BOOMBOX COMMUNITY Compose

Mavalee.com

Mavalee.com

  • एका भारतीय जादुगाराने टिव्हीवर 17 वर्षांच्या मुलीचे तुकडे केले आणि...

    by Sneha Ranjankar
  • नवऱ्याने अवघ्या 500 रुपयांत विकलं आणि.....

    by Sneha Ranjankar

TATA पासुन HDFC पर्यंत अनेक कंपन्यांचे लोगो निळेच का? ही...

Post Pagination

  • Next PostNext
  1. Home
  2. चल शाना बन
  3. TATA पासुन HDFC पर्यंत अनेक कंपन्यांचे लोगो निळेच का? ही अंधश्रद्धा आहे की अजून काही?
3 years ago 3 years ago

TATA पासुन HDFC पर्यंत अनेक कंपन्यांचे लोगो निळेच का? ही अंधश्रद्धा आहे की अजून काही?

लोगो मुळे आपण पटकन एखादी कंपनी ओळखू शकतो. लोगो मुळे आपल्याला कंपनी लक्षात ठेवायला मदत होते.


Prajaktta Patwardhan
by Prajaktta Patwardhan 3 years ago3 years ago
630views

आज-काल आपण जिथे बघू तिथे वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे दिसतात; काही चिन्हे ही ठराविक कंपन्यांशी निगडित असतात. ह्या चिन्हांवरून आपण सहज ओळखू शकतो की कुठली कंपनी आहे. ह्याच चिन्हाला बोलीभाषेत लोगो असे म्हणतात. लोगो असा तयार केला जातो की त्याने कंपनीची ओळख पटकन होईल.

Source : whatfontis.com

लोगो खूप मोठा नसतो. एक छोटासं चिन्ह कंपनी दर्शवते. लोगो मुळे आपण पटकन एखादी कंपनी ओळखू शकतो. लोगो मुळे आपल्याला कंपनी लक्षात ठेवायला मदत होते.

त्याचप्रमाणे त्या कंपनीशी असलेल्या आपल्या चांगल्या आठवणी लोगोमुळे पटकन उफाळून येतात, जे कदाचित नुसत्या कंपनीच्या नावाने होऊ शकत नाही. प्रत्येक लोगो हा दुसऱ्या लोगो पेक्षा वेगळा असतो. जशी कुठलीही दोन माणसं एक सारखी नसतात. लोगो हा प्रत्येक कंपनीचा चेहरा असतो त्यामुळे लोगो सगळ्यात चांगला असणे फार गरजेचे असते.

कुठल्याही कंपनीचा लोगो भरपूर काही सांगून जातो. ह्यामुळेच की काय कंपनीचे Founders जेव्हा लोगो तयार होत असतो तेव्हा खूप भावूक होतात कारण एकदा लोगो बनला की तो परत री डिझाईन करता येत नाही. खूप आंबट गोड आठवणी या कंपनीशी आणि लोगोशी जोडलेल्या असतात.

Source : logomaker.com

जर का नीट निरीक्षण केलं असेल तर तुम्हाला असं आढळलं असेल की बऱ्याचशा कंपन्यांचे लोगो हे निळ्या रंगात आहेत. याचं कारण माहिती आहे का? चला तर आज यामागचं कारण जाणून घेऊया.

निळा रंग हा विश्वास आणि सुरक्षिततेचा प्रतीक आहे. हा असा रंग आहे जो एखाद्याला अधिक जाणून घेण्यास प्रवृत्त करतो. शिवाय निळा एक असा रंग आहे जो डोळ्यांना लगेच आकर्षित करतो पण त्रासदायक वाटत नाही. यामुळे पहिल्याच नजरेत त्या कंपनीबद्दल मनात विश्वास निर्माण करण्यास निळा रंग मदत करतो असे व्यवसाय क्षेत्रात मानले जाते.

हेच कारण आहे म्हणून अनेकदा बरेचसे लोगो निळ्या रंगात आपल्याला दिसून येतात. आपल्या देशातील काही मोठ्या आणि प्रसिद्ध कंपन्यांचे लोगो देखील निळ्याच रंगात आहेत. सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आहे तो म्हणजे TATA चा लोगो. ह्या लोगोने नुसत्या देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा लोकांची मनं जिंकली आहेत. कुठेही TATA चा लोगो दिसला की लोक डोळे बंद करून या कंपनीवर विश्वास ठेवतात.

Source : brandinginasia.com

दुसरी कंपनी जी चा लोगो निळ्या रंगात आहे ती म्हणजे हिंदुस्तान यूनिलीवर लिमिटेड. ही एक ब्रिटिश मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे जी टूथपेस्ट पासून वॉटर प्युरिफायर पर्यंत सगळं काही मॅन्युफॅक्चर करते.

Source : sanity.io

बँकांमध्ये तीन बँका अशा आहेत की ज्यांचा  लोगो हा निळा आहे. पहिली म्हणजे येस बँक. ही बँक एक प्रायव्हेट सेक्टर बँक आहे जी एका कॉर्पोरेट हाऊस सारखी काम करते. या बँकेची स्थापना राणा कपूर यांनी २००४ मध्ये केली होती. स्टेट बँक ऑफ इंडिया बद्दल काय सांगायचं? ही बँक तर सगळ्यांनाच माहित आहे. ही नॅशनलाईज बँक आहे आणि देशातील सगळ्यात मोठी बँक आहे. राजधानी मुंबई येथे त्याचे मुख्यालय आहे. एच डी एफ सी बँक ही पण एक प्रायव्हेट सेक्टर बँक आहे आणि सर्वेनुसार देशातील अधिकतम सॅलरी अकाऊंट ह्या बँकेत आहेत.

Source : sify.com

पुढची कंपनी तिचा लोगो निळा आहे ती म्हणजे एच सी एल कंपनी. या कंपनीचं हेड क्वार्टर नोएडा उत्तर प्रदेश या राज्यात आहे. ही कंपनी आता कन्सल्टन्सी मध्ये सुद्धा उतरली आहे. बजाज कंपनीचा लोगो सुद्धा निळ्या रंगात आहे. बरोबर ओळखलंत ही बजाज कंपनी म्हणजेच हमारा बजाज हे गाणं वाजायचं तीच. बजाज कंपनी ही दुचाकी आणि तीन चाकी वाहनांचे उत्पादन करते. बजाज कंपनी ही १९४०या साली जमनालाल बजाज यांनी स्थापित केली.

Source : listcarbrands.com

आय टी कंपनी इन्फोसिस कोणाला माहिती नाही. इन्फोसिस आणि नारायण मूर्ती ही नावं नेहमी एकत्र घेतली जातात. ह्या कंपनीचा लोगो सुद्धा निळाच आहे. ही एक मोठी आयटी कंपनी असून तिचे मुख्यालय बेंगळुरूमध्ये आहे. इन्फोसिसच कार्य आणि कामकाज खूप मोठं आहे.

तर ही होती निळा लोगो असलेली वेगवेगळ्या कंपन्यांची कहाणी. हे वाचून आपल्या मित्रमंडळींमध्ये नक्की शेअर करा.

Post Pagination

  • Previous PostPrevious
  • Next PostNext

Blue, Business, Company, Designing, HDFC, Logo

0 Comments

Cancel reply

Connect with:
Facebook Google Twitter

Your email address will not be published. Required fields are marked *

Prajaktta Patwardhan

Posted by Prajaktta Patwardhan

  • Previous Post
    एका भारतीय जादुगाराने टिव्हीवर 17 वर्षांच्या मुलीचे तुकडे केले आणि...
    by Sneha Ranjankar
  • Next Post
    नवऱ्याने अवघ्या 500 रुपयांत विकलं आणि.....
    by Sneha Ranjankar

You may also like

  • 8670
    टाईम ट्रॅव्हलBrands, Business, history, Ice Cream, india, Success Story, Vadilal

    फाउंटन सोडा विकण्यापासून सुरुवात ते भारतातील सर्वात मोठा आईस्क्रीम ब्रँड; गोष्ट Vadilal Ice Cream ची

    Gayatri Gurav
    by Gayatri Gurav
  • 2.2k0
    Dear जिंदगीBusiness, Businessman, life story, Mitul Bid, Pune, Startup, Sucess Story

    अवघ्या 1 लाखांमधून 120 कोटींची कंपनी उभी करणाऱ्या पुण्याच्या तरूणाची अद्भुत कहाणी!

    Prajaktta Patwardhan
    by Prajaktta Patwardhan
  • 7.8k0
    चल शाना बनBusiness, Businessman, marathi, secrets, Sindhi, Stores

    मराठी समाज बिझनेस मध्ये मागे आहे कारण आपल्याकडे सिंधी लोकांसारख्या ‘ह्या’ गोष्टी नाहीत!

    Gayatri Gurav
    by Gayatri Gurav
  • 2.2k0
    Dear जिंदगीBusiness, Royal Enfield, Siddartha Lal, Sucess

    अवघ्या २६ वर्षांच्या पोराने केली जादू आणि Royal Enfield झाली भारतातील फेव्हरेट बाईक!

    Prajaktta Patwardhan
    by Prajaktta Patwardhan

More From: चल शाना बन

  • 2.1k0
    चल शाना बनAccident, Indian railway, Logic, Railway Tracks, Technology

    रुळावरून घसरलेली भली मोठी ट्रेन पुन्हा रुळावर कशी आणतात? ही आहे तंत्रज्ञानाची अनोखी कमाल!

    Gayatri Gurav
    by Gayatri Gurav
  • 1k0
    चल शाना बनHaldiram, Language, Muslim, Packaging, UAE

    हल्दीरामच्या पाकिटांवरचा उर्दू भाषेतील मजकूर मुस्लीम समाजाला आकर्षित करण्यासाठी असतो का?

    Ruchi Manchekar
    by Ruchi Manchekar
  • 7.1k0
    चल शाना बनAzan, Banned, Islam, Loudspeaker, mns, raj thackeray, Saudi Arebia

    जिथे चक्क मक्का आहे त्या सौदी अरेबियात खरंच लाउडस्पीकरवर बंदी आहे? काय खरं काय खोटं?

    Ruchi Manchekar
    by Ruchi Manchekar
  • 2.3k0
    चल शाना बनBrands, Dove, Hindustan Unilever, Rin, Sunsilk, Surf Excel, Swatch Group

    ग्राहकांना मूर्ख बनवणारे Brands, जे आहेत एकाच कंपनीचे, पण मार्केटिंग करतात वेगवेगळी!

    Sneha Ranjankar
    by Sneha Ranjankar
  • 6.2k0
    चल शाना बनCrisis, Debt, Economy, IMF, indian government, narendra modi, srilanka

    श्रीलंकेवर इतकं मोठं संकट कसं आणि केव्हा आलं? कोण आहे लंकेचा खरा राक्षस?

    Ruchi Manchekar
    by Ruchi Manchekar
  • 2.9k0
    चल शाना बनBakery, Biscuits, Holes, Mystery, Recipe, Scientific

    सगळ्याच बिस्किटांवर ‘छिद्र’ का असतात? यामागे दडलंय एक भन्नाट कारण!

    Gayatri Gurav
    by Gayatri Gurav

DON'T MISS

  • 2.1k0
    चल शाना बनAccident, Indian railway, Logic, Railway Tracks, Technology

    रुळावरून घसरलेली भली मोठी ट्रेन पुन्हा रुळावर कशी आणतात? ही आहे तंत्रज्ञानाची अनोखी कमाल!

    Gayatri Gurav
    by Gayatri Gurav
  • 1k0
    चल शाना बनHaldiram, Language, Muslim, Packaging, UAE

    हल्दीरामच्या पाकिटांवरचा उर्दू भाषेतील मजकूर मुस्लीम समाजाला आकर्षित करण्यासाठी असतो का?

    Ruchi Manchekar
    by Ruchi Manchekar
  • 1.1k0
    Dear जिंदगीGurdwara Darbar Sahib, india, Kartarpur, Pakistan, Passport, Sikh

    आता तुम्ही सुद्धा पाकिस्तानात जाऊ शकता ते सुद्धा व्हिसा शिवाय, वापरा ‘ही’ Secret Trick!

    Ruchi Manchekar
    by Ruchi Manchekar
  • 7.1k0
    चल शाना बनAzan, Banned, Islam, Loudspeaker, mns, raj thackeray, Saudi Arebia

    जिथे चक्क मक्का आहे त्या सौदी अरेबियात खरंच लाउडस्पीकरवर बंदी आहे? काय खरं काय खोटं?

    Ruchi Manchekar
    by Ruchi Manchekar
  • 1.1k0
    टाईम ट्रॅव्हलAchaleshwar Temple, Lord Shiva, Mystery, rajsthan, Secret, Shivlinga

    दिवसातून 3 वेळा रंग बदलणारे शिवलिंग, एकाही शास्त्रज्ञाला आजवर देता आलेले नाही यामागचे उत्तर!

    Gayatri Gurav
    by Gayatri Gurav
  • 8020
    नेतागिरीBelgum, Border, CM, Karnataka, Kolhapur, maharashtra, Uddhav Thackrey, Yediurappa

    त्यांनी उद्धव ठाकरेंचा पुतळा जाळला, आपण कन्नड पाट्यांना काळे फासले….काय आहे बेळगाव सीमा वाद?

    Gayatri Gurav
    by Gayatri Gurav

Hot

  • 1

    हल्दीरामच्या पाकिटांवरचा उर्दू भाषेतील मजकूर मुस्लीम समाजाला आकर्षित करण्यासाठी असतो का?

  • 2

    सिंगापूरमधील एका मेट्रो स्टेशनला कसं पडलं ‘धोबी घाट’ नाव?

  • 3

    सुटकेसमध्ये बॉडी आढळलेल्या रशियन मॉडेलच्या मृत्यूमागे होता पुतिन यांचाच हात?

  • 4

    Lawyer-Advocate व Judge-Magistrate यांना एकच समजता? थांबा, हे एक मोठ्ठ खोटं आहे!

  • 5

    एका झटक्यात घरबसल्या श्रीमंत करणारा नवीन मार्ग…NFT?

original ad 300

Disclaimer

मराठी वायरल लीग (मवाली) हे एक माहिती आणि मनोरंजनात्मक पोर्टल असून यावर प्रकाशित होणारे लेख, व्हिडियोज, क्विझ टीममार्फत रिसर्च करून तयार केले जातात. त्यांचा वापर करायचा असल्यास ‘मवाली’ची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त पोर्टलवर इंटरनेटच्या माध्यमातून वापरलेली छायाचित्रे, व्हिडियो, मिम्स या सर्व कंटेंटला योग्य ते क्रेडीट देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. तरी कोणतीही शंका, आक्षेप असल्यास कृपया इमेलच्या माध्यमातून संपर्क करावा.
  • मवालीची ओळख
  • Terms Of Use
  • Privacy Policy
© 2025 Mavalee. All Rights Reserved

log in

Connect with:
Facebook Google Twitter

Captcha!
Forgot password?

forgot password

Back to
log in