टाटांनी आपल्या गाडीला ‘सुमो’ हे नाव दिलं एका मराठी माणसामुळे… पण का?

भारतात टाटा समूहाच्या गाड्या सर्वाधिक विकल्या जातात आणि चालवल्या जातात हे विशेष! एका भारतीय ब्रँड वर असलेल्या आपल्या लोकांच्या अतूट विश्वासाचे हे प्रतिक आहे.


चार चाकी वाहन म्हटलं की टाटा ग्रुपचे नाव अगदी अभिमानाने आणि आदराने घेतले जाते. टाटा ग्रुप ची स्थापना १९६८ साली सर जमशेदजी टाटा यांनी केली आणि पुढचा कारभार चालवला. टाटा ग्रुप हा अनेक कंपन्यांचा एक समूह आहे. विविध क्षेत्रातील त्यांची मक्तेदारी हि वाखाणण्याजोगी आहे. त्यापैकी वाहन निर्मिती क्षेत्रातील त्यांचे स्थान हे अढळ आहे. खूप वर्षांपासूनचा अनुभव आणि परंपरा यांमुळेच टाटा मोटर्स वर केवळ भारतभरातीलच नाही तर जगभरातील ग्राहकांचा विश्वास आहे.

टाटा मोटर्स विविध प्रकारची वाहन निर्मिती करते. गदी टाटा नॅनो पासून ते टाटा जॅग्वार इथपर्यंत टाटांच्या अनेक गाड्या आज जगप्रसिद्ध आहेत. भारतात टाटा समूहाच्या गाड्या सर्वाधिक विकल्या जातात आणि चालवल्या जातात हे विशेष! एका भारतीय ब्रँड वर असलेल्या आपल्या लोकांच्या अतूट विश्वासाचे हे प्रतिक आहे.

Source : gomechanic.in

तर मंडळी टाटा भारतात जेवढ्या गाड्या निर्माण करते त्यापैकी एक गाडी अशी आहे ज्याची आज सुद्धा सर्वाधिक चलती आहे आणि ती गाडी म्हणजे टाटा सुमो होय.

काही वर्षांपूर्वी टाटानेही मोठी गाडी अर्थात टाटा सुमो भारतात लॉन्च केली. देशाच्या ग्रामीण भागात आजही टाटा सुमो तितकीच प्रसिद्ध आहे आणि ती आवडीने चालवतात पण. टाटा सुमो हे नाव कसं पडलं त्याची पण एक गोष्ट आहे. चला तर मग आज ही एक नवीन गोष्ट जाणून घेऊया.

सुमंत मोळगावकर हे एक नावाजलेले उद्योजक होते. मात्र त्याही पेक्षा त्यांना आज सगळं जग टाटा मोटर्सचे आर्किटेक्ट म्हणून ओळखतं. सुमंत मोळगावकरांमुळे टाटा मोटर्सला नवे रूप मिळाले. आज टाटा मोटर्स आहे ते सुमंत मोळगावकरांमुळे हे खुद्द टाटा ग्रुप सुद्धा मान्य करतं. मोळगावकर हे ‘ टाटा इंजीनियरिंग आणि लोकोमोटिव्ह’ विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. ते ‘टाटा स्टीलचे’ उपाध्यक्ष होते तसेच मारुती सुझुकीचे गैर कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले होते.

सुमंत मोळगावकर ज्या ज्या डिपार्टमेंटला जात ते डिपार्टमेंट सगळ्यात वर कसं राहील, म्हणजेच त्या डिपार्टमेंटची प्रगती कशी होईल याचाच सतत विचार करायचे. टाटा मोटर्स मध्ये आल्यानंतर सुद्धा सुमंत मोळगावकर टाटा मोटर्स ला कसं अजून मोठं करता येईल याबद्दलच नेहमी विचार करायचे. टाटा मोटर्सला त्यांनी एका व्गेल्या लेव्हलना कसे नेऊन ठेवले याची सुद्धा एक भन्नाट गोष्ट आहे .

Source : livemint.com

टाटा मोटर्सचे सगळे मोठे अधिकारी रोज दुपारी एकत्र जेवायचे. पण सुमंत मोळगावकर मात्र त्यांच्याबरोबर कधी जेवायला नसायचे. असे का हे जेव्हा त्या अधिकाऱ्यांनी शोधून काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना असं कळले सुमंत मोळगावकर आपली गाडी घेऊन नेहमी हायवेच्या ढाब्यांवर जायचे. त्यांच्या सहकाऱ्यांना हे कळत नसे की ते असे का करतात. पण त्यांनी त्याचा सुद्धा छडा लावला.

सुमंत मोळगावकर ढाब्यावर ट्रक ड्रायव्हर्स सोबत बोलायचे आणि ट्रक मध्ये काय सुधारणा हव्यात हे विचारून लंच ब्रेक मध्येच परत ऑफिसमध्ये यायचे. ट्रक ड्रायव्हरने दिलेल्या प्रतिक्रिया डोक्यात ठेवून ते त्यांच्या अनुभवानुसार टाटा मोटर्स मध्ये सुधारणा करायचे. याचा फायदा असा झाला की टाटा मोटर्सच्या गाडयांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आणि हळूहळू टाटा मोटर्स हा भारतीयांचा विश्वासू आणि लोकप्रिय ब्रँड बनला.

तर सुमंत मोळगावकर यांचे टाटा मोटर्सवरचे ऋण कसे फेडायचे या विचारात टाटा ग्रुप होते. अनेक वर्षानंतर टाटा मोटर्सने ठरवलं की बाजारात टाटा सुमो ही गाडी लॉन्च करायची. टाटा मोटर्सने असं ठरवलं की टाटा मोटर्सचे आर्किटेक्ट म्हणजे सुमंत मोळगावकर यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या नावाची पहिले दोन शब्द वापरायचे. ते होते सुमो- सुमंत मधला सु आणि मोळगावकर मधला मो. अशा तऱ्हेने आज जी टाटा सुमो गाडी आपण बघतो ती सुमंत मोळगावकर यांच्या नावावरून आहे.

बाजारात कितीही एम यु व्ही एस यू व्ही आल्या तरी खेड्यापाड्यात टाटा सुमो गाडी अजूनही प्रसिद्ध आहे आणि तिला आज तितकीच डिमांड आहे.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *