देशात ‘हा’ प्रॉब्लेम निर्माण होऊ नये म्हणून मोबाईल नंबर 10 आकडी असतात!

आता आपलं जे मोबाईल सेवांशी संबंधित मंत्रालय आणि बोर्ड असतं ते काय विचार करतं की जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती हा मोबाईल फोन वापरणारच.....


भारतात मोबाईलची क्रांती १९९५ सालापासून सुरु झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत लाखो नाहीतर अब्जावधी भारतीय मोबाईल्सचा वापर करत आहेत. या मोबाईलचा खरा वापर कशासाठी होत आलाय? तर एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी! आणि हा संपर्क कसा साधला जातो तर मोबाईल नंबर मधून!

मोबाईल नंबर हा नेहमीच असतो १० आकडी, पण मंडळी कधीतरी तुमच्या मनात हा विचार आला आहे का की हा मोबाईल नंबर १० आकडीच का असतो? ५ आकडी, ६ आकडी किंवा ८ आकडी का नसतो? काय म्हणता? तुम्हाला सुद्धा अजून याचं उत्तर मिळालेलं नाही? फिकर नॉट! आज आपण मोबाईल नंबर १० आकडीच असण्यामागे नक्की लॉजिक तरी काय हे ते जाणून घेऊ.

हे लॉजिक जाणून घेण्याआधी आपल्याला हे माहित असायला हवं की प्रत्येक देशातील मोबाईल नंबर किती आकडी असतील हे त्या देशाच्या लोकसंख्येवरून ठरतं आणि त्यानुसारच मोबाईल नंबरची मार्गदर्शक तत्वे ठरतात.

आता सध्याची भारताची लोकसंख्या आहे १,३४६,०४७,६४५ आणि दर सेकंदाला हा आकडा वाढत असतो बरं का! तुम्ही Live Population या वेबसाईट वर जाऊन दर सेकंदाला भारताची लोकसंख्या किती वेगाने वाढते आहे ते पाहू शकता.

आता आपलं जे मोबाईल सेवांशी संबंधित मंत्रालय आणि बोर्ड असतं ते काय विचार करतं की जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती हा मोबाईल फोन वापरणारच आणि मोबाईल फोन वापरणार म्हणजे तो स्वत:साठी मोबाईल नंबर सुद्धा घेणारच! म्हणूनच भारत सरकारने  National Numbering Plan (NNP) नुसार दहा आकड्यांचा मोबाईल नंबर स्वीकारला.

Source : theprint.in

आता १० आकडीच का? तर या दहा आकड्यांमधुन आपण तब्बल १ हजार कोटी कॉम्बीनेशन्स अर्थात नंबर तयार करू शकतो. म्हणजेच भारताने १० आकडी नंबर यासाठी स्वीकारला आहे जेणेकरून भारताची लोकसंख्या जरी १ हजार कोटीवर गेली तरी सर्वांना युनिक मोबाईल क्रमांक मिळू शकतात.

अजून नाही समजलं? अजून सोप्पं करून सांगतो. समजा तुमच्याकडे २ केळी आणि ४ सफरचंद आहेत. तर मग आता तुम्ही आलटून पालटून या फळांचे किती कॉम्बीनेशन्स बनवू शकता? तर जास्तीत जास्त फक्त ८ कॉम्बीनेशन्स! हेच गणित जर तुम्ही १० आकडी मोबाईल नंबरला लावलं, तर तुम्हाला १० क्रमांक मिळतात आणि या १० क्रमांकामधून तुम्ही १० बिलियन म्हणजेच तब्बल १ हजार कोटी मोबाईल नंबर तयार करू शकता. आता भारताची लोकसंख्या १ बिलियन आहे म्हणजे अजून १० पट जरी वाढली तरी आपल्याला मोबाईल नंबर्स कमी पडणार नाहीत. आपण प्रत्येकाला वेगवेगळा नंबर देऊ शकतो. तर हे आहे भारतातील १० आकडी मोबाईल नंबर मागचं लॉजिक!

पण आता डबल सीम कार्ड्सचे फोन्स आपल्याने थोडं टेन्शन वाढलंय कारण अचानक मोबाईल नंबर्स दुप्पट झाले. शिवाय कंपन्या सुद्धा कॉल्स करण्यासाठी १० आकडी मोबाईल नंबरच वापरायच्या. तर हे रोखण्यासाठी सरकार तर्फे मार्केटिंग कॉल्स वा अन्य स्पॅम कॉल्स साठी वेगळ्या आकड्यांचा नंबर जारी केला आहे. शिवाय हे नंबर वन टाईम युज असतात. तुम्ही त्यावर पुन्हा कॉल बॅक करू शकत नाही किंवा वापरू शकत नाही. हे सर्व मशीनच्या माध्यमातून हँडल केले जाते.

Source : pcf.gallery

लोकसंख्येच्या हिशोबाने मोबाईल नंबर किती आकडी हे ठरतात तर मग इतर देशांत वेगवेगळ्या आकड्यांचे मोबाईल नंबर आहेत का? तर हो! जसे की Niue नावाच्या देशात कंट्री कोडसह फक्त ६ आकडी मोबाईल नंबर आहे. कारण त्यांची लोकसंख्या तेवढी जास्त नाही आणि अतिशय संथ गतीने वाढते आहे. या उलट स्थिती चीनची आहे आणि म्हणून तिकडे १२ आकडी मोबाईल नंबर जारी केले जातात.

जाणकार मात्र अशी भीती व्यक्त करत आहेत की अगदी काही वर्षांतच भारताला सुद्धा ११ किंवा १२ आकडी मोबाईल नंबर पद्धत वापरावी लागेल, कारण भारताचा लोकसंख्या वाढीचा वेग हा जगात सर्वात जास्त आहे!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal