इतिहासातील ‘ह्या’ ५ व्यक्तींनी गद्दारी केली नसती तर भारत कधीच पारतंत्र्यात गेला नसता!

फितूर झालेल्या मीर जाफर मुळेच राजा सिराजुद्दौला ही लढाई हरला आणि तेव्हाच इंग्रजांनी भारतात घुसखोरी केली. त्यानंतरच भारतात ब्रिटीश साम्राज्य सुरु झालं.


इतर देशांच्या तुलनेत भारत पूर्वी समृध्द देश होता. म्हणूनच तर भारतात सोन्याचा धूर निघायचा असं म्हटलं जाई. रामायण- महाभारतातले दाखले तर आपण किती प्रगत होतो याचा पुरावाच आहेत. जर भारतावर परकियांचे आक्रमण झालेच नसते तर हिंदुस्तानाचे तुकडेही झाले नसते आणि कदाचित भारत अमेरिकेसारखा प्रगत देश असता, हे कोणीच नाकारणार नाही. पण खरं तर भारताचं नुकसान परकीय आक्रमकांपेक्षा घरातल्याच शत्रुंमुळे झाले आहे. हे आपले दुर्दैवच आहे. आज आम्ही तुम्हाला इतिहासातील अशा गद्दारांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी जर त्यावेळी गद्दारी केली नसती तर आजच्या भारताचे चित्र हे नक्कीच वेगळं असतं.

राजा जयचंद्र राठोड

इतिहासात राजा जयचंद्राच्या नावाची नोंद गद्दार म्हणूनच करण्यात आली. कन्नोजचा राजा जयचंद्र राठोड आणि पृथ्वीराज चौहान यांचं जुनंच वैर होतं. संयोगिताशी लग्न न झाल्याने आणि पृथ्वीराज चौहानांकडून युध्दभुमीवर हार पत्करावी लागल्याने दुःखी झालेल्या जयचंद्रने मोहम्मद गौरीशी हातमिळवणी केली. दिल्लीवर सत्ता मिळविण्यासाठी त्याने मोहम्मद गौरीला भारत देशावर आक्रमण करण्याचे आमंत्रण दिलं. त्यानंतर झालेल्या युध्दात पृथ्वीराज चौहान धारातीर्थी पडले. जयचंद्रच्या गद्दारीमुळे भारतावर इस्लामिक आक्रमणांमध्ये वाढ झाली.

राजा मानसिंग

गद्दारी करण्याच्या बाबतीत राजा मानसिंग हा जयचंद्र राठोडपेक्षा कमी नव्हता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी महाराणा प्रताप जंगलात अक्षरशः गवताची भाकरी करुन खात होते, तर मानसिंह मात्र मुघलांशी हातमिळवणी करुन देशाशी गद्दारी करत होता. मुघल- विरुध्द महाराणा प्रताप सेना यांचे हल्दी घाटीचे युध्द इतिहासात प्रसिध्द आहे. या युध्दात गद्दार मानसिंह मुघलांच्या सेनेचा सेनापती होता. मात्र वीर महाराणा प्रताप यांनी या युध्दात मानसिंहला ठार मारले आणि त्याच्या गद्दारीची शिक्षा त्याला मिळाली. पण दरम्यान झालेले नुकसान भरुन निघण्यासारखे नव्हतेच.

मीर जाफर

इंग्रजांनी आपल्या देशावर १५० वर्ष राज्य केलं. पण सगळ्यात आधी इंग्रजांना आपल्या देशात पाय ठेवण्याची संधी कोणामुळे मिळाली माहीत आहे? मीर जाफर या गद्दारामुळे, त्याच्यामुळेच आपला देश पारतंत्र्यात गेला. इंग्रजांनी बंगालवर हल्ला केला. प्लासीला झालेल्या या लढाईत मीर जाफर इंग्रजांना जाऊन मिळाला आणि त्याने त्याच्या राजाला म्हणजेच सिराजुद्दौलाला धोका दिला. फितूर झालेल्या मीर जाफर मुळेच राजा सिराजुद्दौला ही लढाई हारला आणि तेव्हाच इंग्रजांनी भारतात घुसखोरी केली. त्यानंतरच भारतात ब्रिटीश साम्राज्य सुरु झालं. यानंतर मीर जाफरचं काय झालं माहितीये? महत्त्वाकांशी मीर जाफरचे उपकार मानायचे दूरच पण इंग्रजांनी त्याचा काटा दुसऱ्या गद्दाराला हाताशी घेऊन काढला. मीर कासीमला हाताशी घेत मीर जाफरचा त्यांनी खातमा केला.

जयाजीराव सिंधिया

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याशी गद्दारी करणारा गद्दार म्हणजेच जयाजीराव सिंधिया. खरंतर जयाजीराव सिंधिया हा ग्वालियरचा राजा होता. मात्र तो देशद्रोह करुन इंग्रजांचे लांगुलचालन करणारा होता. मातीशी गद्दारी करत त्याने इंग्रजांच्या सोबतीने षड्यंत्र आखले. जयाजी रावने ग्वालियरच्या सैन्याला राणी लक्ष्मीबाई यांच्या विरुध्द भडकवलं. त्यामुळे जेव्हा राणी लक्ष्मीबाई रणांगणावर लढण्यासाठी आल्या तेव्हा ग्वालियरच्या फितूर सैनिकांनी पाठ फिरवली. मात्र तरिही आपल्या झाशीच्या राणीने इंग्रजांशी झुंज दिलीच पण शेवटी त्यांना वीरमरण पत्करावे लागले.

फणीन्द्रनाथ घोष

Source : amazonaws.com

फणीद्रनाथ घोषचा कोणताही फोटो सध्या इंटरनेट उपलब्ध नाही, पण हा तोच गद्दार, ज्याने सॅण्डर्स-मर्डर आणि असेम्बलीमध्ये बॉम्ब फोडल्याच्या केसमध्ये भगतसिंह यांच्या विरोधात साक्ष दिली होती. त्याच्या साक्षीमुळेच भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांनी फाशीची शिक्षा सुनावली आणि भारतमातेला आपले पुन्हा आपले तीन सुपुत्र गमवावे लागले होते.

या पाचही गद्दारांची नावं भारतीय इतिहासाच्या पानांवर काळ्या शाईने लिहली गेली आहेत. ज्या ताटात खाल्ल त्यालाच भोक पाडलं असं या गद्दारांबद्दल सांगता येईल. या पाच जणांच्या महत्त्वाकांक्षी आणि लालची वृत्तीमुळे देशाचे झालेले नुकसान कधीच भरुन निघणार नाही. येणारी प्रत्येक पिढी यांचा धिक्कारच करेल.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *