KBC जिंकणारा व्यक्ती खरंच करोडपती बनतो का?

या खेळाचा पहिला करोडपती होण्याचा मान मिळाला १ कोटी जिंकणारा हर्षवर्धन नवाथे...पण....


कौन बनेगा करोडपती नुसतं ऐकलं तरी एक थरारक रोमांच अंगावर उठून येतो नाही का? जी रक्कम कमवायला आयुष्यभर मेहनत करावी लागते ती रक्कम अवघ्या एका दिवसांत मिळवून देणारा शो म्हणजे केबीसी! शिवाय हा खेळच इतका मजेदार आहे की प्रत्येक सीजन मध्ये बघावासा वाटतो. पण कधी विचार केलाय की ह्यात मिळणारी रक्कम सगळीच आपली होते, का काही पैसे सरकारला टॅक्स अथवा कर म्हणून द्यावे लागतात? मित्रांनो आजच्या लेखात काय आपण हेच जाणून घेणार आहोत की एखाद्या व्यक्तीने १ कोटी जिंकले म्हणजे तो खरंच करोडपती होतो का?

कौन बनेगाक रोडपती हा हिंदी शो २००० साली सुरू झाला. अलीकडेच याचं मराठी व्हर्जन सुद्धा सोनी मराठीने सुरु केलं आहे. भारतीय टीव्ही इंडस्ट्री मधील आतापर्यंतचा सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रम ठरलेला शो म्हणून सुद्धा कौन बनेगा करोडपतीने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.

या खेळाचा पहिला करोडपती होण्याचा मान मिळाला १ कोटी जिंकणारा हर्षवर्धन नवाथे! २००० साली हर्षवर्धनने एक करोड रुपये जिंकले आणि सामान्य व्यक्ती सुद्धा एका दिवसात या शो च्या माध्यमातून करोडपती होऊ शकतो हे सिद्ध झाले.

हा खेळ खेळणारा प्रत्येक खेळाडू मनात एकच भावना ठेवून येतो की आपल्याला १ कोटी रुपये जिंकायचेच आहेत पण खरंच जिंकणाऱ्याला १ कोटी रुपये मिळतात? की काही रक्कम त्यातून वजा केली जाते आणि मग आपल्याला उरलेले पैसे मिळतात? एक उदाहरण पाहुया. कौन बनेगा करोडपती सीजन ८ मध्ये अचिन आणि सार्थक या दोन युवकांनी तब्बल ७ कोटी रुपये जिंकले. पण ही पूर्ण रक्कम त्यांना मिळाली नाही . यावर त्यांना टॅक्स द्यावा लागला.

अजून सोप्प्या पद्धतीने समजावून घेऊया. ह्या खेळात एकूण रक्कम जिंकलेल्यावर ३०% कर बसतो. एकूण रक्कम जिंकल्यावर शो वर असं दाखवलं जातं कि सगळीच रक्कम विजेत्याला मिळणार आहे. पण तसं होत नाही तर त्यावर 3३०% कर लागू होतो. नुसत्या मोठ्या रकमेवर नाही तर एखाद्याने ५०,००० रुपये जरी जिंकले तरी त्या व्यक्तीला तीस टक्के ( ३०%,) कर व चार(४% )टक्के सेस (cess) म्हणजेच उपकर भरावा लागतो. 

आता एक छोटस गणित बघूया. समजा एखाद्याने एक कोटी रुपये जिंकले असतील तर कलम १९४ ब प्रमाणे या रकमेवर ३०% कर म्हणजेच ३० लाख रुपये कापले जाऊ शकतात व ४% सेस म्हणजेच उपकर अर्थात १ लाख ३२ हजार रुपये कापले जातात.

५० लाख ते १ कोटी रुपये जिंकल्यावर साधारण दहा टक्के सरचार्ज म्हणजेच ३ लाख रुपये भरावे लागतात. हीच रक्कम १ कोटी पेक्षा जास्त असेल तर यावर १५% सरचार्ज लागू शकतो. एकूण वजाबाकी करता हे गणित असं दिसेल की, १ कोटी रुपयांवर ३४ लाख ३२ हजार रुपये कापले जातील व साधारण ६५ लाख ६८ हजार रुपये ही रक्कम विजेता आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो.

जिंकलेली किंमत १ कोटी पेक्षा जास्त असेल तर आणखीन कर बसतो. कर लावण्याचे कारण काय तर अशा गेम शूज मधून मिळालेली रक्कम सरकार एक प्रकारचं इन्कम समजते, मग त्यावर कर किंवा टॅक्स असणारच. कलम ५६ -२ प्रमाणे लॉटरी, पझल गेम्स ,घोड्यांची शर्यत किंवा सट्टा व अन्य अशा प्रकारचे खेळ यांमधून मिळणारा पैसा ही एक प्रकारची मिळकत मानली जाते आणि म्हणूनच यातून तुम्ही कितीही रकम जिंकलात तर त्यावर कर आकारला जातो.भलेही आपण ह्या वेगवेगळ्या खेळांकरता खूप मेहनत करून अभ्यास करत असलो तरी मिळालेल्या किमतीवर आपल्याला कर हा द्यावाच लागेल. २००१ साली सरकारने हे स्पष्ट केलं की जे कोणी लोक वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेतील आणि त्यातुन  ठराविक रक्कम जिंकतील ती रक्कम एक प्रकारचं इन्कम म्हणून ग्राह्य धरली जाईल व त्यावर टॅक्स अथवा कर हा भरावाच लागेल.

त्यामुळे मंडळी तुम्ही भरपूर परिश्रम घेऊन वेगवेगळ्या स्पर्धांकरता तयारी तर करू शकाल पण मिळालेली रक्कम यावर काही टक्के कर हा सरकारला द्यावाच लागेल म्हणून कौन बनेगा करोडपती या खेळात भाग घेऊन कदाचित तुम्ही करोडपती व्हाल अथवा नाही होणार पण सरकार मात्र दरवर्षी करोडपती होतेच!   


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *