काही हजारांसाठी करायचा सेल्समनची नोकरी आता एका चित्रपटासाठी घेतो लाखो रुपये!

दुबईत विजयचे मन फार रमले नाही. तो भारतात परतला आणि त्याने मित्रासह इंटिरिअर डिझाईनिंगचा व्यवसाय सुरु केला.


तुम्ही जर दाक्षिणात्य चित्रपटांचे चाहते असाल, तर मग नक्कीच तुम्हाला विजय सेतुपती कोण हे सांगायला नको. आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करणारा विजय सेतुपती म्हणजे तमिळ चित्रपटांमध्ये काम करणारा अस्सल कलाकारच. विजयने तमिळ चित्रपटांसह, तेलगु आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मात्र अभिनेता होण्यासाठी विजयला खुप स्ट्रगल करावा लागला आहे बरं. त्याच्या स्ट्रगलची कथा ही कुठल्याही चित्रपटेच्या कथेसाठी शोभेल अशीच आहे.

Source : filmibeat.com

विजय सेतुपती म्हणजेच विजय गुरुनाथ सेतुपति कालीमथुचा जन्म १६ जानेवरी १९७८ ला तमिळनाडुमधील राजपलायम नामक शहरात झाला. विजय एका सामान्य कुटूंबातील मुलगा.

त्याच्या घराण्याचा चित्रपट क्षेत्राशी दूर दूर पर्यंत काही संबंधच नाही. मात्र विजयच्या डोक्यात पहिल्यापासून फिल्मी किडा होता. त्याचा हे क्षेत्र आजमावायाचेच होते. मात्र त्याचे स्वतःचे लुक आणि घरची परिस्थिती दोन्ही गोष्टींमुळे ही चंदेरी दूनिया त्याला लांबच भासे.

विजयने आपले शालेय शिक्षण चेन्नईतील कोडंबक्कममधल्या MGR उच्च माध्यमिक शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर चेन्नईतील धीरजभाई जैन कॉलेजमधून बीकॉम केले. याच दरम्यान त्याने चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी अनेक ऑडीशन्स दिल्या. पण पदरी अपयशच पडलं. प्रत्येक वेळी “तुमच्या अभिनयात काही दम नाही”असं कारण पुढे करत त्याला नकार मिळायचा. कितीही इच्छा असली तरी घरच्या परिस्थितीमुळे विजयला या क्षेत्रातले कुठलेच शिक्षण घेता आले नाही.

मग घरी अर्थिक भार लावता यावा म्हणून नाईलाजाने त्याने अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, या तुमच्या लाडक्या अभिनेत्याने सुरुवातीच्या काळात टेलिफोन ऑपरेटर पासून ते सेल्समन, हॉटेलमधला कॅशिअर पर्यंत अनेक नोकऱ्या केल्या. त्यानंतर त्याला अंकाउंटन्ट म्हणून नोकरी मिळाली आणि दुबईला जाण्याची संही मिळाली. मात्र दुबईत विजयचे मन फार रमले नाही. तो भारतात परतला आणि त्याने मित्रासह इंटिरिअर डिझाईनिंगचा व्यवसाय सुरु केला.

Source : pinkvilla.com

पण म्हणतात ना नशिबात असेल तेच घडतं, सुरुवातीपासूनच अभिनेता व्हायचे स्वप्न पाहणाऱ्या विजयला अखेर चित्रपट क्षेत्रात एन्ट्री मिळालीच. झालं असं, की एका मार्केटिंग कंपनीसाठी विजय काम करत होता, तेव्हा त्याची भेट दिग्दर्शक महेद्र बाबूंशी झाली.

आणि महेद्रबाबूंनी विजयमध्ये दडलेला अभिनेता ओळखला. त्याला प्रोत्साहन दिले. त्यानंतर विजयला लहान सहान भूमिका मिळू लागल्या. पण २०१० ला त्याचे नशीब उजळले. त्यादरम्यान त्यांना अनेक शॉर्टस फिल्मस मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारण्याची संधी तर मिळालीच, त्याचसोबत तबेरुकु परुवाकरतु या चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाली.

त्यानंतर विजयने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. त्याची चित्रपट क्षेत्रात घोडदौड सुरुच आहे. अत्तापर्यंत त्याला तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले असून ९० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये विजयने काम केलं आहे. कधी काळी चित्रपट क्षेत्रात येण्यासाठी स्ट्रगल करणारा विजय सेतूपती आता एक अभिनेता म्हणून लोकांच्या मनावर राज्य करतोय. अभिनयासोबत त्याने निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं.

एकूणच काय ते म्हणतात ना, तुमचा निश्चय ठाम असेल तर तुमची स्वप्न नक्कीच पुर्ण होऊ शकतात.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *