कपड्यांवरून शेतकऱ्याचा झाला अपमान, भावाने तासाभरात घडवली अद्दल!

कम्पेगौडाचा एकूणच अवतार पाहता, तिथल्या सेल्समनला तो कार विकत घ्यायला आला आहे याबाबत विश्वासच नाही बसला.


ही दुनिया झगमग आणि दिखाव्याची आहे असं म्हणतात. इथे तुम्ही कसे आहात, या आधी तुम्ही कसे दिसता यालाच महत्त्व दिलं जातं. पण ‘दिखावे पे मत जाव’ हा कानमंत्र प्रत्येकाने जपायला हवा. अर्थात हा संस्कारांचा भाग असतो. तर हे सगळ पाल्हाळ लावण्यामागे कारणही तसच आहे. आहो घटनाच तशी घडली आहे.

कर्नाटकातील तुमकपरू मधल्या महिंद्राच्या पॉश अशा कार शोरुममध्ये ही घटना घडली. या शोरुममध्ये कम्पेगौडा नामक, कळकट्ट मळकट्ट कपडे घातलेला शेतकरी, त्याच्या मित्रांसह पोहचला. त्याला ,महिंद्राची SUV खरेदी करायची होती. तर या कारची किंमत 10 लाख रुपये आहे बरं. आणि कम्पेगौडाचा एकूणच अवतार पाहता, तिथल्या सेल्समनला तो कार विकत घ्यायला आला आहे याबाबत विश्वासच नाही बसला.

इतकंच नाही तर त्या सेल्समनला वाटलं की या माणसाची कार वगैरे विकत घ्यायची ऐपतच नाही. चला आपण समजू की त्याला असं वाटलं वगैरे असेलही, पण तसं त्याने न उघडपणे व्यक्त न होता नम्रतेने कस्टमर अटेंड करायचं ना? पण नाही, या सेल्समनने कम्पेगौडाचा सर्वांसमोर अपमान केला.

‘’खिशात 10 रुपये नसतील, आणि आले मोठे 10 लाखांची गाडी विकत घ्यायला..’’ असं म्हणून त्या सेल्समनने चक्क या शेतकऱ्याला शोरुमच्या बाहेर काढल.

झालं, कम्पेगौडाला खूप राग आला आणि अपमानित झालेल्या कम्पेगौडाने त्या सेल्समनला चॅलेंज केलं. तो म्हणाला की, “मी तुला एका तासात 10 लाख रुपये रोख आणून देईन, पण मला आजच्या आज गाडीची डिलिव्हरी देण्याची तुझी हिंमत आहे का?” उध्दट सेल्समनला तिथेही त्याची चूक कळलीच नाही. त्याला वाटलं की तो येईपर्यंत सगळ्या बॅंक बंद झाल्या असतील, त्यामुळे हा फक्त हवेत गप्पा मारतोय.

पण कम्पेगौडा 10 लाखांची रोख रक्कम घेऊन शोरुम मध्ये परत आला तेव्हा त्या सेल्समनला धक्काच बसला. त्यानंतर त्याने कम्पेगौडाची माफी मागितली आणि शनिवार, रविवार असल्याकारणाने बॅंक बंद असल्याचे कारण सांगत कारची डिलिव्हरी होऊ शकणार नाही असं सांगितलं.

झालं….आता अपमानित झालेल्या कम्पेगौडाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने हे प्रकरण पोलिसांपर्यंत नेलं आणि त्या सेल्समनविरोधात रितसर तक्रार केली. कार घेतल्याशिवाय शोरुम सोडणार नाही असं म्हणत केम्पेगौडा आणि त्याचे मित्र शोरुममध्ये ठाण मांडून बसले. पोलिसांनी मध्यस्ती केली आणि प्रकरण काहीसं निवळलं. कम्पेगौडाने संबंधित शोरुमच्या त्या सेल्समन आणि इतर अधिकाऱ्यांकडून लेखी माफी लिहून मागितली. आणि कार खरेदी करण्याचा विचार रद्द केला.

या सगळ्या घटनेवरुन मैसूरचे महाराजा जयसिंग यांच्याबाबत घडलेली घटना आठवली. त्यावेळी ब्रिटीशांचे राज्य होते. महाराजा जयसिंग एकदा लंडला गेले. तिथे ते फिरत असताना त्यांना रॉयल्स रॉयस गाड्यांचे शोरुम दिसले. ते आत जाण्यासाठी वळले पण त्यांना शोरुमच्या सुरक्षारक्षकांनी अडवले. कारण महाराजांनी त्यावेळी साधारण वेश परिधान केला होता. झालं, महाराजांना खूप राग आता. त्यानंतर त्यांनी ७ रोल्स रॉयल विकत घेतल्या आणि भारतात परतल्यानंतर या गाड्या चक्क त्यांनी कचरा उचलण्यासाठी महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिल्या.

Source : mensxp.com

राजांची आणि श्रीमंताची शान असणारी रॉल्स रॉयल म्हैसूरच्या रस्त्यावर कचरा उचलण्यासाठी वापरण्यात आली. कम्पोगौडाच्या बाबतीत अगदी असंच घडलं नसलं तरी, मातीतला शेतकरी राजा असलेला कम्पोगौडा आणि महाराजा जयसिंग दोघांचा ऍटिट्यूड अगदीच सेम आहे, नाही का?


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *