लोकसभेत हिरवं कार्पेट आणि राज्यसभेत मात्र लाल कार्पेट असतं, असं का?

संसदेत पूर्वी तिसरे सदन पण होते. या तिसऱ्या सदनाला राजकुमारांचे सदन असे म्हटले जायचे किंवा संबोधले जायचे.


भारतातील प्रत्येक घरात चर्चा होते आणि निर्णय घेतले जातात. हे निर्णय सर्वानुमते असतात. त्याच प्रमाणे देशाची सुव्यवस्था राहण्यासाठी संसदेत म्हणजेच पार्लमेंट हाऊस मध्ये चर्चा केल्या जातात आणि त्यावर ठोस निर्णय घेतले जातात. आपले नेते आपल्या जनतेच प्रतिनिधित्व करतात आणि स्पीकर पुढे आपले स्पष्टीकरण व मतं मांडतात. संसदेत उपस्थित असणारे विपक्ष – अप्पोझिशन पार्टी सुद्धा यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.

संसदेची म्हणजेच पार्लमेंट हाऊसचे दोन सदन आहेत. एक राज्यसभा जे वरचं हाऊस म्हणून ओळखलं जातं आणि खालचं सदन ज्याला आपण लोकसभा म्हणतो. आजचा लेख या दोन सदनांवरच आधारित आहे. संसदेच्या दोन्ही सदनानवर आधारित काही इंटरेस्टिंग गोष्टीही तुम्हाला या लेखातून कळणार आहेत.

वर सांगितल्याप्रमाणे संसदेचे दोन सदन असतात. वरचं सदन राज्यसभा तर खालचं सदन लोकसभा. या दोन साधनांमध्ये लोकनेते आपल्या लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात. लोकसभेमध्ये येणारा प्रत्येक सदस्य हा जनतेकडून निवडून आलेला असतो.

लोकसभा ५५० सदस्यांनी बनते तर राज्यसभा २४५ सदस्यांनी तयार होते. २४५ जागांपैकी २३३ जागा लोकप्रतिनिधींच्या असतात तर १२ जागा राष्ट्रपतींद्वारा दिल्या जातात.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यसभेला- राज्यांची परिषद असे संबोधले जायचे तर लोकसभेला वैधानिक सभा म्हटले जायचे. ह्या व्यतिरिक्त संसदेत पूर्वी तिसरे सदन पण होते. या तिसऱ्या सदनाला राजकुमारांचे सदन असे म्हटले जायचे किंवा संबोधले जायचे. पण आता हे राजकुमारांचे सदन बंद केले आहे आणि त्या जागी संसदेची लायब्ररी उभी करण्यात आली आहे.

चला आता वळूया एका खास प्रश्नाकडे की लोकसभेत हिरवं कार्पेट का दिसतं? आणि राज्यसभेत लालच कार्पेट का दिसतं? लोकसभा हे खालचं सदन असून तिथे या सदनाचे प्रतिनिधित्व जनतेतून निवडून आलेले नेते करतात. भारत हा कृषिप्रधान देश मनाला जातो. म्हणजेच तळागाळातून खास करून शेतकऱ्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

भारतातील शेतकऱ्यांच्या कष्टाने फुललेल्या हिरव्यागार जमिनीतून अर्थात ग्रास रूट लेव्हल मधून निवडून आलेल्यांचं हे सदन आहे असा असा एक प्रतीकात्मक तर्क लावला जातो. म्हणूनच हिरवं कार्पेट लोकसभेमध्ये पांघरलं जातं.

Source : odishatv.in

आता वळूया संसदेचे मोठं सदन म्हणजेच राज्यसभेकडे. राज्यसभेचे प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी जनतेमधून निवडून येण्याची गरज नसते. लाल रंग हा राजश्री गौरवाचा प्रतीक आहे. या सदनात बसणारे सर्व सदस्य हे गौरवार्थी मानले जातात. म्हणजेच केवळ अनुभवाच्या आणि ज्ञानाच्या जोरावर त्यांना देशाहितासाठी या सदनात निवडले जाते.

शिवाय लाल रंगाकडे आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्यांच्या रक्ताचे प्रतिक म्हणूनही पाहिले जाते. त्यांनी या देशासाठी जे बलिदान दिले आहे त्याची जाण या सदनात असणाऱ्या प्रत्येक सदस्याला सदा व्हावी आणि त्यांनी देशहिताचेच निर्णय घ्यावेत अशी एक प्रतीकात्मक आशा बाळगली जाते आणि म्हणूनच राज्यसभेत लाल रंगाचं कार्पेट पांघरल जातं.

आहेत ना ही कारण मनाला आणि बुद्धीला पटणारी ? पहा किती विचार केला गेला आहे जेव्हा संसदेचे कामकाज सुरू केलं तेव्हा. किती विचारपूर्वक सगळ्या गोष्टी संसदेत केल्या जातात. म्हणूनच जेव्हा संसदेत निर्णय घेतले जातात ते देशभर तसेच राबवले जातात.

जिथे साध्या कार्पेट करता एवढा विचार केला गेला आहे तिथे नक्कीच देशाचं भलं होईल याकरता सतत विचार केला जातो. आता जेव्हा संसदेचं सेशन तुम्ही टीव्हीवर बघाल तेव्हा लाल कार्पेट आणि हिरवं कार्पेट बघितल्यावर त्या मागची कारणं नक्की आठवा आणि मगच संसदेचं कामकाज पुढे बघत रहा.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *