भिकाऱ्याचे रोल्स करणारा ज्युनियर आर्टिस्ट कसा झाला जगप्रसिद्ध ‘प्रोफेसर’?

अलवारोने आपल्या ऍक्टिंग करिअरची सुरुवात २००२ मध्ये सेंट्रल हॉस्पिटल ह्या टीव्ही शो ने केली.


“मी तुम्हाला पुनर्जन्म देणार आहे, नवीन जीवन…..”

असा डायलॉग जर मी तुम्हाला मारला तर तुम्ही मला तुमच्या हातात जी वस्तू आहे ती फेकून माराल. पण प्रोफेसर जेव्हा आपला चष्मा अंगठयाने वर करत हा डायलॉग मारतो तेव्हा आपण सगळे त्याच्यावर आपसूकच विश्वास ठेवतो. होय, तोच प्रोफेसर, सगळ्या जगाला वेड लावलेल्या Money Heist वेब शो मधला प्रोफेसर.!

OTT प्लॅटफॉर्म वर सदैव टॉप टेन मध्ये असलेला शो मनी हाईस्ट. आता पर्यंत त्याचे ५ सिजन आलेत आणि तुम्ही ते सर्व सिजन नक्कीच पहिले असतील. टोकियो, बर्लिन, हेलसिंकी, नैरोबी…! सगळेच कॅरेक्टर आपली छाप पाडतात पण आपण प्रोफेसरच्या प्रेमात पडतो. तो एक रॉबर असून सुद्धा आपल्याला आवडतो. आपण त्याचे डायलॉग्स मारतो, त्याची अंगठ्याने चष्मा वर उचलण्याची स्टाईल कॉपी करतो. कारण आपण प्रोफेसर वर बिलिव्ह करतो. तो आपल्याला दर्शक म्हणून बिलिव्ह करायला भाग पाडतो. प्रोफेसर आपल्याला प्रत्येक सिन मध्ये दर्शक म्हणून पुनरुज्जीवित करतो, नवीन अनुभूती देतो. प्रोफेसर बनून भन्नाट अभिनयाची कला पेश करणारा तो अभिनेता आहे अलवारो मोर्टे. होय त्याचे नाव आहे अलवारो मोर्टे.

Source : express.co.uk

पण अलवारो मोर्टे ते प्रोफेसर हा त्याचा प्रवास खूपच संघर्षपूर्ण होता. नावापासूनच सुरुवात करूयात. खरे तर अलवारो मोर्टे हे त्याचे खरे नावचं नाहीये. त्याचे खरे नाव आहे अलवारो एंटोनियो गार्सिया पेरेज़. पण आपले हे लांबलचक नाव सिनेमात चालणार नाही असे त्याला वाटले म्हणून त्याने आपले नाव बदलण्याचा निर्णय घेतला.

त्याची एक मैत्रीण होती जिचे नाव होते मारिया मोर्टे. अलवारोला तिचे मोर्टे हे आडनाव खूप आवडत असे. मोर्टेचा अर्थ आहे मृत्यू आणि मोर्टे हे आडनाव खूपच अनकॉमन होते. अलवारोने मोर्टे नाव आपल्या नावामागे जोडले आणि त्याचे ऍक्टिंग चे दुकान जोरात सुरु झाले.       

ज्यावेळेस अलवारो स्कूल ऑफ ड्रामेटिक आर्ट कोर्डोबा मध्ये ऍक्टिंग शिकत होता त्यावेळेस तो माद्रिद ला जाऊन ऑडिशन देत असे. पण त्याला मोस्टली भिकाऱ्याचे रोल्स मिळत असत आणि ह्याचे कारण होते त्याचे लांब केस. अलवारोच्या लक्षात आले कि जर आपल्याला हिरो बनायचे असेल तर हिरो सारखे दिसावे लागेल आणि म्हणून त्याने आपले लांब केस छाटून टाकले.

अलवारो च्या आयुष्यातील सर्वात संघर्षपूर्ण काळ होता वर्ष २०११. त्याच्या पायात एका ट्युमर चे निदान झाले तो पूर्ण खचून गेला. पण मग प्रोफेसर प्रमाणे त्याने शांत होऊन डिसिजन घेतला की जर जर तीन महिन्यात मरायचेच आहे तर कॅन्सरशी लढून मरुयात. त्याने पॉसिटीव्हिटीने कॅन्सरशी लढा दिला आणि आश्चर्यम तो पूर्णपणे बरा झाला.   

अलवारोने आपल्या ऍक्टिंग करिअरची सुरुवात २००२ मध्ये सेंट्रल हॉस्पिटल ह्या टीव्ही शो ने केली. ४ वर्षे छोटे-छोटे रोल्स करत करत २००७ मध्ये त्याला प्लॅन २५ ह्या शो मध्ये मोठा आणि मजबूत रोल मिळाला. इथून अलवारोचे ऍक्टिंग करिअर वेगात सुरु झाले.

२०१३ मध्ये अलवारोला बैंडोलेरा ह्या शो मध्ये तिसरा मोठा रोल मिळाला. अलवारो आणि त्याच्या बायको ला असे वाटत असे कि असेच रोल्स करून त्याचे करिअर संपून जाणार. पण असे होणे नियतीला मंजूर नव्हते.

२०१७ मध्ये अलवारो ने एक ऑडिशन दिली पण त्या साठी त्याला आपला चालू असलेला शो सोडावा लागणार होता. अलवारो ने तो शो सोडला कारण आता तो आता अलवारो राहिला नव्हता तर तो प्रोफेसर बनला होता ‘मनी हाईस्ट’ मधला गीक, नर्डी आणि स्मार्ट प्रोफेसर!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Sushant Tambe