‘काँडम’ : आपल्या ‘महान’ संस्कृतीसाठी घातक की काळाची गरज?

दहा एक वर्षांपूर्वी समुद्र किनाऱ्यावरील कंडोमची जाहिरात गाजली होती "पता नही कब कहा जरूरत पड जाये!" त्या ऍड वरही वादंग माजल्याने तीला बॅन करण्यात आलं होतं.


2006 च्या सुरवातीला JNU आणि दिल्ली युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये दिल्ली एड्स कन्ट्रोल कमिटीने “काँडम वेंडींग मशीन” लावल्याने वर्षभर बराच गदारोळ झाला होता. कोणी त्यास पाठिंबा दिला कोणी चुकीचा संदेश जात असल्याचे सांगुन त्याला विरोध करत DAC कमिशनरला ते कसं संस्कृती आणि वारसा-परंपरा दृष्टीने चुकीचे आहे हे सांगणारं पत्र लिहिलं.

Source : rushlane.com

शोभा डेच्या एका पुस्तकात त्या त्यांच्या एका मैत्रिणीबद्दल लिहितात की त्यांची मैत्रीण म्हणते “मी तर माझ्या मुलाला स्पष्ट सांगते की, “घरातून बाहेर पडताना खिश्यात काँडम्स ठेवत जा! हॅव सेफ सेक्स ऑलवेज! ही मुलं कुठे कुठे फिरतात कधी गरज पडेल सांगता येत नाही. नसती रिस्क नको!” तिचा मुलगा टीन एज असतो. दहा एक वर्षांपूर्वी समुद्र किनाऱ्यावरील कंडोमची जाहिरात गाजली होती “पता नही कब कहा जरूरत पड जाये!” त्या ऍड वरही वादंग माजल्याने तीला बॅन करण्यात आलं होतं.

2007 पासून काही वर्ष कंडोमवरून काही फेमस जाहिरातींद्वारे भरपूर जनजागृती करण्यात आली. मजूर वर्ग ते अशिक्षित ते नियमित रेड लाईट एरियात जाणारे पुरुष, सेक्स वर्कर्स यांना “कंडोम मस्ट”चं महत्व पटवून देण्यात आलं. अजूनही देण्यात येतं. पण आजही कोणत्याही शासकीय रुग्णालयात HIV + पेशन्टसच्या रांगाच रांगा असतात.

HIV ची लागण होण्यास  HIV + blood transfusion, बाधित व्यक्तीला टोचलेलं निडल वापर ही कारणेही असतात पण त्याचं प्रमाण फार नगण्य असतं. महत्वाचं कारण “असुरक्षित सेक्स संबंध” हेच आहे. दहा वर्षांपूर्वी शोभा डेंच्या मैत्रिणीचे शब्द आगाऊ वाटले होते. पण आज परिस्थिती, मानसिकता बदलेली आहे. पूर्वी ब्लॅक आणि व्हाईट असे स्पष्ट वैचारिक, सैद्धांतिक रंग होते. आता ते एकमेकात मिसळून त्याचा ‘ग्रे’ रंग झाला आहे.

मल्टी पार्टनर्स सोबत शय्यासोबत हे चांगलं की वाईट यांतील पूर्वीची रेषा ही ब्लर, धूसर झाली आहे. यात योग्य आणि अयोग्य हा मुद्दा नाही. मुळात कुठलीच गोष्ट ही पूर्णपणे फक्त चांगली किंवा फक्त वाईट असं hardcore rigid equation नसतं. प्रत्येक गोष्ट ही व्यक्ती, परिस्थिती, काळ सापेक्ष असते. म्हणून कुठलाच गोष्टींचा, मताचा अट्टाहास नको. पण फ्री सेक्स, फ्रेंड्स विद बेनिफिट्स, कॅज्युअल सेक्स किंवा हिट ऑफ द मोमेंटमुळे एखादी चूक आजन्म महागात पडू शकते.

अजूनही काँडमकडे प्रमुख्याने ‘गर्भ निरोधक’ म्हणूनच पाहिले जाते. त्यामुळे काँडम न वापरता क्लायमॅक्स पर्यंत ‘काळजी’ घेणाऱ्यांचाही एक वर्ग आणि मार्ग अवलंबणारे असतात. नुकत्याच झालेल्या ओळखीतून सेक्सशुअल रिलेशन्स तयार होतात, तेव्हा काही वेळा त्या करस्पॉंडिंग, संबंधित व्यक्तीचा इतिहास माहिती नसतो. किंवा ती व्यक्ती बाधित असेल अशी जराही कल्पना नसते आणि फक्त गर्भधारणा नको हाच विचार ठेऊन म्हणून नाजूक वेळी काँडोम शिवाय संबंध केले जातात.आणि “एक गळती ..गलती की किंमत तुम क्या जानो..” म्हणण्याची दोघांवरही येऊ शकते.

