अवघ्या 6 वर्षांच्या मुलीने खरेदी केलं तब्बल 4 कोटींचं घर, पण कसं?

घर खरेदी करण्यासाठी तिन्ही भावंडांनी प्रत्येकी एकसारखी रक्कम साठवली. ही संपत्ती त्यांनी स्वकमाईतून जमा केली.


आपल्या हक्काचं सुंदर घर घेण्याचं स्वप्न जगातला प्रत्येक जण पहातो. स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नात  सामान्य माणूस आयुष्यभर खटाटोप करतो, तेव्हा कुठे ते स्वप्न पूर्ण होतं. सध्याच्या परिस्थितीत तर घर विकत घेणे किंवा बांधणे तर कित्येकांच्या आवाक्या बाहेरच आहे. लोक स्वतःच्या स्वप्नातलं घर बांधण्यासाठी खूप काबाड कष्ट करतात, कित्येकांना तर घर घेणे शक्यच होत नाही.  अशातच घर खरेदीबाबत घडलेली एक घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याबद्दल वाचल्यावर तुम्ही खुश तर व्हालच पण चकितही व्हाल.

ऑस्ट्रेलियात घडलेली ही घटना आहे. अवघ्या सहा वर्षाच्या चिमुरडीने, बहिण भावांची मदत घेऊन घर खरेदी केलं. आहे की नाही आश्चर्याची बाब? इतकचं नाही तर त्या घराची किंमत ऐकून तर तुम्हाला धक्काच बसेल.

या सहा वर्षांच्या चिमुरडीने ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्नमध्ये तब्बल ४ कोटींच घर खरेदी केलं आहे. बसला ना धक्का? या चिमुरडीकडे इतकी रक्कम कशी जमा झाली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर मग पाहूया काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

घर खरेदी करणाऱ्या चिमुरडीचे नाव आहे रुबी मॅक्लेलन. तिने तिचा भाऊ गस आणि बहिण लुसीच्या मदतीने ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या क्लाईडमध्ये स्वतःचे घर खरेदी केले.

या तिघांनी मिळून घराची रक्कम  उभी केली. या मुलांचे वडील कॅम मॅक्लेलन, हे प्रॉपर्टी इन्हेस्टमेंटमध्ये तज्ज्ञ आहेत. त्यांनी मुलांना घर खरेदी करण्यास प्रोत्साहन दिले आणि खरेदिच्या प्रक्रियेसाठी मदतही केली.

घर खरेदी करण्यासाठी तिन्ही भावंडांनी प्रत्येकी एकसारखी रक्कम साठवली. ही संपत्ती त्यांनी स्वकमाईतून जमा केली. त्यांनी त्यासाठी वडिलांना घर कामात मदत केली, त्याचबरोबर वडिलांच्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांचे जास्तीत जास्त पॅकिंग करुन त्यांनी पैसे कमावले. खेळण्या- बागडण्याच्या वयात रुबी आणि तिच्या भावंडांनी घर खरेदी करून दाखवल्याने त्या तिघांवर जगभरातून कौतूकाचा पाऊसच पडला. त्यांच्या निर्णयामागे भक्कम पणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या वडिलांचीही प्रशंसा होते आहे.

Source : unilad.co.uk

लहानपणापासूनच या मुलांना त्यांच्या वडिलांनी वायफळ खर्च न करता गुंतवणूकीचं बाळकडू पाजलं. या घराच्या गुंतवणूकीच्या जोरावर तिन्ही मुलांना भविष्यात भरपूर प्रॉफिट तर मिळेलच त्याचबरोबर गुंतवणूकीच्या सवयीमुळे ही मुलं भविष्यात उंच शिखरही गाठू शकतात.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *