पेन्सिल वरील ‘हे’ कोड्स शो साठी नसतात, त्यामागे दडलंय भन्नाट लॉजिक!

पेन्सिलीचे टोक म्हणजे ग्रॅफाईट असतं. ग्रॅफाइट जेवढं डार्क पेन्सिल तेवढी डार्क असते.


आज काल मोबाईल मुळे सगळ्या गोष्टी खूप सोप्या झाल्या आहेत. स्मार्टफोन येण्याच्या आधी साधे फोन होते. तेव्हासुद्धा आपल्याला इतर गोष्टी लागत असत. पण आता स्मार्ट फोन आल्यापासून आपण सगळे स्मार्ट फोन वरच लिहितो आणि मेसेज म्हणून पाठवून देतो. हे जरी आत्ता सगळं चांगलं वाटत असेल तरी आताची पिढी कागद, पेन्सिल, रबर, पेन, पट्टी ,शॉपनर ह्या सगळ्या गोष्टींना मुकली आहे.

आपल्या लहानपणी कसं सगळं छान होतं. शाळा सुरू होताना नवीन दप्तर, त्यात नवीन वह्या- पुस्तकं, नवीन पेन्सिली, खोडरबर शॉपनर हे वापरण्याची मजा सुद्धा काही वेगळीच आहे. लहान असताना आपण बऱ्याचदा पेन्सिली वापरलेल्या आहेत. पण बऱ्याचदा आपल्या दिलेली पेन्सिल दोन दिवसात संपून जायची कारण आपण दरवेळेला नवे नवे पेन्सिलीचे टोक काढून आपण ती पेन्सिल संपवून टाकायचो. तर अशा या पेन्सिल बाबत तुम्ही कधी विचार केला आहे का की या पेन्सिल वर ठराविक अक्षरे कशाकरता लिहिलेली असतात?

Source : jetpens.com

ही अक्षरे म्हणजे एका प्रकारचे कोड आहेत. ह्या कोड प्रमाणे वेगवेगळ्या पेन्सिली स्केचिंग लिखाण आणि ड्रॉईंग याकरता वापरल्या जातात. हे कोड HB, 2B, 2H,9H असे असतात.

आपण आता वेगवेगळ्या कोडच्या पेन्सिली कशा कशाकरता वापरतात ते बघूया. पेन्सिल वर HB लिहिलं असेल तर ती पेन्सिल नॉर्मल डार्क आहे. H म्हणजे हार्ड आणि B म्हणजे ब्लॅक. HH म्हणजे आणखीन हार्ड. त्याचप्रमाणे 2B, 4B, 6B, 8B प्रमाणे या पेनिसिलीनचा डार्कनेस वाढत जातो. पेन्सिलीचे टोक म्हणजे ग्रॅफाईट असतं. ग्रॅफाइट जेवढं डार्क पेन्सिल तेवढी डार्क असते.

त्याच प्रमाणे 2B पेन्सिल पेक्षा 8B पेन्सिल जास्ती काळी आणि डार्क असते. वेगवेगळ्या कोडच्या पेन्सिली वेगवेगळ्या कारणांकरता वापरल्या जातात. HB च्या पेन्सिल मध्ये ग्राफाईट जास्ती डार्क नसतं की लाईट नसतं म्हणूनच HB चा पिन सिली साधारणपणे लिखाणाकरता वापरल्या जातात. म्हणूनच या पेन्सिली ऑफिसमध्ये वापरल्या जातात. म्हणून बऱ्याचदा आपल्याला लिहिताना सुद्धा पेन्सिल पेन्सिल मधील फरक सहज जाणवून येतो.

स्केचिंग ड्रॉईंग करिता लागणाऱ्या पेन्सिलीने जर का आपण लिहिले तर HB आणि इतर कोडच्या पेन्सिली मधील फरक सहज जाणवून येतो. स्केचिंग साधारण 2B च्या पेन्सिलीने केलं जातं तर कलर इन करता 8B च्या पेन्सिली वापरल्या जातात.

HB म्हणजे जसा हार्ड ब्लॅक त्याच प्रमाणे BBB म्हणजे भरपूर ब्लॅक. तसंच 4B च्या पेन्सिली 2B च्या पेन्सिलपेक्षा जास्त सॉफ्ट असतात आणि HH च्या पेन्सिली जास्त हार्ड असतात.

तेव्हा आता जेव्हा दुकानातून पेन्सिली विकत घ्याल तेव्हा पेन्सिली वरचा कोड नक्की बघा आणि मगच आपल्या गरजेप्रमाणे पेन्सील विकत घ्या. वेगवेगळ्या कोड प्रमाणे या पेन्सिली लिखणा करता स्केचिंग करता आणि रंगा होण्याकरता वापरात आणा.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *