मधून नियंत्रण रेखा म्हणजेच LOC आकारात आली. भारत आणि पाकिस्तान मध्ये ७४० किलोमीटर एवढी मोठी नियंत्रण रेषा आहे. आज देखील ही नियंत्रण रेषा तशीच्या तशीच आहे.

आता चीन बद्दल काय बोलावं? भारत आणि चीन मध्ये LAC म्हणजेच वास्तविक नियंत्रण रेखा ३४८८ किलोमीटर एवढी आहे. ही वास्तविक नियंत्रण रेखा तीन भागात विभागली गेली आहे. पश्चिमेला जम्मू आणि काश्मीर, तर मध्ये उत्तराखंड, हिमाचल प्रदेश तर उत्तरेकडे अरुणाचल प्रदेश व सिक्कीम यांचा समावेश होतो. भारत आणि चीन या दोघांमधली वास्तविक नियंत्रण रेषा ही अजून पक्की झालेली नाही. त्यामुळे अनेकदा या नियंत्रण रेषेवरून वाद-विवाद होतच असतात. भारत देश अक्साई चीन वर आपला हक्क दाखवतो तर चीन देश अरुणाचल प्रदेशवर आपला हक्क दाखवतो.

Source : twitter.com

आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की भारत व चीन या दोन देशांमध्ये १९६२ साली मोठे युद्ध झाले. ज्या सीमारेषेवरती चीनचे युद्ध व भारतीय सैन्य तैनात होते आजही त्याच जागेवर दोन्ही देश एकमेकांसमोर आपल्या भूमीचे रक्षण करत उभे आहेत. या युद्धानंतरच LAC अर्थात वास्तविक नियंत्रण रेषेचा उगम झाला.

भारत आणि चीन देश वास्तविक नियंत्रण रेषेला मानत नाहीत व आजही वेगवेगळ्या भागांवरती आपले हक्क दाखवत असतात. ह्यामुळे बऱ्याचदा भारतीय सैन्य व चीन सैन्य एकमेकांसमोर येतं आणि आपापल्या पेट्रोलिंग स्टेशन वरून एकमेकांना संदेश पाठवतात. वास्तविक नियंत्रण रेषेवरती भारतीय सैन्य नेहमी तैनात असतं व चीन सैन्य भारतीय भूखंडात घूसखोरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना एक संदेश पाठवतं.

हा संदेश दोन देशांमधील झालेल्या कराराप्रमाणे मोठे बॅनर उभे करून सांगितला जातो. २००४ सालापासून वास्तविक नियंत्रण रेषा ही इंडो तिबेटियन बॉर्डर फॉर्सच्या अधिपत्याखाली आहे.

Source : tacdn.com

इंटरनॅशनल बॉर्डर म्हणजेच आंतरराष्ट्रीय सीमारेषा ही सगळ्या देशांत तर्फे मान्यता आल्यावर आखली जाते. नेपाळ, भूतान बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान आणि चीन या देशांबरोबर भारताची आंतरराष्ट्रीय सीमा आखली गेली आहे. नेपाळ आणि भारत देशामध्ये अजूनही योग्य सीमारेषा आखली गेली नाहीये. याचे कारण म्हणजे नेपाळ आणि भारतात कोणतेही युध्दजन्य वाद नाहीत.

तर मंडळी या सर्व ह्या सीमारेखा युद्ध करून नाही तर एकमेकांशी चर्चा करून सामंजस्यानेच आखल्या गेल्या पाहिजेत असे जाणकार सुद्धा सांगतात. आपल्या भारताचे सुद्धा शेजारी देशांसोबतचे नियंत्रण रेषेवरून असलेले वाद-विवाद कमी होतील व कधी युद्धाची वेळ येणार नाही अशी आशा बाळगू या.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *