‘ह्या’ गुजराती माणसाला वीजेचं बिल येत नाही, उलट सरकारच त्याला पैसे देतं! काय आहे ही भानगड?

सामान्यत: आपण वीजेचे पैसे सरकारकडे भरतो, पण हा देशातला एकमेव असा व्यक्ती असावा ज्याला वीज वाचवल्याबद्दल सरकारच उलट पैसे देते.


आजच्या युगात इकोफ्रेंडली असणे ही काळाची गरज आहे. अशी एक व्यक्ती आहे ज्यांनी आपलं घर इको फ्रेंडली बनवलं आहे आणि या माणसाला विजेचे बिल येत नाही. खोटं वाटतंय? मग तुम्ही ही पूर्ण गोष्ट वाचायलाच पाहिजे!

Source : ytimg.com

सामान्यत: आपण वीजेचे पैसे सरकारकडे भरतो, पण हा देशातला एकमेव असा व्यक्ती असावा ज्याला वीज वाचवल्याबद्दल सरकारच उलट पैसे देते. शहरात राहणाऱ्या माणसांना सगळ्यात जास्त वीज आणि पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात तर दोन्ही गोष्टींची गरज जास्त भासते. आपल्याजवळ जितक्या जास्त इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात तेवढं विजेचं बिल वाढतं. पण ह्या व्यक्तीची ही बिलाची चिंता कायमची दूर झाली आहे.

ज्या व्यक्तीने आपलं घर इको फ्रेंडली घर बनवला आहे त्या व्यक्तीचं नाव आहे कनुभाई करकरे.

कनुभाई करकरे हे गुजरात मधले अमरेली गावातले आहेत आणि राज्याच्या शिक्षा विभागात कार्यरत आहेत. बाहेरून कनुभाईंच घर अगदी सर्वसामान्य लोकांसारखं दिसतं पण आतून बघितलं तर त्यांनी कमालीच्या गोष्टी करून घेतल्या आहेत.

२००० साली साधारण अडीच लाखांच्या आसपास खर्च करून कनुभाईनी आपलं नवीन घर बांधलं. हे घर इको फ्रेंडली घर असावं म्हणून त्यांनी त्या पद्धतीने सर्व सुविधा निर्माण केल्या. घर असं डिझाईन केलंय की पाण्याबरोबरच विजेचा ही प्रश्न कायमचा मिटलाय. कनुभाई यांनी घराची रचना अशी ठेवली आहे की ज्यामुळे घरात भरपूर उजेड येतो. त्याच बरोबर खिडक्याही थोड्या मोठ्या बांधल्या आहेत त्यामुळे घरात सतत स्वच्छ हवा खेळत असते.

त्यांनी horizontal cross ventilation technique याचा वापर केला आहे. यामुळे आता येणारी गरम हवा ही थंड होते. कनुभाई सांगतात की, संध्याकाळी सहा वाजल्या शिवाय त्यांना घरचे दिवे लावावे लागत नाहीत. त्याचप्रमाणे पटकन हवा थंड होत असल्यामुळे त्यांना पंख्याची किंवा एसी ची गरज भासत नाही.

आता वळूया पाण्याच्या विभागाकडे! कनुभाई यांनी आपल्या आवारात एक २० हजार लिट चा अंडरग्राउंड टँक बांधून घेतला आहे ज्यामध्ये पावसाचं सगळं पाणी जमा होतं. याव्यतिरिक्त ८ हजार लिटर चा एक वेगळा पाण्याचा टँक बांधून घेतला आहे ज्याचं पाणी आवारात असलेल्या झाडांकरता आणि इतर कामांकरता वापरलं जातं.

मुख्यतः हे पाणी बागे करता वापरलं जातं. जर दोन्ही टँक मधलं पाणी ओव्हरफ्लो झालं तर ते खाली जमिनीत जातं आणि मूरतं यामुळे जमिनीची पाण्याची पातळी वाढते.

वर सांगितल्याप्रमाणे कनुभाईंना विजेचं बिल द्यावं लागत नाही. त्यांनी 3kW ची सोलर सिस्टम बसवून घेतली आहे. ही सिस्टम सूर्या गुजरात स्कीम या अंतर्गत लावून घेतली आहे. त्यांच्या घरात विजेचा वापर खूप कमी होतो त्यामुळे सोलर पॅनल मधून तयार झालेली वीज सरळ ग्रीडमध्ये जाते आणि ह्यामुळेच गुजरात सरकार त्यांना दर महिना दहा हजार रुपये देते.

ही गोष्ट होती वीज आणि पाण्याची बचत यांची. त्याचप्रमाणे कनुभाई आपल्या बागेत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावतात ज्यामुळे ऑर्गेनिक खतातून निघालेल्या भाज्या ते खाऊ शकतात. म्हणूनच बाजारातून त्यांना खूप कमी भाज्या आणाव्या लागतात. ह्या सगळ्या गोष्टींमुळे गुजरात सरकारने त्यांचं घर एक आदर्श घर म्हणून नावाजलं आहे.

कनुभाईंचा आदर्श घेऊन आपणही इको फ्रेंडली आयुष्याची ही चांगली गोष्ट अंगी बाणवूया आणि विजेचा आणि पाण्याचा खप कमी करूया. चला आपणही आपलं घर सुद्धा इको फ्रेंडली बनवूया!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *