ऑपरेशन थियेटरमध्ये सगळ्या गोष्टी हिरव्या रंगाच्याच का असतात?

तुमच्या मनात सुद्धा हा प्रश्न कधीपासून फिरत असेल ना? उत्तर अजून नाही मिळालं? डोन्ट वरी, आम्ही आहोत ना! या प्रश्नाचं अगदी खरं आणि लॉजिकल उत्तर आज आमच्याकडे आहे की का हॉस्पिटलच्या ऑपरेशन थियेटरमध्ये हिरव्या रंगाचाच जास्त वापर केला जातो.


तुमच्या मनात सुद्धा हा प्रश्न कधीपासून फिरत असेल ना? उत्तर अजून नाही मिळालं? डोन्ट वरी, आम्ही आहोत ना! या प्रश्नाचं अगदी खरं आणि लॉजिकल उत्तर आज आमच्याकडे आहे की का हॉस्पिटलच्या ऑपरेशन थियेटरमध्ये हिरव्या रंगाचाच जास्त वापर केला जातो.

तर मंडळी या मागे मानसशास्त्रीय कारण आहे. जरा जड गेला का हा शब्द? सोप्प्या भाषेत सांगायचे तर हिरव्या रंगामध्ये सायकोलॉजीकल कारण आहे. हिरवा रंग हा डोळ्यांना आणि मनाला सुखावणारा मानला जातो. अन्य कोणत्याही रंगामध्ये जी क्षमता नसते ती क्षमता हिरव्या रंगात असते. तुम्ही कितीही वेळ एकटक या रंगाकडे पहा तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. हेच तुम्ही अन्य रंगांबाबत करून पहा आणि त्या रंगांकडे जास्त वेळ पहा, तुम्हाला काही वेळातच त्रास जाणवू लागेल.

तर हेच कारण आहे की ऑपरेशन थियेटरमध्ये हिरवा रंग वापरला जातात. जसे की पडदे हिरव्या रंगाचे असतात, डॉक्टरांनी घातलेले कोट्स सुद्धा हिरव्या रंगाचे असतात. रुग्णाच्या अंगावरची चादर सुद्धा हिरव्या रंगाची असते. ऑपरेशन हे खूप वेळ चालू शकतं. कधी कधी ते अनेक तास चालतं. अशावेळी डॉक्टरांना थकवा जाणवणे साहजिक आहे आणि यामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. नीट दिसू शकत नाही, जर नीट दिसलंच नाही आणि चुकीच्या अवयवाला इजा झाली तर..? म्हणतात ना एक डॉक्टर जसा देवदूत ठरू शकतो तसा शुद्धीत नसलेला एक निष्काळजी डॉक्टर यमदूत सुद्धा ठरू शकतो.

ऑपरेशन थियेटरमध्ये सगळीकडे जास्तीत जास्त हिरवा रंग असल्याने डोळ्यांना आराम मिळतो आणि अन्य रंग स्पष्ट दिसतात. जसे की रक्ताचा रंग, अन्य अवयवाचा रंग! जेणेकरून डॉक्टरांच्या हातून काही चुकी होत नाही व ऑपरेशन अगदी उत्तमप्रमाणे पार पडते.

आता तुम्ही म्हणाल हिरवा रंग हा सुखावणारा रंग आहे असे कशावरून? विज्ञानाने सिद्ध केले का? तर हो हे विज्ञानाने सिद्ध केले आणि निसर्गाने सुद्धा! तुम्ही निसर्गातील प्रत्येक गोष्ट पहा ती बहुतांश हिरव्या रंगाची असते. झाडे, पाने वेली, गवत सारं काही हिरवं असतं आणि हेच कारण आहे की आपल्याला निसर्गाचा सहवास आवडतो. तेथे गेलं की मन अगदी फ्रेश होतं. कितीही वेळ एखाद्या सुंदर नटलेल्या हिरव्यागार डोंगराकडे पाहिलं की अगदी स्वर्ग सुखाचा आनंद होतो.

तर मग आता जेव्हा कधी तुम्ही स्वत: ताण तणावात असाल आणि मनाला शांती द्यायची असेल तर एकटक हिरव्या रंगाकडे पहा, तुम्हाला नक्कीच खूप फ्रेश वाटेल.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Shraddha More