शेअर मार्केट काम कसं करतं? तुम्हाला माहित नसलेली एक ‘आतली गोष्ट’!

ज्याला शेअर मार्केटचं नॉलेज आहे त्यासाठी ही पैसे कमावण्याची खाण आहे, पण अज्ञानी लोकांसाठी हे प्रकरण एखाद्या जुगारापेक्षा कमी नाही.


“भावा काल इंट्रा डे मध्ये ५,००० काढले.” “दादा अरे लॉंग टर्म साठी हा अमुक शेअर घे.” “भाई शेअर मार्केट मध्ये गुंतव मी देतो टिप्स.” असे एक ना अनेक डायलॉग आपल्या फ्रेंड सर्कल्स मध्ये आपल्या कानावर पडत असतात. त्यात हर्षद मेहता वरची Scam 1992 सिरीज हिट झाल्यापासून शेअर मार्केटचं फॅड भयंकरच वाढलं आहे. कदाचित एव्हाना तुम्हालाही शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून आपण घरबसल्या श्रीमंत होऊ शकतो अशी स्वप्न पडली असतील, पण थांबा! असा अविचार कधीच करू नका.

ज्याला शेअर मार्केटचं नॉलेज आहे त्यासाठी ही पैसे कमावण्याची खाण आहे, पण अज्ञानी लोकांसाठी हे प्रकरण एखाद्या जुगारापेक्षा कमी नाही. तुम्हाला प्रत्येक क्लास मध्ये शेअर मार्केट मधून पैसा कसा कमवतात हे नक्कीच शिकवतील पण शेअर मार्केट काम कसं करतं हे सोप्प्या शब्दांत फार कमी लोकच सांगतील. आज मवाली स्पेशल या लेखात आम्ही हीच माहिती तुमच्यापुढे घेऊन आलो आहोत अगदी फुकटात!

जेव्हा तुम्हाला सुद्धा शेअर मार्केट बद्दल पहिल्यांदा कळलं असेल तेव्हा तुमच्या मनात सुद्धा हा प्रश्न नक्कीच आला असले की शेअर मार्केट मध्ये कंपन्या येतात कुठून? आणि तिथे सगळ्याच कंपन्या का नसतात? तर मंडळी शेअर मार्केट मध्ये आपली कंपनी लिस्ट करण्यामागे कंपन्यांचा एकच उद्देश असतो ते म्हणजे पैसा उभा करणे ज्याला म्हणतात Equity Finance!

हा पैसा उभारण्याचा असा प्रकार आहे ज्यात कंपनीची Equity अर्थात भागीदारी अर्थात शेअर्स इन्व्हेस्टर्स विकत घेतात आणि ते मिळाले पैसे कंपनीचा व्यवसाय अधिक मोठा करण्यासाठी वापरले जातात. याबदल्यात कंपनीचे काम असते आपल्या इन्व्हेस्टर्सना त्यांनी गुंतवलेल्या पैश्याच्या मोबदल्यात चांगला नफा मिळवून देणे.

बँकांकडून कर्ज घेऊन कंपनी चालवण्यापेक्षा वरील उपाय कंपन्यांसाठी अधिक सोप्पा असतो. कारण यात इन्व्हेस्टर्सच्या पैश्यांवर व्याज द्यायचे नसते. जरी तोटा झाला तरी पैसे मागायला कंपनीकडे कोणी जात नाही. जेव्हा एखादी कंपनी शेअर मार्केट मध्ये उतरणार असते तेव्हा त्या आधी ती कंपनी स्वत:चा IPO जाहीर करते. याला Initial Public Offering असे म्हणतात.

Source : tosshub.com

एखादी Investment Bank हाताशी धरून कंपनी आपली IPO किंमत फिक्स करते आणि मग इन्व्हेस्टर्स हा IPO खरेदी करतात. पण जोवर NSE किंवा BSE मध्ये कंपनी लिस्ट होत नाही तोवर इन्व्हेस्टर्स त्या कंपनीचे शेअर्स विकू शकत नाहीत.

NSE म्हणजे National Stock Exchange आणी BSE म्हणजे Bombay Stock Exchange होय. Stock Exchange म्हणजे अशी जागा जिथे तुम्ही Stock वा Shares हे exchange करू शकता. म्हणजेच तुम्ही Buy वा Sell करू शकता.

भारतातील शेअर मार्केट म्हणजे ह्या दोन जागा होय. येथेच दिवसभर शेअर्सच्या उलाढाली सुरु असतात. ह्या उलाढाली ज्या दोन माध्यमांमधून होतात त्यांना म्हणतात Demat account आणि Trading Account!

Trading Account मध्ये तुम्ही दिवसभर शेअर्स खरेदी करू शकता, विकू शकता आणि संध्याकाळी जेव्हा मार्केट बंद होते, तेव्हा त्या वेळेपर्यंत तुमच्या नावावर जेवढे शेअर्स जमा आहेत ते सगळे तुमच्या Demat account मध्ये जमा होतात. तुम्ही दर दिवशी ठराविक वेळेतच तुमच्या Trading Account वरून Trading करू शकता. दर दिवशी सकाळी ९:१५ वाजल्यापासून संध्याकाळी ३:३० वाजल्या पर्यंतच शेअर मार्केट सुरु असतं आणि शनिवार व रविवारी शेअर मार्केट बंद असतं.

अजून एक प्रश्न जो अनेकांच्या मनात असतो की NSE किंवा BSE सर्व कंपन्यांचे शेअर्स कसे ट्रॅक करतात? तर त्यासाठी Indices चा वापर होतो. हा Indices म्हणजेच जो सतत वर खाली होत असतो तो चार्ट होय. NSE च्या Indices ला NIFTY म्हणतात तर BSE च्या Indices ला SENSEX म्हणतात.

Source : cnbctv18.com

ज्या दिवशी SENSEX वरच्या कंपन्याच्या शेअर्सचे भाव वाढतात तेव्हा SENSEX अमुक अंकांनी वाढला अशी बातमी येते आणि ज्या दिवशी SENSEX वरच्या कंपन्याच्या शेअर्सचे भाव कमी होतात तेव्हा SENSEX तमुक अंकांनी गडगडला अशी बातमी येते. हीच गोष्टी NIFTY ला सुद्धा लागू होते.

तर मंडळी असं आहे आपलं शेअर मार्केट! आज तुमच्या मनात गर्दी करून असणाऱ्या शेअर मार्केट बद्दलच्या अनेक शब्दांचे अर्थ तुम्हाला कळले असतील. पण हे झालं सामान्य ज्ञान! शेअर मार्केट मध्ये तुम्हाला Big Bull व्हायचं असेल तर Market Study करता आलं पाहिजे. त्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊ. पण दुसऱ्या एखाद्या लेखात!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal