हुकुमशहा किम जोंग उन जर अचानक मेला तर नॉर्थ कोरियाचं काय होणार?

आज उत्तर कोरिया संपूर्ण जगापासून वेगळा आहे. तिथे काय होते हे जगाला माहित नाही आणि जग कुठल्या कुठे चाललं आहे हे तेथील सामान्य नागरिकांना माहित नाही.


उत्तर कोरिया हे नाव कानावर पडलं कि सगळ्यात आधी आठवतो एक असा चेहरा, जो दिसायला अगदीच शांत आणि स्तब्ध वाटतो, पण त्या चेहऱ्यामागे दडले आहेत घृणास्पद कारनामे ज्यामुळे उत्तर कोरियाची सगळी जनता या २१ व्या शतकात देखील दहशतीखाली वावरते आहे. तो चेहरा म्हणजे उत्तर कोरियाचा शासक किम जोंग उन होय. वडिलांच्या मृत्यूनंतर २०११ साली सत्ता किम जोंग उनच्या हातात आली तेव्हापासून आजपर्यंत त्याने एका क्रूर राजासारखे उत्तर कोरियावर राज्य केले. आज उत्तर कोरिया संपूर्ण जगापासून वेगळा आहे. तिथे काय होते हे जगाला माहित नाही आणि जग कुठल्या कुठे चाललं आहे हे तेथील सामान्य नागरिकांना माहित नाही.

Source : nyt.com

तुम्ही सुद्धा आजवर अनेकदा उत्तर कोरियाच्या भयाण कथा ऐकल्या असतील व वाचल्या असतील, त्यामुळे तुम्हाला त्या नव्याने न सांगता थेट मूळ मुद्द्यावरच येऊ. तर मुद्दा असा कि उत्तर कोरिया कधीतरी स्वतंत्र होऊ शकेल का? म्हणजे जसे आपण जगतोय, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळतंय तसं स्वातंत्र्य तेथील लोकांना मिळेल का? तर याचं उत्तर असं कि जोवर किम जोंग उन हयात आहे तोवर तर असलं काही होणार नाहीच, पण शेवटी तो सुद्धा एक मनुष्य आहे. त्याचा मृत्यू देखील कधी ना कधी होणार आहे. मग त्याच्या मृत्यूनंतर काय? हेच आज आपण जाणून घेणार आहोत. हे जाणून घेण्याआधी आपल्याला उत्तर कोरियाचा थोडासा इतिहास जाणून घ्यावा लागेल.

दुसऱ्या महायुद्धानंतर उत्तर कोरिया दोन भागांत विभागला गेला. दक्षिण कोरियाने स्वत:ला प्रजासत्ताक घोषित केलं, तर उत्तर कोरिया मध्ये किम इल संग यांनी देशाचा कारभार स्वत:च्या हाती घेतला. हे किम इल संग म्हणजे किम जोंग उनचे आजोबा होय. त्यांचा मृत्यू १९९४ साली झाला आणि मरेपर्यंत ते देशाचे राष्ट्राध्यक्ष होते. पण विशेष गोष्ट म्हणजे आज हयात नसतानाही तेच देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत.

थांबा, कन्फ्युज होऊ नका. अजून सोप्पं करून सांगतो. उत्तर कोरिया हा देश Necrocracy वर चालतो. जशी आपली Democracy तसाच हा प्रकार! समजा एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष मेला तरी त्या नेत्यालाच वा त्याच्या पक्षालाच सर्वोच्च मानून देशाचा कारभार चालतो. तिथे कोणत्याही निवडणुका होत नाही किंवा दुसरा कोणी व्यक्ती त्या पहिल्या राष्ट्राध्यक्षाची जागा घेऊ शकत नाही. अनादी अनंत काल तोच राष्ट्राध्यक्ष राहणार. मात्र मेलेला व्यक्ती देश कसा चालवणार? म्हणून मग त्यांच्या मुलाने किम जोंग इलने स्वत:ला सुप्रीम लीडर घोषित केले आणि वडिलांच्या वतीने देश सांभाळायला सुरुवात केली. अशाच प्रकारे जेव्हा किम जोंग इल यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांचा मुलगा किम जोंग उन याने सुप्रीम लीडर हे पद स्वीकारले.

