भारतातील ह्या मंदिरात सुंदर स्त्रिया दिसतात, पण प्रत्यक्षात ते पुरुष असतात…काय आहे हे रहस्य?

केरळातील एका मंदिरात एक विशिष्ट प्रकारची पूजा पार पडते. मार्च महिन्यात हा उत्सव सुरू होत असून तो मार्च महिन्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत असतो.


भारतात देव, पूजा, त्यांच्या धार्मिक कथा, देवस्थानं याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याप्रमाणे स्त्रिया एखाद्या देवतेची मनापासून भक्ती करतात त्याचप्रमाणे पुरूषही यात मागे नाहीत. आपल्याकडे मंदिरातील पूजा किंवा घरातील पूजा असो स्त्रिया नेहमीच लगबगीने पुढे असतात. नव्हे पुरूषही करतातच. पण स्त्रिया असो वा पुरूष दोघेही आपापला वेष परिधान करूनच पूजा, भक्ती करत असतात. तुम्हाला वाटत असेल वेष परिधान करण्याचा आणि पूजेचा काय संबंध. तर संबंध आहे आपल्या भारतातच असे ठिकाण आहे जिथे पुरूष हे स्त्रीवेष परिधान करून देवाची पूजा करतात. हो हे खरं आहे यात गैर असे काहीच नाही कारण श्रद्धेपुढे कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही असे इथे मानले जाते.

केरळातील एका मंदिरात एक विशिष्ट प्रकारची पूजा पार पडते. मार्च महिन्यात हा उत्सव सुरू होत असून तो मार्च महिन्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत असतो. साधारण १० ते १२ दिवस हा उत्सव साजरा केला जातो. केरळातील कोल्लम या ठिकाणी कोट्टनकुलंगरा श्री देवी मंदिरात चमय्याविलक्कू हा उत्सव दरवर्षी पार पडतो.

पुरूषांना आपला वेष, आपला पुरूषी बाणा, रांगडेपणा याचा फार अभिमान असतो. त्यांना स्त्रियांप्रमाणे कपडे घालून, दागदागिने घालून वावरणं तसं कठिणच. मात्र हे शक्य होतं ते केरळातील या शहरात.

हो, इथे या चमय्याविलक्कू या उत्सवादरम्यान अनेक पुरूष स्त्रियांप्रमाणे साड्या नेसतात, दागिने घालतात. एवढंच काय तर अगदी पूर्णपणे स्त्रियाच दिसण्यासाठी दाढी मिशा काढून चक्क ब्युटी पार्लरमध्ये छान तयार देखील होतात.

कोल्लममधील कोट्टनकुलंगरा श्री देवी मंदिरातील चमय्याविलक्कू हा उत्सव केरळातील एक आगळावेगळा धार्मिक उत्सव मानला जातो. हा उत्सव मार्च महिन्यातील साधारण १० ते १२ दिवस चालतो. मार्चमधील अखेरच्या तारखेपर्यंत हा उत्सव सुरू असतो. या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी सर्व पुरूष हे स्त्रीवेशात या देवीची पूजा करतात. स्त्रियांप्रमाणे दागिने, केसात फुलं, मेकअप असा सर्व साज करतात. हुबेहूब स्त्रिया दिसण्यासाठी दाढी मिशा काढून अगदी स्त्रियांप्रमाणेच मेकअप करतात.

कोट्टनकुलंगरा श्री देवी मंदिरापासून ५ किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या रहिवाशांमधील पुरूष हे स्त्रीरूप प्रामुख्याने धारण करतात. त्यांच्याव्यतिरिक्त कोल्लममधील विविध भागांतून तसेच दक्षिण भारतातील अनेक वेगवेगळ्या ठिकाणांहून इथे पुरूष स्त्रीरूप धारण करून येतात. विशेष म्हणजे पुरूषांव्यतिरिक्त अनेक ट्रांसजेडरही या उत्सवात सहभागी होतात.

कोल्लममधील या उत्सवात पुरूषांनी स्त्रीरूपात पूजा करण्याची ही पद्धत का सुरू झाली असेल. तर यामागे एक प्राचीन गोष्ट आहे. मंदिराच्या परिसरात राहणाऱ्या काही स्थानिक व्यक्तींनी दिलेल्या माहितीप्रमाणे, काही गुराखी मुलं एका दगडाभोवती खेळत असंत. खेळताना ते पुरूषांच्या कपड्यात नसून स्त्रीवेषात खेळत असत. या दगडाला ते देव मानत.

असं मानलं जातं की एकेदिवशी ही मुलं दगडाभोवती खेळत असताना त्या दगडातून एक देवी प्रकट झाली. या घटनेनंतर देवी प्रकट झाल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पूर्ण गावात पसरली.

त्यानंतर तिथल्या लोकांनी यावर विश्वास ठेवत भक्तीने या दगडाचे पूजन केले. कालांतराने त्या ठिकाणी त्या देवीचे मंदिरही उभारले गेले. कदाचित याचमुळे स्त्रीरूपात पुरूषांनी देवीचे पूजन करण्याची प्रथा इथे सुरू झाली. अजूनही सर्व वयोगटातील पुरूष हे उत्तम स्त्रीवेष परिधान करून देवीची आपल्या कृपा राहावी यासाठी मनोभावे तिची पूजा करतात. या पूजेदरम्यान ते चमय्याविलक्कू म्हणजेच पाच दिवे त्यांच्या हातात असतात.

Source : wikimedia.org

मंदिराला तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता. या मंदिरात जाण्यासाठीचा योग्य काळ म्हणजे मार्च महिना. कारण त्यावेळी हा अनोखा उत्सव तुम्हाला पाहता येऊ शकतो. रात्री २ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मंदिरात दर्शनाची वेळ असते. तुम्हाला पाच दिवे म्हणजेच चमय्याविलक्कू इथल्या मंदिराच्या बाहेरील स्टॉलवर मिळू शकते. शिवाय जर कोणाला स्त्रीवेष परिधान करून या देवीच्या उत्सवात सहभागी होण्याची इच्छा असेलच तर मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक ब्युटी पार्लरही उपलब्ध आहेत. असं म्हटलं जातं की इथे उत्सवात सहभागी होणाऱ्या तसेच देवीची मनोभावे पूजा करणाऱ्यांचा विश्वास खरा ठरतो!

आहे की नाही अतुल्य भारतामधील ही एक अतुल्य गोष्ट?!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *