सैन्यात केस बारीकच का ठेवतात? जेव्हा ‘कारणे’ जाणून घ्याल तेव्हा सॅल्युट कराल!


आज-काल वेगवेगळ्या हेअर स्टाईलची खूप चलती आहे. पण तुम्हाला माहित आहे का आपल्या भारतात आजही खास करून मिलिटरी अर्थात फौजी कटच जास्त फेमस आहे. पण काय आहे हा फौजी कट? आणि का आहे तो इतका लोकप्रिय ते आज आपण या लेखातून जाणून घेऊया.

तुम्ही बघितलेच असेल की प्रत्येक सैनिकाची एक समान हेअरस्टाईल असते. हिंदीत सैनिकाला फौजी म्हणतात म्हणून भारतात ही हेअरस्टाईल फौजी कट म्हणून प्रसिद्ध झाली. पण अशी विशिष्ट हेअर स्टाईल ठेवण्यामागे काय कारण असेल बरं? तर आपले हे सैनिक ह्या कट मध्ये आणि त्यांच्या गणवेशात खूप श्रेष्ठ दिसून येतात, सोप्प्या भाषेत म्हणायचं झालं तर रियल क्लासिक बरं का!

सामान्य जनतेला किंवा नागरिकांना हा फौजी कट एकदम कुल  वाटत असेल पण आपल्या सैनिकांना करता हा फौजी कट खूप महत्त्वाचा ठरतो. फौजी कट ठेवणे ही सैन्यातील अत्यंत महत्वाची बाब आहे.

आपल्याकडे सहसा युद्ध होत नाही पण जेव्हा युद्धभूमीवर जावं लागतं तेव्हा सैनिकांना पूर्ण तयारीनिशी युद्धात उतरावं लागतं. युद्धभूमीवर आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून सैनिक आपले केस खूप छोटे ठेवतात म्हणजेच ते फौजी कट करतात. युद्धात किंवा युद्धभूमीवर प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो आणि तो क्षण वाया घालवून चालत नाही. सैनिक किंवा डिफेन्स पर्सनल स्वत:च्या ग्रुमिंग करता जास्त वेळ देऊ शकत नाही आणि म्हणूनच केस बारीक ठेवण्याची प्रथा आहे.

युद्ध करताना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सैनिकांना डोक्यावर हेल्मेट किंवा हेड गियर सुद्धा घालावं लागतं. अशा वेळेस जर का केस मोठे असतील तर सैनिक युद्धात लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत. शिवाय हे हेल्मेट अथवा हेड गिअर सैनिकांना घालण्यास सुद्धा त्रासदायक होऊ शकते, तसेच ते परिधान करायला सुद्धाही जास्त वेळ जाऊ शकतो म्हणूनच सैन्यात हा फौजी कट महत्त्वाचा समजला जातो.

प्रत्येक सैनिकाला कधी ना कधीतरी अत्यंत बिकट परिस्थितीत काम करावं लागतं आणि राहावं लागतं तेव्हा जर का मोठे केस असतील तर ते सांभाळण्यातच त्यांचा वेळ निघून जाईल असं होऊ नये म्हणून सैनिकांचे केस बारीक ठेवले जातात. शत्रूचा सामना करता करता असही होऊ शकतं की त्यांना पाण्यात काही काळ घालवावा लागेल, अशावेळी आपले केस लवकरात लवकर वाळावे म्हणून सैनिक त्यांचे केस छोटे ठेवतात.

मोठे केस असल्याने सैनिकांना लवकर सर्दी होऊ शकते ह्यालाच आपण कॉमन कोल्ड असे म्हणतो ते सैनिकांच्या तब्येतीला सुद्धा बरोबर नाही. सैनिकांना कधीकधी क्लोज कॉमबॅट करायची वेळ येऊ शकते म्हणजेच शत्रूशी दोन हात. अशी परिस्थिती जर का उद्भवली तर समोरचा माणूस त्याच्या केसांवर वार करू शकतो किंवा त्यांचा आधार घेऊन आपल्या सैनिकाला इजा पोचवू शकतो म्हणूनच छोटे केस असणं कधीही रास्त.

युद्धभूमीवर बऱ्याचदा अनेक दिवस सैनिकांना नीट आंघोळ सुद्धा करता येत नाही अशा वेळेला छोटे केस असणं कधीही चांगलंच. सगळ्यात महत्वाचं कारण की सगळे सैनिक छोट्या केसांमध्ये म्हणजेच फौजी कट मध्ये एक समान दिसतात व त्यांच्यात एकी निर्माण होऊन राहते असा सुद्धा एक तर्क लावला जातो.

तर मंडळी आलं का लक्षात या फौजी कटचं महत्त्व? तर मग हा लेख शेअर करून इतरांना सुद्धा नक्की ही रंजक माहिती द्या!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *