यमुना नदी नसती तर ‘ताजमहल’ नसता! खोटं वाटतंय? मग ही माहिती वाचाच!

ताजमहल बनवताना त्यात २८ प्रकारच्या दुर्मिळ दगडांचा वापर केला होता. हे सर्व दगड इतके सुंदर होते की त्यांच्याकडे पाहून डोळे सुद्धा चमकून जायचे.


ताजमहल….भारताची शान म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेली ही वास्तू! शहाजानने मुमताज वरच्या प्रेमाखातर बांधलेली एकमेवाद्वितीय इमारत, अशी इमारत पुन्हा कोणीही बांधू नये म्हणून इमारत पूर्ण झाल्यावर कारागिरांचे त्याने हात कलम करण्याचा आदेश दिला. अश्या या ताजमहलला पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. पण तुम्हाला माहित आहे का जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या या वास्तूमध्ये आजही अनेक रहस्ये दडलेली आहेत जी फार कमी लोकांना ठावूक आहेत आणि आज त्या फार कमी लोकांमध्ये तुमचाही नंबर लागणार आहे बरं का, कारण आपण आज ह्या लेखातून याच विषयी जाणून घेणार आहोत.

तुम्हाला ही गोष्ट जाणून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे की यमुना नदी आहे म्हणूनच ताजमहल आहे. असे का? तर ताजमहलचा पाया ज्या लाकडावर टिकून आहे त्या लाकडाला आर्द्रतेची आवश्यकता असते.

जर ताजमहलच्या बाजूला यमुना नदी वाहत नसती तर हे लाकूड मजबूत स्थिती राहिलेच नसते. शहाजानने सुद्धा या जागेची निवड याच कारणामुळे केली होती. जेणेकरून ताजमहल शेकडो वर्षे असाच टिकून राहावा.

भारतातील सर्वात उंच मिनार कोणती? असा प्रश्न विचारला तर तुम्ही सुद्धा लगेच उत्तर द्याल की कुतुबमिनार, पण मंडळी वास्तविक पाहता ताजमहल कुतुबमिनार पेक्षा जास्त उंच आहे. कुतुबमिनारची उंची ७२.५ मीटर आहे तर ताजमहलची उंची ७३ मीटर आहे.

Source : pinimg.com

ताजमहल बनवताना त्यात २८ प्रकारच्या दुर्मिळ दगडांचा वापर केला होता. हे सर्व दगड इतके सुंदर होते की त्यांच्याकडे पाहून डोळे सुद्धा चमकून जायचे. हे दगड चीन, तिबेट आणि श्रीलंका मधून आयात केले होते. मात्र इंग्रजांनी त्यांच्या काळात हे सर्व दगड काढून घेतले.

मुमताज महलचा जो मकबरा आहे त्याच्या वरच्या बाजूस एक छिद्र आहे. आता तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल ना की एवढ्या महान वास्तूमध्ये ही चुकी कशी राहिली?

तर मंडळी ही चुकी मुद्दाम केली गेली आहे. शहाजानने जेव्हा कारागिरांचे हात कलम करण्याचा आदेश दिला तेव्हा बादशहाचा बदला घेण्यासाठी काही कारागिरांनी मुद्दाम ही चूक केली. जेणेकरून ही वास्तू जास्त काळ टिकू नये. आजही यामुळेच मुमताज महलमध्ये पाणी झिरपते.

शहाजानची अजून एक इच्छा होती की त्याला पांढऱ्याशुभ्र ताजमहल समोर अजुन एक काळ्या रंगाचा ताजमहल बनवायचा होता. पण पुत्र औरंगजेब याने कैद केल्यामुळे शहाजानचे हे स्वप्न स्वप्नच राहिले, नाहीतर आज भारतात समोरासमोर दोन ताजमहल पाहायला मिळाले असते.

Source : edtimes.in

अजून एक गोष्ट आहे जी फार कमी लोकांना ठावूक आहे ती म्हणजे ताजमहलचा रंग दिवसाच्या प्रहारानुसार बदलत जातो. सकाळच्या वेळेस ताजमहल गुलाबी रंगाचा दिसतो. संध्याकाळच्या वेळेस पूर्णपणे पांढराशुभ्र दिसतो तर पौर्णिमेच्या दिवशी ताजमहल वर सोनेरी रंगाचा मुलामा चढवला आहे की काय असा भास होतो.

शेवटी ताजमहलबद्दल अजून एक खास गोष्ट जी एक विक्रम सुद्धा मानली जाते. ताजमहल पाहण्यासाठी दर दिवशी सरासरी १२,००० लोक येतात. एवढ्या संख्येतले पर्यटक जगभरात अजून दुसऱ्या कोणत्याही वास्तूला लाभत नाहीत!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Shraddha More