एकीने नवऱ्याचा मेंदू फोडून सूप बनवले, एकीने चेहरे जाळून चावले; कहाण्या क्रूर स्त्रियांच्या!

इतिहासात अशा काही स्त्रिया होऊन गेल्या ज्या इतक्या क्रूर होत्या की त्यांचे कारनामे ऐकून अंगावर शहरे आल्याशिवाय राहणार नाही.


स्त्रियांनी पुरूषांची मक्तेदारी असणाऱ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कर्तुत्व कमावले असं आपण नेहमी म्हणतो. मात्र काही स्त्रियांनी ही गोष्ट जास्तच सिरीयसली घेऊन नको त्या क्षेत्रात सुद्धा नाव कमावलं आहे. ते क्षेत्र म्हणजे क्रूरता होय. इतिहासात अशा काही स्त्रिया होऊन गेल्या ज्या इतक्या क्रूर होत्या की त्यांचे कारनामे ऐकून अंगावर शहरे आल्याशिवाय राहणार नाही आणि स्त्री म्हणजे मायेची मूर्ती या उक्तीवरून तुमचा सुद्धा विश्वास उडेल.

कॅथरीन नाईट

कॅथरीनेचे क्रूर कारनामे आजही ऑस्ट्रेलिया मध्ये चर्चिले जातात. तिने आपल्या पहिल्या पतीचे दात अक्षरश: फोडून त्याचा जीव घेतला होता. दुसऱ्या पतीची मुलासमोरच गळा दाबुन हत्या केली होती. तिचा एक प्रियकर होता जॉन चार्ल्स थॉमस प्राईज! रागाच्या भरात तिने त्याच्या अंगावर ३७ वेळा चाकू मारला. नंतर तिने त्याची सर्व कातडी सोलून लिव्हिंग रूम मध्ये टांगून ठेवली. त्याचा मेंदू फोडून त्यापासून सूप बनवले. त्याचे नितंब फोडून त्यापासून ग्रेव्ही आणि भाजी बनवली. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे हे जेवण ती आपल्या मुलांना खायला घालणार होती. पण त्या आधीच पोलिसांनी तिला कैद केले.

मेरी कॉटन

Source : ytimg.com

ही ब्रिटनची आणि काहींच्या मते जगातील सर्वात पहिली महिला सिरीयल किलर आहे. तिने जे केलं ते पाहून आजही कित्येकांच्या अंगाचा थरकाप उडतो. तिच्या पहिल्या लग्नापासून तिला पाच मुले झाली. ह्या पाचही मुलांचा मृत्यू पोटदुखी मुळे झाल्याचे कळले. पुढे पुन्हा तिला तीन मुले झाली आणि त्या मुलांचा मृत्यू सुद्धा याच कारणांमुळे झाला. काही काळाने तिचा पती विल्यम याचा सुद्धा आतड्याच्या विकारामुळे मृत्यू झाला. नंतर तिने दुसरे लग्न केले. तिचा हा दुसरा पती, दोन मुले यांचा सुद्धा पोटाच्या आजारामुळे मृत्यू झाला. तिच्या ओळखीच्या लोकांना या गोष्टी संशयास्पद वाटू लागल्या. काही वर्षाने तर कहरच झाला. तिचा तिसरा पती, एक प्रियकर, एक मित्र, त्याची आई आणि तब्बल १२ पेक्षा जास्त लहान मुळे पोटाच्या विकाराने दगावले. पोलीस तपासात निष्पन्न झाले की ह्या सर्व हत्या होत्या आणि मेरीने विष देऊन या सर्वांचे खून केले होते. तिला फाशीची शिक्षा देण्यात आली. तिने असे का केले हे मात्र कधीच समोर आले नाही.

मायरा हँडले

Source : bbci.co.uk

आधुनिक इतिहासातील सर्वात क्रूर महिलांपैकी एक म्हणून मायरा हँडले हे नाव अत्यंत कुप्रसिद्ध आहे. तिने पाच लहान मुलांवर बलात्कार करून त्यांची निर्घृण हत्या केली होती. यात १२ वर्षांखालील ३ मुले आणि १६ व १६ वर्षे वयाची २ मुले यांचा समावेश होता. तिला जन्मठेपेची शिक्षा झाली आणि २००२ मध्ये शिक्षा भोगता भोगताच तिचा मृत्यू झाला.

इग्लंडची राणी मेरी

इंग्लंडचा आठवा राजा हेन्री आणि त्याची पहिली पत्नी कॅथरीन यांची एकुलती एक मुलगी म्हणजे मेरी होय. तिच्या हातात सत्ता येताच तिने आपले क्रूर रूप दाखवण्यास सुरुवात केली. इंग्लंड मधील जनतेवर कॅथलिक धर्म लादण्यासाठी तिने मोठ्या प्रमाणावर जुलूम केले. कित्येक निष्पाप यात होरपळले गेले. तेव्हाच्या काही विचारवंतांनी तिला ब्लड मेरी असे नाव दिले होते. तिची इतकी दहशत होती की कित्येकांनी देश सोडला आणि तिच्या मृत्युनंतरच ते परत आले.

एलीजाबेथ बथोरी

Source : wixmp.com

इतिहासातील सर्वात श्रीमंत महिला पण एक सिरीयल किलर सुद्धा अशी तिची ओळख होती. एलीजाबेथ बथोरी मुळे हंगेरी सारख्या देशाचे नाव इतिहासाच्या क्रूर पडद्यावर कायमचे उमटले गेले. तिने हंगेरी मधील निष्पाप जीवांच्या किती हत्या केल्या याची गणतीच नाही. तिचे सर्वात क्रूर रूप म्हणजे ती मुलींना पकडून, त्यांना मारून, त्यांचे अंग जाळून, चेहरा चावायची. तिला पकडले गेले होते. पण श्रीमंतीच्या जोरावर ती निसटली.

क्रूरतेला लिंगाचे मर्यादित वलय नसते हे या घटनांवरून सिद्ध होते.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Shraddha More