रावणाची अशी काही रहस्ये जी आपल्याला आजवर कोणीच सांगितली नाहीत!

रावणाचं नाव हे त्याचं पाळण्यातलं नाव न्हवे हा! होय, रावणाचं खरं नाव दशग्रीव / दशनाना ( १० डोकी असणारा राक्षस) असं होतं . मग ‘रावण’ या नावामागचं रहस्य म्हणजे नक्की काय


“रावण रावण होता है !” हा famous dialogue आपल्या कानी हजारो वेळा पडला असेल, हो ना मित्रांनो? १० डोकी आणि २० हात असणारा रावण हा धरतीवरचा सर्वात क्रूर राक्षस हे वारंवार आपण ऐकतो किंवा वाचत आलो आहोत पण guys do you really think रावण इतका क्रूर होता? बरं क्रूर असण्याव्यतिरिक रावणाचे बरेच interesting पैलू आहेत जे आपण आज उलगणार आहोत. अर्थात ही सर्व माहिती हिंदू ग्रंथ आणि साहित्यांमध्ये आढळलेले सत्य आहे so chill guys, this is going to be fun!

Source : sabrangindia.in

आज आम्ही रावणासंदर्भाच्या अश्या खास गोष्टी उलगडणार आहोत ज्या क्वचितच तुम्हाला माहित असतील, आणि त्या जाणून तुम्हाला नक्कीच नवीन माहिती मिळेल याची खात्री आहे.

सर्वांना माहीतच आहे की रावण हा एक राक्षस आहे पण guys तुम्हाला माहित आहे का की तो एक ब्राह्मण सुद्धा आहे, नाही ना? बरं यामागचं गणित मी तुम्हाला समजावते. ते काहीसं असं आहे कि त्याचे वडील विष्वाश्रवा हे एक ऋषी होते जे पुलस्त्य वंशाचे होते (ब्राह्मण) आणि त्याची आई कैकासी ही राक्षस वंशाची होती.

विष्वाश्रवा यांच्या दोन बायका होत्या वरावरणिनी आणि कैकासी. संपत्तीचे देवता कुबेर हे त्यांच्या पहिल्या बायकोच्या पोटी जन्मलेले तर रावण, कुंभकरण, शुर्पनखा आणि विभीषण यांनी कैकासी यांच्या पोटी जन्म घेतला.

रावण हा फार क्रूर होता ही गोष्ट मात्र खरी आहे कारण boss शेवटी रावण रावण होता है ना! हे बोलण्यामागचं कारण म्हणजे अशी एक घटना होती ज्याने त्याची क्रूरता आपल्याला ठळकपणे दिसून आली रावण आणि त्याचा भाऊ कुंभकरण याने अत्यंत कठीण तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून अविश्वसनीय अश्या शक्ती प्राप्त केल्या आणि ते मिळताच त्यांनी त्याच्या धाकट्या भावाचे (कुबेर) राज्य त्याच्याकडून हिसकावून घेतले आणि लंकेवर त्यांचा ताबा मिळवला.

Guys आणखीन एक interesting गोष्ट म्हणजे रावणाचं नाव हे त्याचं पाळण्यातलं नाव न्हवे हा ! होय, रावणाचं खरं नाव दशग्रीव / दशनाना ( १० डोकी असणारा राक्षस) असं होतं . मग ‘रावण’ या नावामागचं रहस्य म्हणजे नक्की काय? Let me explain guys…

Source : vedicfeed.com

शिव प्रभू ज्या पर्वतावर ध्यान करायचे ते कैलास पर्वत जेव्हा रावणाने जागेवरून हलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिव यांनी आपल्या पायांच्या बोटांनी तो पर्वत तिथेच ठेवायचा प्रयत्न केला. या सर्व प्रसंगात रावणाचा हात जबरदस्त जखमी झाला, ते रक्त पाहून रावण त्या वेदनेने जोर जोरात ओरडायला लागला तेव्हा पासून त्याचे नाव ‘रावण’ ( किंचाळणारा व्यक्ती ) असे पडले आणि अगदी तेव्हापासूनच रावण हा शिव प्रभूंचा खूप मोठा भक्त झाला. रावणचं तो राक्षस ज्याने शिव तांडव स्रोत्रमची निर्मिती केली.

इक्ष्वकू राजघराणातले राजा अनारण्य ज्यांचा थेट संबंध प्रभू राम यांच्याशी येतो त्यांचा वध रावणानेचं केला. राजा अनारण्य जेव्हा आपल्या मृत्यूच्या उंबरठ्यावर होते तेव्हा त्यांनी रावणाला शाप दिला की त्याचा वध हा राजा दशरथांच्या मुलाच्या हातूनच होईल.

वानरांचा राजा वाली याचीही हत्या करायचा प्रयत्न रावणाने केला होता. वाली इतका बलवान होता की त्याने रावणाला एका खांद्यावर धरत किशकिंध्य इथे पुन्हा आणले जिथे रावणाने त्याची ईच्छा वाली समोर मंडली आणि मैत्रीचा हात पुढे केला. सुग्रीव सोबतच्या लढाईत वालीचा मृत्यू शेवटी भगवान राम यांच्याचं हातून झाला.

रावणाच्या व्यक्तिमत्वातली interesting गोष्ट म्हणजे तो फक्त एक बलवान लढवय्याचं नव्हे तर वेदशास्त्र आणि ज्योतिष शास्त्र तज्ञ होता. असं म्हंटलं जातं कि रावणाच्या मुलाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्याने सर्व ग्रह, तारे, नक्षत्र आणि सूर्य या सर्वांना अचूक दिशेत उभं राहायची आज्ञा दिली होती जेणेकरून त्याचे मूल हे अमर व्हावं.

दुसरी गोष्ट म्हणजे रावण हा राजकारण आणि आंतराष्ट्रीय संबंध हाताळण्यात तरबेज होता . जेव्हा रामाने रावणाचा वध केला तेव्हा प्रभू रामांनी त्यांच्या लहान भाऊ लक्ष्मण यांना सूचना दिल्या कि त्यांनी रावणाकडून हि अद्भुत कला शिकून घ्यावी.

हजारो वर्षांच्या तपश्चर्येनंतर रावणाने ब्रह्मदेवांकडून अमरत्वाचे वरदान मागितले पण भगवान ब्रह्म यांनी अत्यंत नम्रपणे हि विनंती फेटाळत रावणाला हे सांगितले की त्याचे संपूर्ण आयुष्य हे त्याच्या पोटाच्या नाभी भोवतीच केंद्रित राहील. रावणाचा भाऊ विभीषणाला हे ज्ञात होते आणि त्यांनीच श्री राम यांना युद्धाच्या १०व्या दिवशी हि माहिती दिली कि त्यांनी थेट रावणाच्या नाभीवर वार करावा ज्यामुळे त्याचा वध होईल.

रावणाला ब्रह्मदेवाकडून हे वरदान प्राप्त झाले होते की कोणतीही देवता, राक्षस, किन्नर किंवा गंधर्व त्याचा वध करू शकत नाही पण रावण हा या वस्तुस्थितीशी अनभिज्ञ होता कि त्याचा मृत्यू एका मनुष्याच्या हाताने नक्कीच होऊ शकतो. कुठेतरी नकळत याच कारणाने त्याचा मृत्यू प्रभू श्री रामांच्या हातून झाला.

रावणाचे राज्य हे बाली द्वीप (आत्ताचे’ बाली), मलायाद्वीप (मलेशिया), अंगाद्वीप, विरहद्वीप , शंखद्वीप, युवाद्वीप , आंध्रलया आणि कुशद्वीप इतके दूरवर पसरले होते. रावणाने फक्त कुबेराचीचं लंका हडप केली नाही तर त्याचे पुष्पक विमान ही हडपले. असं म्हणतात की हे विमान वेगवेगळ्या आकारात आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या वेगाने प्रवास करू शकते.

मग? वाटले कि नाही हे सर्व facts तुम्हाला interesting? बरं तुमच्याकडे रावणासंदर्भात अश्या काही इन्टरेस्टिंग गोष्टी असतील तर guys आमच्यासोबत नक्की share करा . तोवर Don’t forget ha “ रावण रावण होता है boss!”


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Choose A Format
Personality quiz
Series of questions that intends to reveal something about the personality
Trivia quiz
Series of questions with right and wrong answers that intends to check knowledge
Poll
Voting to make decisions or determine opinions
Story
Formatted Text with Embeds and Visuals
List
The Classic Internet Listicles
Countdown
The Classic Internet Countdowns
Open List
Submit your own item and vote up for the best submission
Ranked List
Upvote or downvote to decide the best list item
Meme
Upload your own images to make custom memes
Video
Youtube, Vimeo or Vine Embeds
Audio
Soundcloud or Mixcloud Embeds
Image
Photo or GIF
Gif
GIF format