कित्येक शिक्षित, अशिक्षीत पुरुषांमध्ये कॉन्डम वापरल्याने ‘एन्जॉयमेन्ट’ कमी मिळतं असा समज असतो. त्यामुळे ते टाळतात आणि STD (sexually transmitted diseases) चे बळी पडतात. कित्येक शिक्षित लोकांचाही हा गैरसमज आहे की फक्त वीर्या मधेच HIV विषाणू असतात. पण संभोगापूर्वी होणारं स्त्री पुरुष दोघांच्याही सेक्रेशन मधेही HIV विषाणू असतात. अगदी धक्कादायक गोष्ट म्हणजे काही मुलींनाही “काँडम फोबिया” असतो. त्या सुद्धा निरोधाला विरोध करतात. या सर्व अक्षम्य हलगर्जीपणामुळे एचआयव्हीची लागण होऊ शकते.

आपल्याकडे  पॉर्नबंदी आणि पानटपरीवरील गुटखाबंदी हे विषय सतत दर काही वर्षांनी गाजत असतात. आजच्या काळात पॉर्नबंदी हे हास्यास्पद वाटतं. कारण आज प्रत्येकाला स्वातंत्र्य हवं आहे, आणि ते रास्त आहे. पण पॉर्न हे दुधारी शस्त्र आहे. लहान मुलांच्या हाती मोबाईल सरार्स असतो. ते चुकीच्या वयात पॉर्न बघून त्यांच्या मनात नको त्या विचारांचं वादळ उठू शकतं.

लैंगिक शिक्षण आजच्या काळात गरजेचं आहे. पण जिथे बायोलॉजीमध्ये ‘रिप्रोडक्शन’चा धडा टाळला जातो. शिक्षकाकडून त्यासंबंधी विशिष्ट शब्द उच्चारायचे टाळले जातात, तिथे लैंगिक शिक्षण गरजेचं झालंय. यामुळे पौंगंडावस्थेतील होणाऱ्या बदलांमध्ये मुलांच्या मनोवस्थेला योग्य दिशा मिळेल.

काळ वेगाने बदलतोय मानसिकता, विचार बद्दलताहेत. Gadgets and social media, Internet and technology do take their tolls on mentality and thought process. त्यामुळे काय वाईट काय योग्य हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.पण बदलत्या काळानुसार काळजी म्हणून काँडम सहज  accessible असणं उपलब्ध होणं गरजेचं आहे. आणि ते आहे सुद्धा. फक्त वापरायला हवं. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी ज्या कंडोम वेण्डिंग मशीन मुळे गदारोळ माजला होता तो आता कदाचित होणार नाही.

गुरुचरित्र ग्रंथात चार युगाची एक  रुपकात्मक कथा संगीतली आहे.ज्यात सुरवातीचे तीन युग आपापल्या हातात सात्विक वस्तू घेऊन प्रकट होतात. शेवटी कलियुग हातात ‘शिश्म’, लिंग धरून प्रगट होतं. आणि याच्या जोरावर संपूर्ण जगाला मी नाचवेन म्हणतं. लैंगिक रोग,एड्सचे रुग्ण, लैंगिक विकृती बघता ती रूपकात्मक कथा खरी वाटू लागते. त्यामुळे अशा वेळी आज precaution is the best measure” हेच खरं आहे.

उद्या चौकात वा कॉलेजमध्ये काँडम वेण्डिंग मशीन लावल्या गेलं आणि मिसरुडही न फुटलेला पोरगा त्यातून कंडोम घेतानाचे दृश्य दिसल्यास त्याला संस्कार आणि संयमाची अधोगती म्हणायचं की त्याने प्रॅक्टिकली घेतलेली काळजी हे ज्याचं त्यानी ठरवायचं. कारण It is bad enough that people r dying of AIDS. But no one should die of ignorance. -Elizabeth Tailor


0 Comments

Your email address will not be published.

Choose A Format
Personality quiz
Series of questions that intends to reveal something about the personality
Trivia quiz
Series of questions with right and wrong answers that intends to check knowledge
Poll
Voting to make decisions or determine opinions
Story
Formatted Text with Embeds and Visuals
List
The Classic Internet Listicles
Countdown
The Classic Internet Countdowns
Open List
Submit your own item and vote up for the best submission
Ranked List
Upvote or downvote to decide the best list item
Meme
Upload your own images to make custom memes
Video
Youtube, Vimeo or Vine Embeds
Audio
Soundcloud or Mixcloud Embeds
Image
Photo or GIF
Gif
GIF format