एका वाक्यात सांगायचं झालं तर हे किम कुटुंब उत्तर कोरियाच्या लोकांना येड्यात काढतंय. वर्षानुवर्षे सत्ता केवळ आपल्याकडेच राहावी म्हणून त्यांनी केलेली हि प्लानिंग आहे असे मत अनेक तज्ज्ञांनी देखील व्यक्त केले आहे. किम कुटुंबाला हे सुद्धा माहित आहे कि लोकांचा त्यांच्यावर जोवर विश्वास आहे तोवर त्यांना कोणी आव्हान देऊ शकत नाही आणि म्हणून किम जोंग उन याने गेले १० पेक्षा जास्त वर्षे एक प्रोपोगांडा चालवला आहे. हा प्रोपोगांडा आहे आपल्या आजोबांना आणि वडिलांना सर्वश्रेष्ठ ठरवण्याचा! दरोरोज लोकांच्या मनात भरवलं जातं की त्या दोघांनी हा देशासाठी खूप काही केलं आहे आणि तुम्ही आज जे आयुष्य जगताय ती त्यांचीच देण आहे आणि म्हणूनच कि काय तेथील लोक सुद्धा त्यांना देवाच्या स्थानी मानतात.

समजा किम जोंग उन अचानक मरेल तेव्हा साहजिकच तुम्हालाही वाटत असेल कि त्याचा मुलगा त्याच्या जागी येईल. हो हि शक्यता १००% आहेच, कारण किम जोंग उनला तीन मुले आहेत पण ती फारच लहान आहेत मात्र त्यांची ओळख किम जोंग उनला लपवून ठेवली आहे. किम जोंग उनला दोन मोठे भाऊ सुद्धा आहेत पण त्यांना सुद्धा त्याच्या खालोखाल मोठी पदे देण्यात आली होती. त्यापैकी एका भावाची हत्या करण्यात आली. किम जोंग उनचा काका सुद्धा आहे पण त्याचे एवढे वर्चस्व नाही.

त्यामुळे जाणकारांच्या मते जर किम जोंग उनचा अचानक मृत्यू झाला तर त्याची बहिण किम यो जोंग सत्तेत येऊ शकते. ती किम जोंग उंची सावली मानली जाते. पण मुळात शेवटी हा प्रश्न उरतोच कि किम जोंग उनच्या मृत्यूनंतर नॉर्थ कोरिया मध्ये शांतता येईल का? तेथील लोकं सुखाने, स्वतंत्रपणे जगू शकतील का? तर त्याचे उत्तर आहे, नाही…!

कारण जोवर कंट्रोल हा किम कुटुंबांकडे आहे तोवर नॉर्थ कोरीया मोकळा श्वास घेणं कठीण आहे. कारण हे संपूर्ण कुटुंबच क्रूर आहे आणि जोवर आपण क्रूर आहोत तोवर आपल्याला लोकं घाबरून राहतील आणि तोवरच आपण या देशावर हवी तशी सत्ता उपभोगू शकतो हे त्यांना कळून चूकलं आहे.

Source : npr.org

त्यामुळे जर नॉर्थ कोरीयाला खरंच स्वतंत्र व्हायचं असेल तर तेथील लोकांच्या मनात आग पेटली पाहिजे, त्यांनी या अन्यायाविरोधात बंड पुकारले पाहिजे. किम कुटुंबाची सर्वात मोठी ताकद आहे नॉर्थ कोरियाची आर्मी, जर या आर्मीने सुद्धा या बंडाला सपोर्ट केला तर किम कुटंबची दहशत सहज संपू शकते! पण शेवटी एक प्रश्न उरतोच कि जी नेतेमंडळी आपल्या देशाला या हुकुमशाहीमधून सोडवू पाहतायत त्यांना आपला देश प्रजासत्ताक हवाय का? कारण प्रजासत्ताक देशाच्या नावाखाली जर त्यांनी सुद्धा आपलीच मनमानी केली तर त्यांच्यात आणि किम जोंग उन मध्ये काहीच फरक नसेल…!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal