साउथच्या हिरोंचे आवाज आपल्याला माहीत आहेत, पण हिरोईन्सना आवाज कोण देतं?

डबिंग आर्टिस्ट खरंच आवाजाचे जादूगारच आहेत असंच म्हणावं लागेल.


आजकाल दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ संपूर्ण भारतभर पहायला मिळते. या चित्रपटांमधले ऍक्शन आणि पुरेपूर ड्रामा असलेले कथानक लोकांना भूरळ पाडू लागले आहेत. म्हणूनच आता टॉलिवूडचे कलाकारही बॉलीवूडसोबत एकत्र काम करण्यासाठी उत्सुक दिसतात. तिथे प्रदर्शित होणारे सिनेमा देशभरात हिंदी भाषेतून डब केले जातात. भाषेची अडचण दूर करुन एक सुंदर कलाकृती आपल्यापर्यंत पोहचविण्याचे काम व्हॉईस आर्टिस्ट करतात.

व्हॉईस आर्टिस्ट होणं इतकं सोपही नाही बरं. चित्रपटात कलाकारांनी जीव ओतून काम केले असते. ती कला जशीच्या तशी, तितक्याच ताकदीने पोहचविण्याचे काम व्हॉईस आर्टिस्ट तथा व्हॉईस ऍक्टर करतात. अशाच काही फिमेल व्हॉइस आर्टिस्ट ज्या पडद्यामागच्या (खरं तर किंवा आवाजामागच्या म्हणायला हवं) कलाकार आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

  • तोशी सिन्हा (Toshi Sinha)
Source : nettv4u.com

तोशी सिन्हाने अनुष्का शर्माला भागमती आणि मिर्ची या चित्रपटासाठी आपला आवाज दिला आहे. त्याचबरोबर तिने नित्या मेननला, त्रिशा आणि रावडी हिरो 2 मध्ये आवाज दिला. जमाई राजा या चित्रपटात तिने हंसिका मोटवानीचे डबिंग केले.

  • शगुफ्ता बेग (Shagfta Baig)
Source : YouTube.com

थेरी या चित्रपटात, सॅमेंथा रुथ प्रभूसाठी शगुफ्ताने हिंदी डबिंग केले होते. द रिय जॅकपॉटमध्ये तिने तापसी पन्नूला आवाज दिला. जंगबाज आणि हिरो नंबर जिरो 2 या चित्रपटांमध्ये काजल आगरवालचे हिंदी डबींग शगुफ्तानेच केलं. त्याचबरोबर कॅथरिन ट्रेशाला डॅशिंग हिरो या चित्रपटात, सरायनोडू दिलवालामध्ये रकुल प्रीत सिंहला, फिदा मध्ये साई पल्लवीला आणि येवडू ३ मध्ये अन्नु मॅन्युअलला तिने आपला आवाज दिला होता.

  • उर्वी आशर (Urvi Ashar)

उर्वी आशरने श्रुति हसनला, लकी द रेसर आणि पुलिसवाला गुंडासाठी हिंदी व्हॉईस दिला. त्याचबरोबर तिने काजल आग्रवालला येवडू 2 आणि नंबर वन बिझनेसमन या चित्रपटातून आवाज दिला.

  • सबिना मलिक मौसम (Sabina Malik Mausam)

सबिना मलिक मौसमचा आवाज तर बाहुबली या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहचला. तिने बाहुबलीमध्ये राम्या कृष्णनसाठी हिंदी व्हॉईस दिला होता. त्याच बरोबर F2: Fun and Frustration मध्ये तमन्ना भाटियासाठी, सबसे बडा डॉनमध्ये असिनसाठी, गोलिमारमध्ये प्रियामणीसाठी आणि केजीएफमध्ये श्रीनिधी शेट्टीसाठी हिंदी व्हॉईस दिला.

  • स्मिता मल्होत्रा
Source : nettv4u.com

स्मिता मल्होत्रा एक नावाजलेली डबिंग आर्टिस्ट असून तिने सुपरहिट ठरलेल्या ‘पुष्पा’ सिनेमात श्रीवल्लीच्या पात्राला आवाज दिला आहे.

  • शाइनी प्रकाश (Shiney Prakash)
Source : facebook.com

दमदार खिलाडी या चित्रपटात अभिनेत्री अनुपमासाठी शायनी प्रकाशने हिंदी डबिंग केले. त्याचबरोबर Onti मध्ये मेघना राजला, F2: Fun and Frustration मध्ये मेहरीनकौर परीजादासाठी हिंदी व्हॉईस दिला.

  • पूजा पंजाबी (Pooja Punjabi)

पूजा पंजाबीने द रियल तेवर या चित्रपटाची अभिनेत्री श्रुति हसनसाठी डबिंग केलं होत. अर्जुन की दुल्हनियामध्ये रुहानी शर्मासाठी, इंस्पेक्टर विजय मध्ये काजल अग्रवालसाठी, ब्रांड बाबू मध्ये ईशा रेब्बासाठी आणि जानी दुश्मनमध्ये अंजलीसाठी हिंदी डबिंग केले होते.

  • शैली दुबे राव (Shaily Dubey Rao)
Source : nettv4u.com

शैली दुबे रावने शूरवीर २ चित्रपटात रकुलप्रीत सिंहला तर Take Off चित्रपटात पार्वती थिरुवथ्थूला हिंदी आवाज दिला होता.

  • नंदनी शर्मा (Nandini Sharma)
Source : nettv4u.com

नंदनी शर्माने, गीता गोविंदा या चित्रपटात रश्मिका मंदानाला आणि मधुरा राजा चित्रपटात महिमा नाम्बियारला आपला हिंदी आवाज दिला.

पल्लवी जाधव (Pallavi Jadhav)

Source : bmscdn.com

पल्लवी जाधवने साम्य 2 या चित्रपटात, कीर्ती सुरेशला तर डेयरिंग बाजमध्ये सॅमेंथा रुथ प्रभुला आणि बाजारसाठी अदिति प्रभुदेवाला आवाज दिला होता.

  • मुस्कान जाफरी (Muskan Jafery)

एकेकाळी आपल्या विनोदाची जादू चालविणाऱ्या कॉमेडीयन जगदीश आठवतात? त्यांचीच लाडकी लेक मुस्कान जाफरी आता आवाजाच्या दुनियेत आपली जादू चालवते आहे. मुस्कान जाफरीने तकदीर चित्रपटात कल्याणी प्रियदर्शनसाठी, रेमो और द सुपर खिलाड़ी 3 मध्ये कीर्ती सुरेशसाठी, डियर कॉमरेडमध्ये रश्मिका मंदानासाठी, शिवालिंगा मध्ये रितिका सिंहसाठी, दमदारमध्ये अनुपमा परमेश्वरमसाठी हिंदी डबिंग केलं.

डबिंग आर्टिस्ट खरंच आवाजाचे जादूगारच आहेत असंच म्हणावं लागेल. आता फक्त राज्याच्या पलीकडचेच नाही तर जगभराच्या कानाकोपऱ्यातले चित्रपट वा मालिका आपल्यापर्यंत पोहचू शकतात आपल्या मनाला भिडू शकतात ते याच आवाजाच्या कलाकारांमुळे.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *